मालमत्तेचे ख्ररेदी विक्री व्यवहार नोंदणी प्रक्रिया ही एकेकाळी खूपच वेळखाऊ होती. त्यामुळे नोंदणी मुद्रांक विभागाच्या कार्यालयासमोर व्यवहारासाठी आलेल्या लोकांचे घोळके जमा झालेले दिसायचे. आता अवघ्या पाच मिनिटात व्यवहार प्रक्रिया पूर्ण होत असल्याने जलद गतीने कामे होऊन लोकांचा वेळ वाचत आहे.
जळगाव जिल्हा मुख्यालयात एकूण तीन नोंदणी व मुद्रांक कार्यालये आहेत. त्यापैकी एक नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आहे. सन 2002 पासून हे कार्यालय कार्यान्वित झाले आहे. संपूर्ण राज्यात नोंदणी महानिदेशक पुणे यांच्या अधिपत्याखाली ही कार्यालये येतात. या कार्यालयांनी माहिती तंत्रज्ञानाचा अंगिकार केल्यापासून कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यभरात 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. जळगाव येथील कार्यालयाला 16 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला. त्यातून कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयाचा 'लूक' बदलला असून त्यात व्यवहार नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांना बसण्यासाठी आरामदायक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
दररोज या कार्यालयात सरासरी 15 ते 20 व्यवहारांच्या नोंदणी होते. तसेच अन्य कामांसाठीही लोकांची वर्दळ असते. त्यामुळे दररोज सुमारे 150 ते 200 लोक या ठिकाणी विविध कामांसाठी येत असतात. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे व्यवहार नोंदणी जलद होत असल्याने आता लोक लगेचच आपले काम आटोपून परतू शकतात. याठिकाणी एका वेळी 40 ते 50 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दीचे वातावरण बदलले आहे. आय सरिता, ई-पेमेंट, ई-सर्च, ई-स्टेपइन, ई एएसार, ई-नोंदणी, बारकोडचा वापर यामुळे सर्व व्यवहार आता पारदर्शक होतात. पक्षकार स्वतः स्वतःची डाटा एन्ट्री करु शकत असल्याने दस्त नोंदणी कमीतकमी वेळात होते. या सगळ्याचा परिणाम होऊन व्यवहार सुलभता आल्याने या कार्यालयाने दिलेल्या इष्टांकाच्या 35 टक्के उद्दीष्ट आताच पूर्ण केले आहे. नागरिकांना या व्यवहार नोंदणीप्रक्रियेचा अधिक सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in व https://gras.mahakosh.gov.in ही संकेतस्थळेही आहेत.
लेखक -मिलिंद मधुकर दुसाने. माहिती अधिकारी, जळगाव
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/15/2020
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...