ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे. कृषि विभागामार्फत शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, शेतक-यांनी शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करावा. सद्यस्थितीत विकसित अशा मोबाईल अॅपची माहिती खालीलप्रमाणे
अ.क्र |
. मोबाईल अॅपचे नाव |
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती |
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ |
1 |
शेतकरी मासिक (Shetkari Masik) |
शेतकरी मासिकातील लेख |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
2 |
(Maharain) |
मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस |
महारेन |
3 |
क्रॉप क्लिनिक (Crop clinic) |
सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादी |
mahaagriiqc.gov.in |
4 |
कृषि मित्र (Krishi mitra) |
तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहिती |
mahaagriiqc.gov.in |
5 |
एम किसान भारत (mKisan India) |
कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले |
फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
6 |
किसान सुविधा (Kisan Suvidha) |
हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
7 |
पुसा कृषि (Pusa Krishi) |
पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
8 |
क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance) |
पिक विमा माहिती |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
9 |
डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India) |
तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दर |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
10 |
अॅग्री मार्केट (AgriMarket) |
५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
11 |
पशु पोषण (Pashu Poshan) |
जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन |
गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल |
12 |
cotton (Kapus) |
कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
13 |
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) |
मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
14 |
हळद लागवड, (halad Lagwad) |
हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
15 |
पिक पोषण (Plant nutrition) |
पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
16 |
लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton) |
मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
17 |
शेकरु (Shekaru) |
कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहिती |
गुगल प्ले स्टोअर |
18 |
इफ्को किसान (IFFCO Kisan) |
हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओज |
गुगल प्ले स्टोअर |
शेतक-यांनी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा प्राप्त करुन घेण्यासाठी RTI Maharashtra आणि शेती विषयक उपलब्ध शासकीय/खाजगी मोबाईल अॅपचा वापर करावा.
स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/29/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...