"ग गणिताचा - गणितातील गमती", लेखक अरविंद गुप्ता
लेखक हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधारक आहेत. त्यांचे विज्ञानविषयक उपक्रमांचे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांच्या "Matchstick Models and Other Science Experiments"
या पहिल्याच पुस्तकाचे १२ भारतीय भाषेत अनुवाद झाले आहेत.
पुणे विद्यापीठातील "आयुका" त मुलांसाठी असलेल्या विज्ञान केंद्रात २००३ पासून कार्यरत आहेत.
या पुस्तकातील रेखाटने रेश्मा बर्वे यांनी केली आहेत तर अनुवाद सुजाता गोडबोले यांनी केला आहे.
अशी एक म्हण आहे कि "कौशल्ये शिकवता येतात पण संकल्पना मात्र स्वताच समजून घ्याव्या लागतात.
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाही त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमातून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातूनच ते गणित शिकतात. या पुस्तकात गणित तज्ञांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समाज पक्की होईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: : http://www.arvindguptatoys.com
अंतिम सुधारित : 6/21/2020
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...