प्राथमिक शिक्षण परिदृश्य
महाराष्ट्रात शिक्षणाच्या महत्वाबाबत पुरेशी जागरूकता असून, या आघाडीवर राज्य दिवसागणिक प्रगती करत आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय साक्षरतेच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. तसेच 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र, हे साक्षरतेच्या बाबतीत देशातले दुस-या क्रमांकावरचे राज्य आहे. पुरूषांमधील साक्षरतेचे प्रमाण सुमारे 90 टक्क्यापर्यंत पोहोचले असून महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
साक्षरतेच्या संदर्भात लिंग अनुपातातील विषमतेचे प्रमाणही घटते आहे. 2001 ते 2010 या कालावधीत राज्यातील शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि शाळेत प्रवेश घेणा-यांच्या आकडेवारीतही भर पडली आहे. लिंग अनुपातातील विषमतेचे प्रमाण प्राथमिक स्तरावर 6 % पेक्षा कमी असले तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर ते 15 % पेक्षा जास्त आहे.
बहुतेक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानामुळे प्राथमिक पायाभूत सुविधांची स्थिती सुधारली आहे. सुमारे 95 % शाळांमध्ये विद्यार्थी : शिक्षक प्रमाणही 1:40 पेक्षा कमी आहे. मात्र अध्ययनातील यशस्वितेचा स्तर हे राज्यासमोरचे मोठे आव्हान आहे.
साक्षरतेचा दर
साक्षरतेचा दर (टक्केवारी) (7 वर्षे आणि त्याहून अधिक व्यक्ती पुरूष महिला) |
विद्यार्थी शिक्षक प्रमाण |
महिला शिक्षकांची टक्केवारी |
एकशिक्षकी शाळांची टक्केवारी |
प्राथमिक स्तर प्रवेशावेळी लिंग अनुपातातील विषमतेचे प्रमाण |
उच्च प्राथमिक स्तर प्रवेशावेळी लिंग अनुपातातील विषमतेचे प्रमाण |
व्यक्ती |
पुरूष |
महिला |
82.91 |
89.82 |
75.48 |
30.13 |
44.42 |
3.31 |
5.75 |
6.42 |
2010-11 वर्षातील प्राथमिक शाळा आणि पायाभूत सुविधा:-
2010-11 या वर्षात राज्यात 97,256 प्राथमिक शाळा होत्या, त्यापैकी 49,085 प्राथमिक, 48,171 उच्च प्राथमिक तर 5595 शाळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक होत्या. यात 67,241 (69%) शाळा शासनचलित तर 30,015 (31%) शाळा खाजगी होत्या. प्राथमिक ते उच्च प्राथमिक शाळांचे प्रमाण 1:64 असून ते मानक - 2 पेक्षा कमी होते.
शाळेबाहेरील बालके (6 ते 13 आणि अधिक वर्षे वय)
2009 (टक्केवारी)- MHRD 2009 साली केंद्र सरकारने IMRB-SRI अंतर्गत शाळांबाहेरील मुलांचे नमुना सर्वेक्षण केले. त्यानुसार देशात 6-13 वर्षे वयोगटातील सुमारे 81.51 लाख (4.28%) मुले शाळेबाहेरील असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्रात शाळेबाहेरच्या मुलांची संख्या अंदाजे 2,07,345 (1.27%) इतकी होती, हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत फारच कमी होते. या शाळेबाहेरील मुलांमध्ये 59 % मुलांनी शाळेत कधीच प्रवेश घेतला नव्हता तर 41 % मुले शाळेतून गळती झालेले विद्यार्थी होते.
- 26.75% विकलांग मुले शाळेबाहेर होती
- मुलांच्या शिक्षणामध्ये वय, सामाजिक गट, दारिद्र्यरेषेखालील असे घटक महत्वाची तर विकलांगता हा घटक फारच महत्वाची भूमिका बजावतो.
भारतातील शाळेबाहेरील मुले (6-13 वर्षे) = 81.51 लाख(4.28%) |
महाराष्ट्रातील शाळेबाहेरील मुले (6-13 वर्षे) = 207,345 (1.27%) |
प्रवेश न घेतलेली = 59% |
गळती झालेली = 41% |
प्राथमिक शिक्षणावरील खर्च:-
प्रत्येक विद्यार्थ्यांवर प्रतिवर्षी प्राथमिक शिक्षणासाठी 1696 रू., उच्च प्राथमिक शिक्षणासाठी 2,400 रू. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी 4,157 रू. खर्च केले जातात. या खर्चात ट्यूशन फी, खाजगी शिकवणी, गणवेष, अध्ययन साहित्य आणि वाहतुकीचा समावेश आहे. (NSSO 2007-2008, सर्वेक्षणाची 64 वी फेरी, अहवाल क्र.532)
- राज्य शासनाने 2011-12 या वर्षात शालेय शिक्षणासाठी 26,443.63 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. (प्राथमिक शिक्षणासाठी 13,670.16 कोटी रूपये आणि माध्यमिक शिक्षणासाठी 12,773.47 कोटी रूपये)
- 1998-99 साली महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणासाठी एकूण अंदाजपत्रकापैकी 20.47 % तरतूद केली होती. 2004-05 या वर्षात या तरतुदीत घट होऊन ती 11.82 % वर पोहोचली आणि 2009-10 या वर्षात ती 14.19 % वर पोहोचली.
- 2005-06 या वर्षात सर्व शिक्षा अभियानावर 604.58 कोटी रूपये खर्च झाले. 2010-11 या वर्षात ही रक्कम 1378.72 कोटी रूपये इतकी वाढली.
- सर्व शिक्षा अभियानांतर्गत 2010-11 या वर्षात एकूण तरतुदीच्या 66.37 % (2077.44 कोटी रूपये) मंजूर.
महाराष्ट्रातील शिक्षणाचा आकृतीबंध:-
राज्यासाठी शिक्षण-10+2+5 (15 वर्षांच्या शिक्षणानंतर पहिली पदवी) प्रारंभीच्या 10 वर्षांत शालेय शिक्षण , त्यापैकी पहिली 4 वर्षे प्राथमिक स्तर त्यानंतर 3 वर्षे उच्च प्राथमिक स्तर आणि नंतर ३ वर्षे माध्यमिक शिक्षण स्तरानंतर इयत्ता 10 वी ची परीक्षा. दहावीनंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा. राज्याचे RTE नियम 2011, 11 ऑक्टोबर 2011 रोजी अधिसूचित झाले आणि लवकरच 5+3+2+2+3 हा प्राथमिक आकृतीबंध स्वीकारला जाईल
शैक्षणिक क्षेत्रानुसार जिल्हे, DIET आणि महानगरपालिका
महाराष्ट्रात 8 शैक्षणिक विभाग, 35 जिल्हे, 33 DIET आणि 24 महानगरपालिका आहेत. त्यांचे तपशील पुढीलप्रमाणे-:
अ.क्र. |
शैक्षणिक विभाग |
जिल्हा |
DIETs |
महापालिका |
1. |
औरंगाबाद |
औरंगाबाद |
औरंगाबाद |
औरंगाबाद |
जालना |
जालना |
|
परभणी |
परभणी |
हिंगोली |
हिंगोली |
बीड |
अंबेजोगाई |
2. |
लातूर |
लातूर |
मुरूड |
लातूर |
उस्मानाबाद |
उस्मानाबाद |
नांदेड |
नांदेड |
नांदेड-वाघाळा |
3. |
नागपूर |
नागपूर |
नागपूर |
नागपूर |
वर्धा |
वर्धा |
|
चंद्रपूर |
चंद्रपूर |
भंडारा |
भंडारा |
गोदिंया |
गोदिंया |
गडचिरोली |
गडचिरोली |
4. |
अमरावती |
अमरावती |
अमरावती |
अमरावती |
अकोला |
अकोला |
अकोला |
वाशिम |
वाशिम |
|
बुलडाणा |
बुलडाणा |
यवतमाळ |
यवतमाळ |
5 |
नाशिक |
नाशिक |
नाशिक |
नाशिक |
मालेगाव |
धुळे |
धुळे |
धुळे |
नंदुरबार |
नंदुरबार |
|
जळगाव |
जळगाव |
जळगाव |
6. |
पुणे |
पुणे |
लोणी काळभोर |
पुणे |
पिंपरी-चिंचवड |
अहमदनगर |
संगमनेर |
अहमदनगर |
सोलापूर |
सोलापूर |
सोलापूर |
7. |
कोल्हापूर |
कोल्हापूर |
कोल्हापूर |
कोल्हापूर |
सातारा |
फलटण |
|
सांगली |
सांगली |
सांगली-मिरज- कुपवाड |
रत्नागिरी |
रत्नागिरी |
|
सिंधुदुर्ग |
सिंधुदुर्ग |
8. |
मुंबई |
ठाणे |
जव्हार |
ठाणे |
कल्याण-डोंबिवली |
उल्हासनगर |
नवी मुंबई |
भिवंडी-निझामपूर |
मिरा-भाईंदर |
वसई-विरार |
रायगड |
पनवेल |
|
मुंबई(शहर) |
|
मुंबई |
मुंबई (उपनगर) |
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/elementaryEducation.aspx?ID=1