रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्या युवकांना उत्सुकता असते पदभरतीची आणि त्यांनतर नियुक्तीची. येथील जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने नोंदणीसोबतचे त्यांची नियुक्ती झाल्यास तसेच रिक्त झालेल्या जागांबाबतची माहिती एसएमएस द्वारे द्यायला सुरुवात केली आहे.
तंत्रज्ञानाचा शासकीय सेवेची तत्परता वाढविण्यासाठी वापर करणं शक्य आहे आणि अनेक कार्यालये तसे करीत आहेत. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने बुलडाणा येथे असाच उपक्रम सुरु केला आहे. बेरोजगारांनी येथे नोंदणी केल्यापासून कोणत्या कार्यालयात पदभरती होणार आहे. कोणत्या कार्यालयात कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आदी माहिती यामुळे सुलभतेने मिळायला आता सुरुवात झाली आहे.
रोजगारासाठी नोंदणी करणारा प्रत्येक युवक शहरातील असत नाही वारंवार नोंदणी कार्यालयाला चकरा मारणे देखील त्यांना शक्य नसते मात्र कुठे जागा रिक्त झाल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी युवकांना या कार्यालयात यावेच लागायचे आता या सुविधेमुळे त्यांचा वेळ आणि श्रम या दोन्हींची बचत होवून घरबसल्या माहिती प्राप्त होत आहे. हा अभिनव उपक्रम बुलडाण्यात सुरु झाला.
* नांव नोंदणी करतांना ज्या उमेदवारांनी आपले भ्रमणध्वनी नोंदविले आहेत त्याची पाठवणी झाल्यास आपोआप एसएमएस संदेश पाठविला जाईल.
* या एसएमएसमध्ये उमेदवारांची कोणत्या पदासाठी कोणत्या नियोक्त्यांकडे व कोणत्या व्हीओसाठी पाठवणी करण्यात आली व कोणत्या कार्यालयाकडून पाठवणी झाली याबाबतच्या माहितीचा समावेश असेल.
* पाठवणीचे एसएमएस कार्यालयाकडे थेट अधिसुचित होणाऱ्या (Direct Notification) रिक्तपदांसाठी पाठवणी केलेल्या उमेदवारांना आपोआप जाणार आहेत.
* एसएमएस सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल यांचे अद्यावत करुन द्यावी असे सर्वांना सुचित करण्यात आले आहे.
* मोबाईल क्रमांक, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी यांचे अद्ययावतीकरण उमेदवार केंव्हाही व कोठूनही htt:/ese.mah.nic.in या वेबसाईटवरुन उमेदवार कॉर्नरमधील माझ्या संपर्कात बदल या ऑप्शनवर क्लीक करुन करु शकतात. यासाठी उमेदवारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
* पाठवणी केलेल्या उमेदवारांना एसएमएस संदेशाद्वारे कोणत्या पदासाठी व कोणत्या नियोक्त्यांकडे नाव पाठविण्यांत आले याची माहिती दिली जाते.
* यानंतर ज्यांची नियुक्ती झाली असेल त्यांना त्या कार्यालयाचे नाव देखील एसएमएस द्वारे कळविण्याची व्यवस्था यात आहे. याबाबत युवकांना वर दिलेल्या वेबसाईटवर उमेदवार या बटनवर ऑप्शनद्वारे अधिक माहिती मिळेल.
* या पध्दतीने तंत्र्ज्ञानाचा वापर झाल्याने काम अधिक गतिमान आणि पारदर्शी होणार हे निश्चित आहे.
लेखक : - प्रशांत दैठणकर
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/20/2020
नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्त...
पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या...
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी र...
नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गो...