অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शैक्षणिक पुस्तके

प्रस्तावना

कोणत्याही बालकाच्या व्यक्तिमत्वाची जडण- घडण होत असताना  कुटुंब, शाळा व समाज हे तीन घटक महत्वाचे  असतात. मुलांचा महत्वाचा काळ हा शाळेत व्यतीत होत असतो. शिकण्याची प्रक्रिया हि कशी असावी, पद्धती कशी असावी याविषयी अनेक चर्चा केल्या जातात. शिक्षण औपचारीक असावे कि अनौपचारिक अश्या अनेक गोष्टींविषयी चर्चा सुरु आहेत. इंग्रजांनी लादलेली शिक्षण पद्धती अवलंबून गेल्या अनेक पिढ्यांचे नुकसान आपण केलेले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकीकडे आपण जास्तीजास्त ज्ञानेंद्रियांचा वापर शिक्षण घेण्यासाठी करायला सांगतो आणि दुसरीकडे पाठ्यक्रमावर आधारित चार भिंतींच्या आतील शिक्षण मुलांना देतो.हे कितपत योग्य आहे? शिक्षण हे जीवन शिक्षण असलं पाहिजे. मला आठवतंय आमच्या लहानपणी आमच्या मराठी शाळेच नाव ‘जीवन शिक्षण मंदिर’ असं होत. पण नंतर ते नाव पुसलं गेल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस बदलेल नाव आल.

परंतु आता एक सकारात्मक बदल या क्षेत्रात होताना दिसतोय. अनेक विचारवंत या क्षेत्रात कार्यरत आहेत. योग्य शिक्षणपद्धतीच एक चांगला माणूस, एक निकोप पिढी तयार करू शकते. यासाठी जगभरात अनेक लोकांनी काही प्रयोग केले , नवनवीन निरिक्षने नोदवून ठेवलेत ते सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा काही पुस्तकांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

पुस्तकाचे नाव - टीचर

मुळ लेखिका - सिल्विया ऑष्टन वॉर्नर,
मराठी अनुवाद – अरुण ठाकूर

“मावरी मुलांच्या बालवाडीत कुठलाही विषय शिकविणे म्हणजे जणू त्यांना दुसरया संस्कृतीशी जोडणाऱ्या एखाद्या लाकडी पुलाच्या निर्मितीतील एक एक फळी जोडत जाण्यासारखेच आहे. हा पूल जितका बळकट होईन तितकंमावरींची पुढच्या आयुष्यात यशस्वी ठरविण्याची शक्यताही बळकट होत जाईल.

बहुतेक मावरी मुले या संक्रमणात अपयशी ठरतात.कोवळ्या वयात एका संस्कृतीतून दुसर्या संस्कृतीत ढकलण्याच्या धक्क्यातून मुले सहसा सावरली जातच नाहीत. त्याचा परिणाम स्पष्टपणे व अबोधपणे जाणवत राहतो.याचमुळे शिक्षण प्रवाहात येणाऱ्या मावरींची संख्या रोडावते. जे शिकतात, तेही अनेकदा, मानसिक दुर्बलतेची शिकार होतात.एकूणच मावरी मुले शिक्षनात मागेच पडत जातात.”

न्यूझीलंड सारख्या मागास देशात आदिवासी समूहांबरोबर जिद्दीने काम करणाऱ्या शिक्षिकेची हि कहाणी, नक्कीच शिकवण्याची आणि शिकण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल.

पुस्तकाचे नाव - तोत्तोचान

लेखिका - तेत्सुको कुरोयानागी

अनुवाद – चेतना सरदेशमुख गोसावी

जपानमध्ये तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायशी यांच्याबद्दल लिहिलेले हे पुस्तक. तोमोई हि तोत्तोचांची शाळा आणि कोबायशी हे त्याचे कल्पक मुख्याध्यापक. तोत्तोचान हि छोटीशी चिमुरडी, शाळेच्या चार भिंतीत न रमणारी. इतर शाळांतून शिक्षकानी तिला त्रासून शाळेतून काढून टाकलय. योगायोगाने तिला कोबायशोची शाळा भेटते आणि तीच जीवनच बदलून जात. हि गोष्ट कुठेही कल्पनेतली नाही तर प्रत्यक्षात घडलेली आहे.

बाईंच शिकवण सोडून चिमण्याच खेळ पाहत बसणारी तोत्तोचान, रोजच्या वेळेत रस्त्याने जाणार्या ब्यांडवाल्यांची वाट पाहणारी आणि संपूर्ण वर्गाला सोबत घेऊन त्यांची मजा घेणारी तोत्तोचान. साहजिकच शाळेतून काढून दिली जाते आणि मग तिला तोमोई भेटते. रेल्वेच्या डब्यात भरणारे वर्ग, भूतांची भीती घालवण्यासाठी मुलांनाच भुताचे वेश घालून रात्रीची पडक्या विहिरीकडे केलेली सफर. आणखी खूप काही काही. मुलाचं भावविश्व आणि शिकण्याची उत्मी समजून घेण्यासाठी वाचायलाच हव.

“आता तू या शाळेची”हे मुख्याध्यापकाकडून ऐकल्यावर दुसर्या दिवशीची वाट पाहन तोत्तोचानला कठीण झाल होत.यापूर्वी कुठल्याच दिवसाची तीन इतकी उत्कंठतेने वाट पहिली नव्हती. छोट्या तोत्तोचानन तोमोई मधाळ ते वातावरण अनुभवलं होत.

कालची चिमुरडी तोत्तोचान आज जपान मधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानागी म्हणून ओळखली जाते. तिच्या शाळेबद्दल ती खूप काही सांगत राही.

पुस्तकाचे नाव - दिवास्वप्न

लेखक - काशिनाथ त्रिवेदी

शाळेतील पाठ्यक्रम आणि प्रचलित अध्ययन पद्धतीत न रमणाऱ्या प्रयोगशील शिक्षकची हि कथा.

पुस्तकातील काही भाग

मैं कक्षा में आया और लडकों से कहा-‘आज अब और काम नहीं करेंगे। कल अपना नया काम शुरू होगा। आज तो तुम सब छुट्टी मनाओ।’ ‘छुट्टी’ शब्द सुनते ही लड़के ‘हो-हो’ करके कमरे से बाहर निकले और सारे स्कूल में खलबली मच गई। सारा वतावरण ‘छुट्टी, छुट्टी, छुट्टी’ के शब्दों से गूंज उठा। लड़के उछलते-कूदते और छलाँग भरते घरों की तरफ भागने लगे।

दूसरे शिक्षक और विद्यार्थी ताकते रह गए। ‘यह क्या है ?’ प्रधानाध्यापक एकदम मेरे पास आए और ज़रा भौहें तानकर बोले-‘आपने इन्हें छुट्टी कैसै दे दी ? अभी तो दो घंटों की देर है।’

मैंने कहा-‘जी, लड़कों की आज इच्छा नहीं थी। वे आज अव्यवस्थित भी थे शान्ति के खेल मैं मैंने यह अनुभव किया था।’
प्रधानाध्यापक ने कड़ी आवाज में कहा-‘लेकिन इस तरह आप बगैर मुझसे पूछे छुट्टी नहीं दे सकते। एक कक्षा के लड़के घर चले जाएँगे तो दूसरे कैसे पढ़ेंगे ? आपके ये प्रयोग यहाँ नहीं चलने वाले।’
उन्होंने ज़रा रोष में आकर फिर कहा-‘अपनी यह इच्छा-विच्छा रहने दीजिए शान्ति का खेल तो होता है मोंटेसरी शाला में। यहाँ प्राथमिक पाठशाला में तो चट तमाचा मारा नहीं और पट सब चुप नहीं ! और फिर नियामानुसार सब पढ़ते-पढ़ाते है। आप उसी तरह पढ़ायेंगे तो बारह महीनों में कोई परिणाम नजर आएगा। आज का दिन तो यों ही गया, और उल्लू बने, सो अलग।’

मुझे अपने प्रधानाध्यापक पर दया आई। मैंने कहा-‘साहब, तमाचा मारकर पढ़ाने का काम तो दूसरे सब कर ही रहे है और उसका फल मैं तो यह देख रहा हूँ कि लड़के बेहद असभ्य, जंगली, अशान्त और अव्यवस्थित हो चुके है। मैंने तो यह भी देख लिया है कि इन चार वर्षों की शिक्षा में लड़कों ने तालियाँ बजाना और, ‘हा, हा,’ ‘हू, हू,’ करना ही सीखा है ! उन्हें अपनी पाठशाला से प्रेम तो है ही नहीं। छुट्टी का नाम सुना नहीं कि उछलते-कूदते भाग गए !’

प्रधानाध्यापक बोले-‘तो अब आप क्या करते है, सो हम देख लेंगे।’
मैं धीमे पैरों और बैठे दिल से घर लौटा। लेटे-लेटे मैं सोचने लगा-काम बेशक मुश्किल है ! लेकिन इसी में मेरी सच्ची परीक्षा है। चिन्ता नहीं। हिम्मत नहीं हारनी चाहिए। इस तरह कहीं ‘शान्ति का खेल’ होता है ? मोंटेसरी-पद्धति में इसके लिए शुरू से कितनी तालीम दी जाती है ? मैं भी कितना मूर्ख हूँ जो पहले ही दिन से यह काम शुरू कर दिया ! पहले मुझे उन लोगों से थोड़ा परिचय बढ़ाना चाहिए। मेरे लिए उनके दिल में कुछ प्रेम और रस पैदा होना चाहिए। तब कहीं जाकर वे मेरा कुछ कहना मानेंगे। जहाँ पढ़ाई नहीं, बल्कि छुट्टी प्यारी है, वहाँ काम करने के माने है, भगीरथ का गंगा को लाना !
दूसरे दिन के काम की बातें निश्चित कीं और मैं सो गया। रात तो आज के और अगले दिन के काम के सपने देखने में ही बीत गई !

माहिती दाता : नीलिमा जोरवर

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate