आधार हा, युनिक आयडेंटिटि अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) मार्फत भारतातील सर्व नागरिकांना दिला जाणारा विशिष्ट १२ अंकी क्रमांक आहे.
हा क्रमांक एका मध्यवर्ती डाटाबेसमध्ये संग्रहित केला जातो आणि प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र, हाताच्या बोटांचे ठसे, बुब्बुळाचे छायाचित्र अशा जीवशास्त्रीय माहितीसह लोकसंख्याशास्त्र विषयक माहितीची त्यात नोंद केली जाते.
डाटा बेसवरील तपशील आणि पडताळणीची उपलब्धता असणारा हा 'आधार' क्रमांक कमी खर्चिक आणि ऑनलाईन पडताळणी करता येण्याजोगा आहे.
सरकारी आणि खाजगी डाटाबेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होणा-या बनावट आणि खोट्या नोंदी रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत सक्षम असेल.जात, धर्म, वंश किंवा भौगोलिक परिस्थिती, अशा कोणत्याही वर्गीकरणाशिवाय दिला जाणारा, प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट क्रमांक आहे. राज्यव्यापी आधार नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. नोंदणी केल्यनंतर पोस्टाच्या माध्यमातून घरपोहोच आधारकार्ड वितरित करण्यात येत आहे. परंतु यात येत असलेल्या अडचणी व वाढलेला गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारने थेट ऑनलाइन आधारकार्ड देण्याचे नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.त्यामुळे आधारची नोंदणी करणा-या नागरिकाला इंटरनेटच्या माध्यमातून तयार कार्ड डाऊनलोड करता येईल.
ज्यांना कार्ड मिळाले नाही, त्यांनी ऑनलाइन कार्ड मिळविण्यासाठी eaadhaar.uidai.gov.in या साइटवर क्लीक करा.यानंतर इ आधार ऑप्शन येईल.
यावर नागरिकाने नोंदणी स्लीपचा नंबर, वेळ भरावी. तसेच स्लीपवर जसे नाव आहे तसे टाइप करावे. हे सॉफ्टवेअर यानंतर पिनकोड विचारेल. आपला पिनकोड टाकल्यानंतर सबमीटवर क्लीक करा. यानंतर ते मोबाइल नंबर विचारेल. मोबाइल नंबर टाकल्यानंतर मोबाइलवर एचटीपीपी नंबर येईल. हा नंबर पुन्हा रिक्त जागेत संगणकावर टाकावा. त्यानंतर सबमीट करा. यानंतर तो पासवर्ड अर्थात पिनकोड विचारेल. तेथे पुन्हा पिनकोड टाका. सबमीटवर क्लीक करताच कार्ड दिसेल. डाऊनलोड करा व प्रिंट घेता येईल.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/4/2020
युआयडीएआयची लहान रकमा देण्यासंदर्भातील (मायक्रोपेम...
आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट...
या विभागामार्फत अनेक लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी...
नैसर्गिक आपत्तीने वेढलेल्या कुटुंबांसाठी प्रकल्प ...