অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हर्चुअल ट्रेजरी

व्हर्चुअल ट्रेजरी

वित्त विभागाच्या ई-पेमेंट व्यवस्थेची अंमलबजावणी या माहितीकरीता अवश्य भेट द्या http://www.mahakosh.in/ या संकेतस्थळाला. 

महाराष्ट्र शासनाचा कर व करेत्तर रकमा “इंटरनेट बँकींग” सुविधेचा वापर करुन करदात्यांना इलेक्ट्रॅनिक पध्दतीने भरता याव्यात, यासाठी शासन वित्त विभागाने “शासकीय जमा लेखांकन पध्दत” (GRAS) ही प्रणाली विकसित केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने इलेक्ट्रॉनिक पध्दतीने शासनाचा महसूल जमा करण्याचे म्हणजे ई-रिसिट म्हणून स्विकारण्याचे ठरविले आहे. यासाठी वित्त विभागाने शासकीय जमा लेखांकन प्रणालीच्या (ई-पेमेंट सिस्टीम) स्वरुपात अशी व्यवस्था विकसित व कार्यान्वित केली आहे की, ज्यायोगे करदात्यांस या संकेतस्थळाचा उपयोग करून ई-चलन भरणे व त्याचे ऑन लाईन प्रदान जमालेखांकन प्रणालीद्वारे करता येईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट मानकांतर्गत राष्ट्रीयकृत बँकेद्वारे प्रचलित प्रदानांच्या स्वरुपासोबत ई-पेमेंट हे अतिरिक्त स्वरूपाची प्रदान व्यवस्था आहे. हया व्यवस्थेअंतर्गत कोठूनही व कधीही प्रदानाची सोय उपलब्ध आहे. तसेच यशस्वीपणे व्यवहार पुर्ण झाल्यावर तात्काळ ऑन लाईन चलनाची सुविधा उपलब्ध आहे. या व्यवस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचे कर राष्ट्रीयकृतबँकेच्या इंटरनेट इनेबल अकाऊंटचा उपयोग करून ऑन लाईन चलन भरण्याची सोय आहे. .
ग्रासप्रणालीच्या गरजा, पध्दती आणि सुचविण्यात आलेला कार्यप्रवाह हा प्रचलित शासकीय जमा लेखांकन व कार्यकारी पध्दतीच्याअनुषंगाने विकसित करण्यात आला आहे. बहुतेक सर्व बँेकांनी ई-पेमेंट गेटवे सुविधा पुरविण्यास त्यांची स्विकृती दर्शविली आहे व त्यानुषंगाने बँकेकडील आज्ञावलीचे विकसन त्यांच्याशी विचारविनिमय करुन वित्त विभाग करीत आहे, आजपावेतो 5 बँकांनी या अशा स्वरूपाचे आवश्यक सॉफ्टवेअरसह विकसित करून ग्रास प्रणालीत सहभागी होण्यासाठी पुढाकर घेतला आहे.
सध्या ग्रासप्रणालीत खालील बँका सहभागी बँका म्हणून ई-पेमेंट गेट वे ची सुविधा पुरवितात. प्रत्यक्ष करांच्या रक्कमा करदात्यास ई-पेमेंटद्वारे ऑन लाईन भरता येतात. ही सुविधा मिळविण्या करीता करदात्यास कोणत्याही एका सहभागी अभिकर्ता बँकेत इंटरनेट इनेबल बँकींग स्वरूपाचे खाते असणे आवश्यक आहे.

बँकांची नावे

युनियन बँक ऑफ इंडीया.
इंडीयन ओव्हरसिज बँक.
बँक ऑफ इंडीया
बँक ऑफ बडोदा
आय डी बी आय
प्रदानाची वेळ :
“ई-पेमेंट” ही सुविधा 24 तास उपलब्ध असून ग्राहकास दिवसा वा रात्री कोणत्याही वेळेस प्रदान करता येईल.
सर्व प्रदाने जी रात्री 20.00 पर्यंत केली जातील ती त्या दिवसाची प्रदाने म्हणून गणली जातील व जी प्रदाने रात्री 20.00 वाजल्यानंतर केली जातील ती प्रदाने पुढील दिवसात गणली जातील.
ग्रास प्रणालीचे फायदे :-
ग्रास सहज व सोयीस्कररित्या वापरता येण्याजोगी प्रणाली आहे.
24 X 7 प्रदान करण्याची सोय उपलब्धत आहे.
व्यक्ती, संस्था किंवा शासकीय विभाग इ. यांना प्रदान करण्याची सुविधा आहे.
करांचे ऑन-लाईन प्रदानामुळे रांग आणि वेळेचा अपव्यय टळतो.
धनाकर्षासाठी द्यावे लागणारे कमिशन वाचते.
चलन ऑन-लाईन भरण्याची सुविधा आहे.
एकदा करदात्याने नोंदणी केली की, पुढील प्रदानापासून चलनाचे बहूतेक रकाने हे आपोआप भरले जातात, त्यामुळे वेळ वाचतो व चूका होत नाहीत.
कर प्रदानांच्या यादीमधून (ड्राप डाऊन लिस्ट) योग्य कर प्रकार निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
प्रदानानंतर तात्काळ ऑन लाईन चलन उपलब्ध होते.
तात्काळ ऑन लाईन (चलन) बँकेच्या व्यवहारक्रमांकासह तात्काळ उपलब्ध होते.
प्रचलित कर प्रदान करण्याच्या पध्दतीमध्ये करदात्यास तीन प्रतींमध्ये चलन भरावे लागते. परंतु राज्य शासनाचा कोणताही कर हा ई-चलन प्रदानाद्वारे केवळ एक चलन भरून करता येतो. त्यात प्रदात्याची कर प्रदनासंबधीची सर्व आवश्यक महत्वाची माहिती समाविष्ठ असते.
ही सुविधा कोण वापरु शकतो :
उपरोक्त सहभागी अभिकर्ता बँकेच्या कोणत्याही शाखेतील ग्राहक.
असा ग्राहक ज्यांच्यापाशी सहभागी अभिकर्ता बँकेत इंटरनेट इनेबल बँक खाते उपलब्ध आहे.
ई-पेमेंट पध्दती एकदा अवलंबिल्यावर परवानाधारक/वर्गणीदार/व्यापारी/इतर ग्राहक प्रत्येक प्रकारच्या प्रदानाची ऑन लाईन ई-चलन भरण्यास व ग्रासप्रणालीचा उपयोग करणाऱ्या बँकेच्या इंटरनेट बँकीग सुविधेद्वारे प्रदान करण्यास समर्थ ठरतो.ई-पेमेंट गेटवेद्वारे बँकांकडून दैनंदिन तत्वावर ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त झालेल्या जमाव्यवहारांचे ताळमेळ हे आपोआप घेतला जातो आणि संबंधीत महसूल जमेची माहिती वित्त विभागाच्या विविध उपयोगकर्त्यांना ऑन-लाईन उपलब्ध करुन देतील.ई-पेमेंट पध्दती ही ग्राहकांना बँकेच्या पेमेंट गेट वे शी महाराष्ट्र शासनाच्या कोषागारांशी आणि अधिदान व लेखा कार्यालयाशी ऑन लाईन पेमेंटसाठी संपर्क सुविधा उपलब्ध करून देते, जी वित्त विभागातही कार्यान्वित करण्यात आली आहे.

ई-चलन प्रदानाची कार्यपध्दती-
करदात्याने जमालेखांकनपध्दतीद्वारे (GRAS) ऑन-लाईन कर प्रदानासाठी संबधीत चलन निवडावे.
करदात्यांस इतर चलन तपशील भरण्यास मुभा देण्यात आली आहे. जसे लेखाशिर्ष ज्याअंतर्गत प्रदान करण्यात येत आहे, प्रदात्याचे नाव, पत्ता तसेच बँक जिच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे.
त्यानंतर चलन ईलेक्ट्रॉनिकली सादर करण्यात यावे.
अशाप्रकारे सदर माहिती ही खातरजमा करण्या करीता सिस्टिमद्वारे पुन:श्च विचारणा करण्यात येईल (Confirmation Screen) जर करदात्याने सदर माहिती योग्य असल्याची खातरजमा केली तर सिस्टिमद्वारे त्यास एक युनिक आयडेंटीफीकेशन नंबर (GRN - Government Reference Number) देण्यात येईल व त्यानंतर ­नेटबँकेच्या सहभागी अभिकर्ता बँक निवडीनुसार संकेत्स्थलाशी संपर्क साधला जाईल
नेट बँकेच्या संकेतस्थळावर गेल्यावर सहभागी अभिकर्ता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या आय डी / पासवर्डद्वारे करदात्याने लॉग इन करुन प्रदानाचा तपशील भरावा लागेल.
त्यानंतर प्रदानास/हमी सहमती द्यावी लागेल.
प्रदान प्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर प्रदानाचा तपशील असलेले GRN, Bank CIN, बँक शाखेचे नाव ज्याद्वारे प्रदान करण्यात आले त्यांचा तपशील दर्शणारे चलन दिसेल.
बँक व्यवहार क्रमांकासह ऑनलाईन चलन त्यानंतर उपलब्ध होईल.
नोंदणीकृत करदात्यास /प्रदान्कार्त्यास पूर्वीच्या प्रदानाचा तपशील पाहता किंवा तपासता येईल


माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate