पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याने केवळ पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही,पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही तर यामुळे सामाजिक समरसता निर्माण होते महिला विकासाला गती मिळते .लघु पतपुरवठा तसेच 'मिळते .लघु पतपुरवठा तसेच 'पाणलोटावर आधारित पुढील प्रक्रियांना उपक्रमांना मदत होते .गुंजाळवाडी हे संगमनेर जवळच छोटस गाव .गुंजाळवाडीमध्ये पाणलोटाच्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात थेट बदल झाले .शिक्षकांचे तळमळीचे प्रयत्न कारणी लागून उत्साही विद्यार्थ्यांनी नुसती पाणलोटाची संकल्पनाच जाणून घेतली अस नव्हे तर शाळेभोवतीचा परिसर हि अमुलाग्र बदलवण्यात आपला वाट उचलला .ह्या संबंधी सर्व कामात विद्यार्थ्यांनी सहभाग दिला आणि पाणलोटाच्या कामातून मिळालेल्या पैशांच्या आधारे स्वयंपूर्ण आणि निरंतरता असणारे एक उदाहरण निर्मिले .
पर्यावरण शिक्षणाचा विषय हसत खेळत पण परिणामकारकपणे कसा शिकवला जाऊ शकतो,जबाबदार नागरिकांची पुढील पिढी कशाप्रकारे जोपासली जाऊ शकते याचा वस्तूपाठच जणू या ध्वनी चित्रफिती मधून मिळतो .
स्त्रोत -वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020