अपुरा पैसा आणि कच्चे प्रयोजन यांद्वारे प्रयोगाधीष्ठीत विज्ञानाला न्यास देणे तसे कठीणच. तयार खेळणी अखेरीस कचर्यातच जातात, हे जगभरातील अनुभवांवरून कळून चुकलेलेच आहे. याच वेळी मुलांनी शिक्षकांच्या सहाय्याने बनवलेले प्रकल्पमात्र अभिनव ठरतात. आणि टिकतातही. सहजसाध्य साधनांपासून उपयुक्त आणि कलात्मक वैज्ञानिक प्रकल्प अगदी उत्तमरीत्या तयार केले जाऊ शकतात.
नियम कायदे आणि बोजड अभ्यासक्रम ध्येयवादी शिक्षकांना निराश करू शकत नाहीत. उलट यातूनच ते प्रेरणा घेतात.फळ्यासमोर खडू घेऊन शिकविण्याच्या पद्धतीतील मर्यादा त्यांना ठाऊक असतात. प्रयोग मुलांना आवडतात आणि प्रयोगांद्वारेच मुलांना उत्तम शिक्षण देत येऊ शकते,यावर त्यांचा विश्वास असतो. असे शिक्षक मुलांना या प्रयोगक्षम उपक्रमांत स्वत: सोबत घेऊन, सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, त्यांना नवे रूप देऊन त्यांच्यापासून नवनवीन खेळणे बनविण्यासाठी प्रेरित करतात. मुलांना खर्या अर्थाने कृतीशील बनविणारे पुस्तक आहे. ज्यांना अशा प्रकारचे विविध प्रयोग करण्याची आवड/ हौस आहे. अश्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. अधीक माहितीसाठी आपण पुढील लिंक वर क्लिक करून प्रयोगांची अधिक माहिती घेऊ शकता.
संदर्भ: अरविंद गुप्ते
स्त्रोत- अरविंद गुप्ते
अंतिम सुधारित : 6/8/2020
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या क...
प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृ...
तांत्रिकदृष्ट्या कोणताही खाद्यपदार्थ थोडा अणुकिरणो...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...