অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नोंदणी व मुद्रांक विभागाची ऑनलाइन सेवा

Stamp And Registration Assistance Through Helping Information (SARATHI) - सारथी

ई-सर्च

एखादया मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदविलेला दस्त नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन शोधण्यासाठीची सुविधा म्हणजे ई-सर्च होय.

मिळकतीच्या क्रमांकावरुन किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली उपलब्ध आहे.

कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असते. पूर्वी असे बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयास भेट देऊन शोध घेणे गरजेचे होते. सामायिक कार्यक्षेत्रात (Concurrent Jurisdiction) एका पेक्षा अधिक कार्यालये असतात त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी त्रास होत असे.

या सर्व बाबींचा विचार ई-सर्चच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी सन 2002 नंतर संगणकीकृत पद्धतीने नोंदविलेल्या सर्व दस्तांचा शोध ई-सर्च द्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-सर्च (e-search) द्वारे घरबसल्या 24 तास असा शोध घेता येतो.

यामध्ये काही विनाशुल्क सेवा आहेत तर काही सशुल्क सेवा आहेत.

विनाशुल्क सेवेसाठी येथे क्लिक करा

सशुल्क सेवेसाठी येथे क्लिक करा

इ-एएसआर :  Annual Schedule of Rate (ASR)

जागेचे दरपत्रक (वार्षिक)  – जागेचे दर हे महाराष्ट्र राज्य नोदणी व मुद्रांक विभागाकडून मुद्रांक शुल्कासाठी जागेच्या भावाचे मुल्यांकन करून ठरविले जातात.

इ-एएसआर (नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन दरपत्रक) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पब्लिक डाटा एन्ट्री (पिडीई)

संगणकीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती जसे की, मिळकत, दस्तातील पक्षकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते. ही माहिती पक्षकाराला स्वतःला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणाहून भरता यावी, यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर जी सुविधा उपलब्ध आहे, त्याला पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) म्हणून संबोधले जाते

जनतेला फायदे

  • 1) पब्लिक डाटा एन्ट्री द्वारे पक्षकार स्वतःच्या दस्ताची माहिती केव्हाही व कोठूनही भरु शकतात.
  • 2) ही माहिती पक्षकार स्वतः भरत असल्याने अधिक अचूक असते.
  • 3) दस्त नोंदणीसाठी पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयातील वेळ वाचतो.

पब्लिक डाटा एन्ट्री (पिडीई) साठी येथे क्लिक करा

ई-पेमेंट - ई-पेमेंट करण्यासाठी येथे क्लिक करा

ई-स्टेप इन

दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ ऑनलाईन आरक्षित (Advance booking ) करुन घेण्यासाठी विभागाने उपलब्ध करुन दिलेली सुविधा म्हणजे ' ई-स्टेप-इन ' होय.

या सुविधेद्वारे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी साठी वेळ आरक्षित करता येते.

या सुविधेचा वापर करुन खालील कालावधीतील सोयीची वेळ आरक्षित करता येते.

  • 1. सकाळी 10 ते सांयकाळी 6 ही कामाची वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत.
  • 2. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत कामाचा वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत.
  • 3. दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत कामाची वेळ असलेल्या कार्यालयात दुपारी 2 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत.

दस्त नोंदणी करीता पक्षकाराने दुय्यम निबंधक कार्यालयात, आरक्षित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी येणे आवश्यक .

या सुविधेचे फायदे

ई-स्टेप-इन या सुविधेचा वापर करुन आपण दस्त नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करु शकता.

  • •   ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामधे आपणांस दस्त नोंदवावयाचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी 'ई-स्टेप- इन' सुविधेसाठी वेगळया ठेवलेल्या वेळेपैकी आपल्या सोईची वेळ आरक्षित करता येत असल्याने रांगेमध्ये थांबण्याची आवश्यकता नाही.
  • •   वेळेवर नोंदणीसाठी पोहचल्यावर सेवा मिळत असल्याने वेळेची बचत होते.
  • •   सामायिक कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयातील आरक्षित झालेल्या वेळा माहिती होतात व त्यानुसार आपल्या सोयीची वेळ निवडता येते.

ई-स्टेप-इन या सुविधेचा वापर करुन आपण दस्त नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करण्यासाठी येथे क्लिक करा

ई-रजिस्ट्रेशन

आपल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, आपल्या सोयीच्या ठिकाणावरुन व आपल्या सोयीच्या वेळी करण्याची सुविधा म्हणजे ई-रजिस्ट्रेशन होय. इंटरनेटचा वापर करुन आपण सध्या या सुविधेव्दारे विभागाने निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये आपल्या Leave & License च्या दस्ताची नोंदणी करु शकता. ही सुविधा www.igrmaharashtra.gov.inया नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेत स्थळावर Online Services या सदराखाली e-Registration या ठिकाणी उपलब्ध आहे.

ई-रजिस्ट्रेशनचे फायदे

  • 1)  इंटरनेटची सुविधा असलेल्या आपल्या सोयीच्या ठिकाणावरुन दस्त तयार करु शकता.
  • 2)  कोणत्याही वेळी (24 X 7) दस्त नोंदणीसाठी सादर करता येतो.
  • 3)  नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही.
  • 4)  दस्तातील सर्व पक्षकार एका वेळी एकाच ठिकाणी हजर असण्याची गरज नाही
  • 5)  रजिस्ट्रेशनवर टिपण
  • 6) ई रजिस्ट्रेशनवर सादरीकरण.

ई-रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा

पिडीई फायलिंग

डिपॉझिट ऑफ टायटल डीड पदधतीने झालेल्या कर्जव्यवहारामध्ये, उभय पक्षामध्ये करारनामा निष्पादित करण्यात आला नसेल, तर कर्जदाराला त्या कर्जव्यवहाराची माहिती नोटिसव्दारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास सादर करावी लागते.
सदर नोटिस फायलिंग करण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जावे लागता बँका/वित्तीय संस्था यांच्या शाखेतूनच सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येण्यासाठी ई-फायलिंग (e-Filing) ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व बँक /वित्तीय संस्था यांना उपलब्ध करुन दिली आहे. तथापि, ज्या बँका/वित्तीय संस्था सदर प्रणाली मध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांचे कर्जदारांना नोटिस फायलिंगची कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच पूर्ण करावी लागते.
त्या कर्जदाराने दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्यापूर्वी त्या नोटिस संदर्भातील माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online services या सदराखाली उपलब्ध असलेल्या PDE for filing या सुविधेचा वापर करुन ऑनलाईन भरणे क्रमप्राप्त असते.

PDE for filing साठी येथे क्लिक करा

    अधिक माहितीसाठी किंवा काही मदत हवी असल्यास सारथी हेल्पलाईन नंबर - 8888007777  या  नंबरवर कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत संपर्क करू शकता
    माहिती संकलन : छाया निक्रड

    संदर्भ : नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन


अंतिम सुधारित : 8/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate