"पक्या नवा कॅमेरा घेतलाय तर टेस्ट करायला एक झक्कास ट्रिप मारुया.". मी आणि माझ्या मित्राने नविन कॅमेरे घेतल्यावर हा माझा कॉमेंट. मी आणि माझ्या मित्राने canon powershot S2 IS आणि Sony DSC H2 नविनच घेतले होते. एक नाल मिळाला म्हणून तीन नाल घेतले आणि चार नाल झाले म्हणून घोडा घेतला ह्या उक्तिप्रमाणे कुठे जायचे ह्याचा शोध सुरु झाला. त्यावेळी एप्रिल सुरु होता म्हणून हिमाचल प्रदेश चा बेत ठरविला आणि तयारी सुरु झाली. ट्रिप plan केल्यानंतर कळले की एका नालेची किंमत तीन नाल आणि घोडयापेक्षा जास्ती होती. असो...
दिवस पहिला: हैदराबाद वरून दिल्ली ची संध्याकाळची फ्लाईट पकडली. रात्रि ९ वाजता दिल्ली ला पोहोचलो. तिथुन शिमल्याला बस ने जाण्याचा विचार होता म्हणून बस स्टँड वर पोहोचलो. तोपर्यंत १० वाजले होते. तिथे कळले की शिमल्याची शेवटची बस ९ ला गेली. मग तिथुन चंडिगड ला जायचे आणी तेथुन शिमल्याला जायचे ठरले. दिल्ली ते चंडिगड ५ तास व चंडिगड ते शिमला ५ तास असा हा प्रवास आहे.
दिवस दुसरा: सकाळी ३ वाजता चंडिगड ला पोहोचलो आणि शिमल्याचे तिकिट काढले आणि शिमल्याच्या बस मध्ये जाउन बसलो. ती बस ४ ला सुटणार होति. बसल्या बसल्या गाढ झोपलो. बस कधी सुरु झाली ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा उजाडले होते आणि हिमालयाच्या रांगा सुरु झाल्या होत्या. तेव्हड्यात शिमल्याची खाली येणारी toy train दिसली. पुढचाच stop धरमपुर ला उतरलो आणि तिकिट काढुन toy train ची वाट बघत बसलो. १०-१५ मिनिटांनी toy train आली. हा एक झक्कास अनुभव आहे. मी माथेरान आणि उटी च्या toy train मध्ये बसलो आहे पण हिमालयातली toy train हा एक वेगळा अनुभव आहे. एका बाजुला हिमालयाच्या उत्तुंग हिरव्यागार रांगा आणि एका बाजुला खोल हिरवी दरी असे आलटुन पालटुन येत होते. गाडी छोटि आणि गर्दी पण कमी असल्यामुळे गाडीभर हिंडता येत होते. सर्व काही enjoy करत १० वाजता शिमल्याला पोहोचलो. train बस पेक्षा थोडि हळू चढते. शिमल्याला ला hotel घेतले, fresh झालो, ब्रेकफास्ट केला आणि taxi,घेतली. हा गडी आम्हाला शिमला दाखविणार होता. अतिशय निटनेटका आणि सुसंस्कॄत माणूस होता. आधी त्याने कुफ्री ला नेले. ही जागा सिमल्यापासून २५ km वर आहे. त्याने कुफ्री च्या २ km आधी गाडी थांबविली. पुढे वर तुम्हाला पायी किंवा घोड्याने जावे लागते. सर्व खडकाळ रस्ता आहे. घोडे किंवा तट्टू पण अडखळतच चालते. घसरले किंवा खाली पडले तर कपाळमोक्षच व्हायचा. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. वर छान पठार आहे. तिथुन लांबवर बर्फाच्छादित पर्वतांचे दॄश्य दिसते. एक छोटासा go karting चा track ही आहे. तिथे याक पण आहेत. पर्यटकांना पहायला आणि फोटो काढायाला म्हणून. ते पाहुन खाली परत आलो. मग सिमला university, simla valley, zoo असे सर्व काही पाहुन संध्याकाळी परत hotel वर आलो. फ्रेश होउन परत सिमल्याचा mall road पहायला बाहेर पडलो. हा रोड म्हणजे सिमल्याची बाजारपेठ. थोडी खरेदी केली, जेवण करून परत hotel वर आलो
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 1/30/2020
हिमाचल प्रदेश - ई शासन