सिंधूच्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या उपनद्यांनी बनलेला दुआब म्हणजेच पंजाब होय.
भारतातील उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी लखनौ असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,40,928 इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 19,95,81,477 इतकी आहे. राज्याची साक्षरता 69.72 टक्के आहे.
चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी चंदीगड हे शहर असून या प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 114 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार प्रदेशाची लोकसंख्या 10,54,686 इतकी आहे. या प्रदेशाची साक्षरता 86.43 टक्के आहे.
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे शहर असून प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 1,483 चौरस किमी इतके आहे. दंतकथेनुसार दिल्ली या शहराची स्थापना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूवी झाली आहे.
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे शहर असून प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 1,483 चौरस किमी इतके आहे. दंतकथेनुसार दिल्ली या शहराची स्थापना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूवी झाली आहे. 1911 मध्ये इंग्रजांनी भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थलांतरीत केली.
अंग : बिहार राज्यातील बौद्धकालीन सोळा महाजनपदांपैकी एक विख्यात देश. नामव्युत्पत्तीबाबत मतांतरे आहेत, तथापि लोकसमूहावरून देशास हे नाव मिळाले असावे. प्राचीन संस्कृत, पाली व प्राकृत साहित्यामध्ये या देशाविषयी अनेक निर्देश आहेत.
अंजदीव : कर्नाटक राज्यातील कारवार बंदराच्या आठ किमी नैर्ऋत्येस, अक्षांश १४० ४५’ उ. व रेखांश ७४० १०’ पू. या ठिकाणी सव्वा चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले बेट. १९६१ पर्यंत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते.
अंजार : गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात कांडला-भूज लोहमार्गावर कांडलापासून २५ किमी. व भूजच्या आग्नेयीस ४२ किमी. वरील तालुक्याचा गाव. लोकसंख्या २७,२९२ (१९७१). नवव्या शतकारंभी अजमेरच्या चौहान राजाचा निर्वासित झालेला भाऊ अजयपाळ येथे येऊन तपस्वी वृत्तीने राहिला; त्याच्यावरूनच या गावाचे नाव पडले, असे म्हणतात.
अंदमान व निकोबार : बंगालच्या उपसागरात उ. अक्षांश ६० ४५’ ते १३० ४५’ व पू. रेखांश ९२० १५’ ते ९४०१३’ यांच्या दरम्यान वसलेला भारताचा केंद्रशासित प्रदेश. अंदमान (६,३४०) व निकोबार (१,९५३) मिळून एकूण क्षेत्रफळ ८,२९३ चौ.किमी. व लोकसंख्या ११५,०९० (१९७१). याच्या पूर्वेकडील समुद्रास ‘अंदमान समुद्र’ म्हणतात.
अंबाला : हरियाणा राज्यामधील जिल्ह्याचे ठिकाण व भारतातील एक महत्त्वाचे लष्करी ठाणे. लोकसंख्या कँटोन्मेंट १,०२,५१९ व शहर ८३,६४९ (१९७१). दिल्ली-पठाणकोट रेल्वेमार्गांवर दिल्लीपासून उत्तरेस १९८ किमी. वर अंबाला कँटोन्मेंट असून २०५ किमी. वर अंबाला शहर आहे.
अगरतला : सध्याच्या केंद्रशासित त्रिपुरा प्रदेशाची व पूर्वीच्या टिपेरा संस्थानची राजधानी. लोकसंख्या ५९,६८२ (१९७१). येथील तपमान १० ° ते ३० ° से. व सरासरी वार्षिक पर्जन्य २०० सेंमी आहे. आसामच्या काचार जिल्ह्यातील कलकालिघाट स्थानकापासून त्रिपुरा प्रदेशाच्या उत्तर भागातील धर्मनगरपर्यंत लोहमार्गाचा एक फाटा आहे.
अजमीर (अजमेर) : राजस्थान राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर. लोकसंख्या २,६२,४८० (१९७१). अरवलीशाखांपैकी तारागड डोंगराच्या पायथ्याशी, अनासागर तलावाकाठी ते वसलेले आहे. अजयमेरूवरून इ.स. १४५ मध्ये नाव पडले असावे.
अधोणी : आंध्रप्रदेश राजाच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तालुक्याचे शहर. लोकसंख्या ८५,३१४ (१९७१). येथील तपमान २२.५० ते १७.५० से. व वार्षिक पर्जन्य सरासरी ६० सेंमी. आहे. येथील लोकसंख्येपैकी सु. १/३ मुसलमान आहेत. येथे प्रामुख्याने तेलुगू व कानडी भाषा बोलल्या जातात.
जम्मू-काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण.
अनुराधपुर : श्रीलंकेमधील एक शहर. लोकसंख्या ३०,००० (१९६८). प्राचीन बौद्ध अवशेषांकरिता व भिक्षूंचे यात्रास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ते कोलंबो-जाफना लोहमार्गावर आरूव्ही नदीकाठी, कोलंबोच्या ईशान्येस १७२ किमी. वर वसले आहे. सध्या ते जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून उत्तर-मध्य प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्यामुळे आजचे अनुराधपुर हे सर्व आधुनिक सुखसोयींनी अद्यावत शहर बनले आहे.
अनूपदेश : प्राचीन भारतातील एक देश. सागराच्या अथवा नदीच्या पाण्याने वेष्टिलेल्या, दलदलयुक्त अशा पाणथळ प्रदेशाला उद्देशून ‘अनूप’ वा ‘सागरानूप देश’ म्हणत.
अन्नपूर्णा: हिमालयाची एक शाखा. नेपाळ-हिमालयाच्या मध्यभागात हिची गणना होते. अन्नपूर्णेचा प्रदेश गिरिपिंडात्मक असून ५९ किमी. पसरलेला आहे. या भागातून वाहणाऱ्या हिमनद्या या प्रदेशाच्या पश्चिमेकडील काली गंडकी, दक्षिणेकडील सेती गंडकी व उत्तरेकडील मर्स्यन्दी या नद्यांना मिळतात.
अबू : राजस्थान राज्याच्या सिरोही जिल्ह्यातील थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान, जैनांचे तीर्थक्षेत्र व ðदिलवाडा मंदिरांच्या अप्रतिम शिल्पांकरिता जगप्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या (अबूरोडसह) ३५,१७१ (१९७१). अहमदाबाद-दिल्ली या पश्चिम रेल्वेमार्गावरील अहमदाबाद प्रस्थानकापासून १८६ किमी. अंतरावर अबूरोड हे स्थानक आहे.
अभिसार : उत्तर भारतातील एक देश. प्राचीन साहित्यात ‘अभिसारजन’, ‘अभीसार’, ‘अबिसेरस’ व‘अव्रिसर’ अशी नामांतरे आढळतात. भौगोलिक स्थानाविषयीही भिन्न मतांतरे आहेत.
अलाहाबाद : उत्तर प्रदेश राज्यातील पवित्र तीर्थस्थान. शहरगटाची लोकसंख्या ५,१३,९९७ (१९७१). दिल्लीच्या आग्नेयीस उत्तर रेल्वेने दिल्लीहून ६२७ किमी. व मध्य रेल्वेने मुंबईहून १,३६० किमी. अंतरावर गंगा-यमुनेच्या संगमावर, यमुनेच्या डाव्या तीराला वसले आहे.
आरा : बिहार राज्यातील शहाबाद जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ९२,६७० (१९७१). गंगेच्या दक्षिणेस सुमारे २२ किमी. अंतरावर, आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा उंचावरचे म्हणजे अरारमधील ठिकाण म्हणून याला आरा हे नाव पडले असावे. जवळच्या मसार गावी सापडलेल्या जैन हस्तलिखितातील 'आरामनगर' हा उल्लेख याच शहराबद्दल आहे.
आराकान योमा : ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्य उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत.
आराकान योमा : ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्य उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत. आराकान योमाची सरासरी उंची १,८०० मी. पर्यंत असून मौंट व्हिक्टोरिया या सर्वोच्च शिखराची उंची ३,०६३ मी. आहे. आराकान योमाच्या उत्तरेस आराकान टेकड्या, चिन टेकड्या, लुशाई, पातकई इ. डोंगराळ भाग आहे.
आसाम : भारताच्या ईशान्य कोपऱ्यातले राज्य. क्षेत्रफळ ७८,५२३ चौ.किमी.; लोकसंख्या १,४६,२५,१५९ (१९७१). २४० ९’ उ. ते २८० १६’ उ. आणि ८९० ४२’ ते ९७० १२’ पू. याच्या वायव्येस व उत्तरेस भूतान, उत्तरेस व ईशान्येस अरुणाचल प्रदेश व त्यापलीकडे तिबेट, पूर्वेस अरुणाचल प्रदेश, नागालँड व मणिपूर, दक्षिणेस मेघालय व मिझोराम, नेऋत्येस त्रिपुरा आणि पश्चिमेस बांगला देश व पश्चिम बंगाल राज्याचे जलपैगुरी व कुचबिहार जिल्हे असून राजधानी शिलाँग आहे.
इंदूर : मध्यप्रदेश राज्यातील सर्वांत मोठे शहर आणि व्यापारी, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या ५,७२,६२२ (१९७१). क्षिप्रेची उपनदी खान आणि सरस्वाती ह्यांच्या काठांवर इंदूर वसले असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईपासून ७०४ किमी. ईशान्येस समुद्रसपाटीपासून सु. ५३० मी. उंचीवर आहे.
इंद्रप्रस्थ : उत्तरभारतांतर्गत महाभारतकालीन राजधानी. यमुना नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील या प्राचीन नगराची उत्तर-दक्षिण लांबी १६ कोस व पूर्व-पश्चिम रुंदी ४ कोस होती. आधुनिक दिल्लीच्या दक्षिणेकडील फिरोजशहा कोटला व हुमायूनची कबर यांच्या दरम्यान ते असावे. दिल्ली या वैकल्पिक नावानेही हे ओळखले जाते.
इंफाळ : पूर्वीच्या मणिपूर संस्थानाची व आताच्या मणिपूर राज्याची राजधानी. २४० ५०' उ. ९३० ५९' पू. लोकसंख्या १,००,३६६ (१९७१). इंफाळ व नंबुल नद्यांमधील एका सुंदर खोऱ्यात, समुद्रसपाटीपासून सु. ८०० मी. उंचीवर हे वसले असून, मणिपूर राज्याचे सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ८५,९०० (१९७१).
कर्नाटक राज्याच्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २९, ७५३ (१९७१). हे मंगलोरच्या उत्तरेस ५४ किमी. आहे.
उत्तर प्रदेश : भारतातील लोकसंख्येत पहिल्या क्रमांकाचे व क्षेत्रफळात चौथ्या क्रमांकाचे राज्य. क्षेत्रफळाचे २,९४,४१३ चौ. किमी. ; लोकसंख्या ८,८३,४१,१४४ (१९७१). २३०५२' उ. ते ३१०१८' उ. आणि ७७०३’ पू. ते ८४० ३९’ पू. याच्या वायव्येस हिमाचल प्रदेश, उत्तरेस तिबेट व नेपाळ, पूर्वेस नेपाळ व बिहार, दक्षिणेस मध्य प्रदेश आणि पश्चिमेस राजस्थान, दिल्ली व हरयाणा आहे. लखनौ ही राज्याची राजधानी आहे.