महाराष्ट्र विद्यापीठ कायदा , १९८९ च्या अंतर्गत १५ ऑगस्ट, १९९० रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
महाराष्ट्र शासनाने दि. १८ सप्टेंबर १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी महाकवी कालिदासाच्या चिरस्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.
ज्ञानगंगा घरोघरी हे बोधवाक्य घेऊन नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील एक मैलाचा दगड ठरणारी घटना घडली.
कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली.
औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा विद्यापीठ स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 1958 रोजी झाले.
देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला
मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक अग्रेसर विद्यापीठ असून भारतातील पहिल्या तीन विद्यापीठ्यांपैकी एक असा मान मुंबई विद्यापीठाने पटकावला आहे.
नागपुर विद्यपीठाची स्थापना ५ आगस्ट १९२३ रोजी ६ संलंग्न महविद्यालये व ९२७ विद्यार्थ्यांसह झाली.
मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेवून परभणी येथे १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी दि. 18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली.
महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
1 मे, 1983 महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवशी अमरावती विद्यापीठाची स्थापना पश्चिम विदर्भाचे विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती येथे झाली.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत.
पुणे विद्यापीठ जगातील एक अत्यंत मोठे व सुप्रसिद्ध विद्यापीठ आहे. विद्यापीठात सुमारे 6.5 लाख विद्यार्थी, 42 शैक्षणिक विभाग, 12 आंतरविद्याशाखा व केंद्र, 6 स्वायत्त यूनिट्स, 6 अन्य शैक्षणिक व सेवा यूनिट्स, 20 अध्यासने, 8 राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत.
"विद्यया संपन्नता" हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना 22 जुलै, 2004 रोजी झाली
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 1994 रोजी झाली.