जोधपुर ही पुर्वी मारवाड ची राजधानी होती. ह्या शहराला "निळे शहर" असेही म्हणतात. ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात त्यामुळे बरेचसे शहर निळे दिसते.
ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "मेहरानगढ किल्ला" व "जसवंत थडा".
ह्या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा ह्याने १४५८ मध्ये सुरु केले. हा किल्ला शहारापासुन ४०० फूटांच्या ऊंचीवर स्थित असुन चारही बाजूंनी ऊंच तटबंदिने सुरक्षित केलेला आहे. ह्या किल्ल्यावर आजही तुम्हाला तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात. ह्या किल्ल्याला एकूण ७ दरवाजे आहेत. ह्या किल्ल्यातले संग्रहालय हे राजस्थानातील काही प्रमुख संग्रहालयांपैकी एक मानले जाते.
छायाचित्रेपाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 8/29/2020