অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण - लॉटरी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण - लॉटरी

अर्ज स्विकारतांना अर्जदाराची माहिती स्विकारून बॅंक तपशील या शिर्षकाखाली पेमेन्ट गेट-वे च्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया शुल्क भरण्याची सुविधा केलेली आहे. मुदतीत प्राप्त अर्जांच्या आधारे छाननीसाठी उपयुक्त असणारे अनेक प्रकारचे अहवाल प्रशासनास उपलब्ध होतात.अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा लक्षात घेता महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात नऊ क्षेत्रविभाग मंडळामार्फत मुंबई उपनगरांसह सर्व जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध घरबांधणी प्रकल्पाअंतर्गत निवार्‍याची उपलब्ध करण्याचे काम या प्राधिकरणामार्फत होते. गृहनिर्माण क्षेत्रात `म्हाडा’ ही सर्वात मोठी सार्वजनिक संस्था आहे.
म्हाडाच्या कार्यपद्धतीत एखादा प्रकल्प सुरू झाल्यावर प्रथम प्रस्तावित आराखडा मंजूर केला जातो, त्या प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध होणार्‍या सदनिकांची अत्यल्प उत्पन्न, अल्प, मध्यम व उच्च गटासाठी या प्रमाणे वर्गवारी केली जाते आणि त्या वर्गवारीनुसार जाहीरातीद्वारे सर्वसामान्य नागरिकांद्वारे अर्ज मागविले जातात. प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर अपात्र अर्ज फेटाळण्यात येतात आणि वैध अर्जांमधून लॉटरी पद्धतीने अंतिम यादी निवडण्यात येते. हजारोच्या संख्येने प्राथमिक अर्ज पाठवीले जातात अर्जांची स्वीकृती, छाननी, शासकिय आरक्षण नियमाप्रमाणे पात्र/अपात्र निवड व शुल्काचा ताळेबंद ही अत्यंत किचकट आणि वेळखाउ कामे पारंपारिक पद्धतीने करताना अनेक वाद आणि शंका उत्पन्न होउन प्रशासनावर अनेकवेळा या प्रक्रियेत दोषारोप ठेवले जातात आणि सामान्य नागरिक भरतीप्रक्रियेकडे साशंक नजरेने पाहात असतो.
म्हाडाची सदनिका प्रदान करण्याच्या प्रक्रियेत सन २०१० पासून माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे. ईंटीग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेन्ट सीस्टीम या ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृती, अर्ज छाननी, प्रक्रियाशुल्क स्विकारणे, शासनखाती जमा करणे आणि फेटाळण्यात आलेल्या अर्जांचे शुल्क परत करणे, लॉटरी पद्धतीने वैध अर्जांपैकी अंतिम निवड प्रक्रिया आणि घरांचा ताबा देणे ह्या सर्व प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत. ओपनसोर्स टेक्नॉलॉजी आणि ओरॅकल डाटाबेस वापरकरून बनविलेली ही प्रणाली नेटामॅजीक या मान्यताप्राप्त संस्थेच्या डाटा सेंटरवर प्रस्थापित केलेली आहे. या संकेतस्थळाचा पत्ता https://lottery.mhada.gov.in असा असून आय.आय.टी. प्रतिष्ठीत संस्थेमार्फत परिक्षण करण्यात आले आहे. सदर प्रणाली एस.एम.एस. गेट-वे आणि पेमेन्ट गेट-वे द्वारे जोडण्यात आलेली असून भविष्यात आधार कार्ड (यूआयडी)शी सल्ग्न करण्यात येणार आहे.
या प्रणालीचे तीन मुख्य भाग असून पहील्या भागात अर्ज स्वीकृती व छाननीच्या प्रक्रियेत प्रथम संबंधित प्रकल्पासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर “योजनेचा अर्ज” या शिर्षकाखाली ऑनलाईन अर्ज स्विकारले जातात, तसेच अर्ज कसा भरावा या संदर्भातील माहितीही या ठिकाणी देण्यात येते.
ऑनलाईन अर्ज स्वीकृतीमूळे एकसारखे नाव आणि पत्त्याच्या एकापेक्षा जास्त अर्ज भरणार्‍यांची वेगळी यादी उपलब्ध होत असून या द्वारे अर्जाची छाननी करून सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाते तसेच त्याबाबतची सूचना 'एसएमएस'च्या माध्यमातून अर्जदारांना दिली जाते. आपले नाव वा इतर तपशीलात काही दुरुस्ती असेल वा यादीत नाव नसेल तर अर्जदारांना 'म्हाडा'शी संपर्क साधत येतो.
एकत्रिकरण, ड्रॉ आणि प्रदान करण्याच्या प्रक्रियेसाठीच्या स्वतंत्र भागात ठरावीक योजनेच्या संबंधीत अर्जांचे एकत्रिकरण करून संगणकाद्वारे रॅन्डमायजेशन प्रक्रियेद्वारे लॉटरी काढून एकापेक्षा जास्त सोडतीत जिकलेल्या नावांची तपासणी होवून डूप्लीकेट नावे अंतिम यादीतून वगळण्यात येतात. प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षणानूसार निवड करून अंतिम निवडयादी आणि प्रतिक्षायादी तयार होते.
सोडतीनंतरच्या कार्यालयीन प्रक्रियेसाठी या प्रणालीत म्हाडा प्रशासनास अनेक उपयूक्त अहवाल तयार केले जातात. सर्व डाटा सुरक्षीत असल्यामूळे कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणांसाठी या प्रणालीतून आवश्यक ती माहीती प्रशासनास पुरवीण्यात येते. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामूळे कोणत्याही टप्प्यावर अर्जांची सद्यस्थिती प्रशासनास एक क्लीकसरशी उपलब्ध झाली आहे.
या प्रणालीद्वारे आजपर्यंत ११९७४२ अर्जांची प्रक्रिया पुर्ण केली असून, ऑनलाईन पेमेन्टद्वारे ९३५६६ सनदिका प्राप्त नागरीकांनी सुरक्षा ठेव रक्कम शासन खात्यात जमा केली तर १७६९७ अपात्र अर्जदारांना ईलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सफरद्वारे विहित कालावधीत रकमेचा परतावा करण्यात आला. य़ा प्रणालीत अर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून प्रत्येक अर्जदारास १००रू. आकारण्यात आले असून या रकमेतून या संगणक प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम होत आहे.


लेखक : सुनिल पोटेकर, potekarsun@yahoo.com

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate