অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नोकरीउत्‍सुक उमेदवारांकरिता उपलब्‍ध सेवा

नोकरीउत्‍सुक उमेदवारांकरिता उपलब्‍ध सेवा

नोकरीउत्‍सुक उमेदवारांकरिता उपलब्‍ध सेवा

 

  • नोकरीउत्‍सुक उमेदवारांना नाव नोंदणी, नोंदणीचे अद्यावतीकरण ऑनलाईन करण्‍याची सुविधा
  • कायम / तात्‍पुरत्‍या नोक-यांबाबत तसेच रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रमांतर्गत उपलब्‍ध रिक्‍तपदे, रोजगार मेळावा वेळापत्रक ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.
  • ४८,००० व त्‍यापेक्षा अधिक शासकीय / खाजगी क्षेत्रातील उद्योजकांकडील नोकर भरतीसंदर्भातील जाहिराती ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा
  • बहुविध शोधांव्दारे अनुरुप व सोईस्‍कर रिक्‍तपदांचा शोध ऑनलाईन घेण्‍याची सुविधा.
  • शैक्षणिक पात्रता, कौशल्‍य, अनुभव आणि ठिकाणानुसार असलेल्‍या बहुविध शोधांच्‍या माध्‍यमातून अनुरुप रिक्‍तपदे ऑनलाईन शोधण्‍याची सुविधा.
  • शैक्षणिक गुणवत्‍तेविषयीची वैयक्तिक माहिती (CV's) तयार करण्‍याची सुविधा.
  • वैयक्तिक पेज लेट (वैयक्तिक माहिती, पाठवणीबाबतची माहिती, मूल्‍य निर्धारण निकाल, कौशल्‍य प्रशिक्षण इ. बाबतची माहिती) ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.
  • नोकरीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्‍याची सुविधा.
  • मूल्‍यनिर्धारण, समुपदेशन, रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम, प्रशिक्षण इ. चे वेळापत्रक पाहण्‍याकरिता व सहभाग नोंदविण्‍याकरिता ऑनलाईन सुविधा.
  • अनुरुप रिक्‍तपदांची माहिती, रोजगार मेळावे वेळापत्रक, पाठवणी तपशील, मुलाखतींबाबचे वेळापत्रक तसेच निवडीबाबतची माहिती इ. SMS व E-mail व्दारे मिळण्‍याची सुविधा.
  • विभागाव्दारे राबविल्या जाणा-या रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, रोजगार मेळावे, कौशल्य विकास कार्यक्रम, सेवा सोसायटी, व्यवसाय मार्गदर्शन, स्वयंरोजगार इ. योजनांबाबतची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा.


या सुविधांचा लाभ घेण्‍याकरिता आजच नोंदणी करा. अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्‍यास Log In करा.

सूचना

  • नोंदणीचा अर्ज पूर्णपणे तसेच काळजीपूर्वक भरा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता, कौशल्‍ये आणि अनुभवाची अचूक नोंद करा.
  • वेळेत संपर्क साधण्‍याकरिता कृपया आपला पत्रव्‍यवहाराचा पत्‍ता, दूरध्‍वनी क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक तसेच ई-मेल आयडी अचूकपणे नोंदवा.
  • विभागाच्‍या विविध सेवा आणि अनुरुप रिक्‍तपदांची माहिती घेण्‍याकरिता आपली वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्यावत करा.
  • तुम्‍हांस अवगत करण्‍यात येते की या विभागांच्या मुल्यवर्धित सेवा घेण्याकरिता वर्षातून किमान एक वेळा तरी लॉगीन होणे आवश्यक आहे.
  • आमच्‍या सेवा घेण्‍याकरिता कृपया आपला नोंदणी क्रमांक, वापरकर्ता नांव आणि सांकेतांक (युझर आयडी आणि पासवर्ड) लक्षांत ठेवा.

आपण आपली नोंदणी वेबपोर्टल, शासकीय तंत्र माध्यमीक शाळा, शासकीय तंत्र निकेतन, शासकीय आभियांत्रीकी महाविद्यालये, महा ई-सेवा केंद्रे, हॅण्‍ड हेल्‍ड ऑपरेटर तसेच जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रे येथून करु शकता.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate