অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल

प्रस्तावना

नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (NVSP) अर्थात राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचे राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजे 25 जानेवारी 2015 ला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in या संकेतस्थळावरुन मतदारांना सिंगल विंडो सेवा पुरवण्याचा NVSP चा उद्देश आहे. इच्छुक या संकेतस्थळावर क्लिक करून NVSP च्या लिंकवर गेल्यास त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल.

NVSP द्वारे या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

1)     मतदार यादीतल्या नावाचा शोध

2)    नव्यानं नोंदणी करण्यासाठी इंग्रजी/हिंदीमध्ये ऑनलाईन अर्ज

3)    त्यात दुरुस्त्या असल्यास त्यासाठी ऑनलाईन अर्ज

4)    वापरकर्ता आपलं मतदान केंद्र, विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदार संघ इत्यादी तपशील पाहू शकतो.

5)    मतदान केंद्र स्तरावरचा अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि इतर निवडणूक अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि त्या संदर्भातले तपशील वापरकर्त्याला मिळू शकतात.

6)    मतदान ओळखपत्राशी आधारक्रमांक जोडण्यासाठी वापरकर्ता, आधारक्रमांक देऊ शकतो.

7)    वापरकर्ता मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या संकेतस्थळाची लिंक घेऊ शकतो.

8)    मतदान प्रक्रियेविषयी माहिती मिळवण्यासाठी लघुपटही पाहता येईल.

9)    मतदान प्रक्रियेविषयी माहिती घेण्यासाठी ध्वनी चित्रफितीचा लेखी मसुदा

10) इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनविषयी माहितीपर लघुपटही वापरकर्ता पाहू शकतो.

2015 हे वर्ष सुलभ नोंदणी आणि सुलभ दुरुस्ती वर्ष आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मतदारांना सर्वतोपरी सेवा पुरवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे,NVSP हे त्यापैकीच एक आहे.

 

स्त्रोत : - पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate