डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचे अनेक पैलू पडतात. कृषिरत्न, कृषकांचे कैवारी, समाजसुधारक शिक्षण महर्षी अशा अनेक उपाधींनी नटलेल्या या महापुरुषाला स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री बनण्याचा मानही मिळाला आहे. भारतीय शेतकरी हा देशाचे वैभव आहे. खरा भारत खेड्यात आहे म्हणून खेड्याकडे चला असे महात्मा गांधी नेहमी म्हणत तर भारताचा शेतकरी बलवान धनवान, ज्ञानवान, शिलवान व्हावा, असे डॉ. पंजाबराव यांचे विचार होते.
सरकारीकरणाकडून खासगीकरणाकडे, खासगीकरणाकडून सहकारीकरणाकडे, प्रगत ज्ञानातून उन्नतीकडे हे तत्त्व देशाला प्रगती पथावर नेऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. या विश्वासावरच त्यांनी कृषक समाजाची स्थापना केली. कृषक समाजाने 1955 पासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम व सन्मान मिळविले आहेत. त्यांनी 1960 मध्ये जगातील पहिले कृषिप्रदर्शन दिल्ली येथे आयोजित केले होते.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अमेरिकेचे व रशियाचे राष्ट्राध्यक्ष आवर्जून उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या झोपडीत शिक्षणाचा प्रकाश जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी पेटून उठणार नाही, या तळमळीतून डॉ. पंजाबराव यांनी समाजप्रबोधन, समाज परिवर्तन यासाठी शिक्षणक्रांती घडविली. त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
संपूर्ण विदर्भात या संस्थेचे जाळे विणून त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरांत पदवीधर निर्माण केले. त्याग, समृद्धी, ज्ञान आणि सेवा यातून राष्ट्राची उभारणी होते. हे त्यांनी समप्रमाण सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आज शेतकरी, त्यांचे पुत्र शिक्षण घेऊन प्राध्यापक, प्राचार्य, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, आमदार, खासदार झालेत.
आता या पुत्रांनी जन्मदात्या समाजाची व्यथा जाणून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहावे ही इच्छा ! डॉ. पंजाबराव देशमुख त्यांच्या स्फूर्तिदायक जीवन प्रणालीतून शैक्षणिक, सामाजिक, कृषी व राजकीय क्षेत्रांतील भरीव कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट शेतीविषयक कार्य करणाऱ्याला त्यांच्या नावाने "डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न' हा पुरस्कार दिला जातो. हा एक प्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
नाना पाटील, मु. पिंप्रीखुर्द, ता. चाळीसगांव, जि. जळगाव.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. ल...
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही त...
अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष...