भारतातील बँकिंग क्षेत्र पुढे वाटचाल करीत आहे. बँकिंग सेवा आता मोबाइल बँकिंगमार्फत उपलब्ध आहेत, ज्यांमध्ये मुख्यतः एसएमएस आधारित शंकासमाधान व सावधानतेच्या इशार्यांचा समावेश आहे. ह्यामुळे ग्राहकास त्यांच्या बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता देखील खाते आणि खात्यातील व्यवहारांची माहिती मिळवता येते. ह्या सेवांसाठीचे शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते - काही बँका ही सेवा मोफत देतात तर काही वार्षिक सेवा शुल्क आकारीत आहेत. मात्र मोबाइलवर आधारित ह्या बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकाने मोबाइल सेवा प्रदाता कंपनीने ग्राहकाचे निवेदन संबंधित बँकेकडे पाठविण्यासाठी लागू केलेले शुल्क भरणे गरजेचे आहे.
काही बँकांनी, आपल्या मोबाइल हँडसेटमध्ये त्यांच्याकडील विशिष्ट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन स्थापन करून, व्यक्तिगत मोबाइल बँकिंग देऊ केले आहे. मात्र ही सुविधा फक्त जीपीआरएस (GPRS) प्रकारच्या मोबाइल हँडसेट्सवरच चालू शकते. पण, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि बँकिंग क्षेत्रातल्या ह्या नव्या उपक्रमाचे अनुकरण करणे ग्राहकांना शक्य आहे.
मोबाइल बँकिंग सेवा देणार्या काही बँकांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत -
ऍक्सिस बँक | बँक ऑफ राजस्थान |
कॉर्पोरेशन बँक | ड्यूश बँक |
धनलक्ष्मी बँक | एचडीएफसी बँक |
फेडरल बँक | आयसीआयसीआय बँक |
आयडीबीआय बँक | आयएनजी वैश्य बँक |
कोटक महिंद्र बँक | करूर वैश्य बँक |
लक्ष्मी विलास बँक | भारतीय स्टेट बँक |
युनियन बँक ऑफ इंडिया | स्टँडर्ड चार्टर्ड बँक |
युनायटेड बँक ऑफ इंडिया | इंडियन ओव्हरसीज बँक |
आंध्र बँक | बँक ऑफ इंडिया |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | स्टेट बँक ऑफ हैदराबाद |
विजया बँक | अलाहाबाद बँक |
बँक ऑफ महाराष्ट्र | कँनरा बँक |
देना बँक | इंडियन बँक |
जम्मू आणि काश्मीर बँक | कर्नाटक बँक |
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या | पंजाब नॅशनल बँक |
स्टेट बँक ऑफ मैसूरच्या | स्टेट बँक ऑफ पतियाळाच्या |
स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या | सिंडिकेट बँकेच्या |
साउथ इंडियन बँक | यूको बँक |
यस बँक |
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 6/5/2020
आंध्रप्रदेश या राज्यातील ई-शासन आणि त्यांच्या वेब ...
उत्तराखंड राज्यातील ई-प्रशासना संबंधीची माहिती व ...
आधार कार्डाशी संलग्न असलेली 'ई-लॉकर' ही सुविधा महा...
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र वीज...