रेल्वे तिकीट काढताना भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्यात बराच वेळ खर्ची जातो. तसेच तिकीटामुळे कागदही वाया जातो. यावर तोडगा म्हणून रेल्वेने अनारक्षित तिकीटांसाठी नवीन मोबाईल अॅप सुरु केले आहे.
मोबाईल अॅपद्वारे अनारक्षित तिकीट तिकीट बुक करण्याची सुविधा उद्यापासून सुर करत आहोत अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी बुधवारी दिली.
रेल्वेच्या या नव्या अॅपमुळे प्रवाशांचा तिकीट खिडकीसमोर रांगेत उभा राहण्याचा वेळ वाचणार आहे. यूटीएस या अॅपद्वारे तुम्ही तिकीट बुकिंग करु शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोरमधून तुम्हाला यूटीएस हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर रेल्वे ई-वॉलेटसाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.
ई-वॉलेट सिस्टीमद्वारे तुम्ही तिकीटाचे पैसे भरु शकता. त्या ई-वॉलेटमध्येही तुम्ही रिचार्ज कसे करणार यासाठी यामध्ये दोन पर्याय देण्यात आले आहेत. तिकीट खिडकीवर जाऊन रिचार्ज करणार की आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने पैसे भरणार असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. सध्या हे अॅप केवळ अँड्रॉईड व्हर्जनवरच उपलब्ध आहे. लवकरच ब्लॅकबेरी व्हर्जनवर हे अॅप सुरु करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे तुम्ही जर तिकीट बुकिंग केले असेल तर त्याची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही. मोबाईलवर तुम्ही त्याची सॉफ्टकॉपी तिकीट तपासनीसला दाखवू शकता.
स्त्रोत : दै. प्रहार
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 6/19/2020
रवाशांच्या सुरक्षेसाठी व त्यांना प्रवासादरम्यान आप...
पंढरीची वारी ‘अॅप’ विषयी माहिती.
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा...