रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांचा फायदा घेण्यासाठी उद्योजकाने स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे.
विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे व नागरिकांनी अशा कामगारांशी संपर्क साधण्यासाठीचे उत्तम माध्यम होय.
नोकरीउत्सुक उमेदवारांना नाव नोंदणी, नोंदणीचे अद्यावतीकरण ऑनलाईन करण्याची सुविधा
तंत्र शिक्षणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसारामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधे साठी १९८६ मध्ये व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यास क्रमाच्या अंमलबजावणीसाठी व्यवसाय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली.
या प्रशिक्षण केंद्राव्दारे आदिवासी युवकांना स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करणे व विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेणे, तसेच त्यांच्या उपजत क्षमतांचा शोध घेण्यास मदत करण्यात येते.
प्रतिदिन वाढत असलेल्या मनुष्यबळास कौशल्याधारित प्रशिक्षण देउन त्यांच्या सर्वांगीण कौशल्यामध्ये वाढ करणे, हा या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पदे व उमेदवार निवडीचे वेळापत्रक ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे.
नोकरीउत्सुक उमेदवारांच्या सहकारी सेवा संस्था स्थापन करुन,त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे.
उमेदवार व उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवा त्यांच्या दारापर्यंत देण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्रामध्यॆ उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
नोकरीउत्सुक उमेदवार तसेच समाजातील कोणताही प्रेरित घटक यांचेकरिता सध्या कार्यरत असलेल्या योजनांबाबतची माहिती येथे उपलब्ध आहे.