तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे, तीर्थक्षेत्र व विख्यात प्राचीन सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या उपनगरांसह १,१९,६५५ (१९७१). हे कावेरी नदीकाठी वसलेले असून, तंजावरच्या ईशान्येस ३९ किमी. व चिदंबरमच्या नैर्ऋत्येस ६८ किमी. आहे. सातव्या शतकात ही चोल राजांची राजधानी होती. इतिहासकाळात अनेक राजवटी बदलत १७९९ मध्ये हे स्थान मराठ्यांकडून इंग्रजांकडे आले. शंकराची बारा, विष्णूची चार, ब्रह्म देवाचे एक आणि इतर बरीच मंदिरे येथे आहेत. त्यांपैकी भव्य गोपुरे असलेली कुंभेश्वर, नागेश्वर (शंकराची) व शारंगपाणी (विष्णूचे), ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. येथे संस्कृत विद्येचे दक्षिण विद्यापीठ व अनेक पाठशाळा आहेत. नवव्या शतकात येथे आद्य शंकराचार्यानी ‘काशी’
मठाची स्थापना केली. येथेच
सध्या कामकोटी शंकराचार्यांचे पीठ असून दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह आहे. येथील महामघम् सरोवरामध्ये दर बारा वर्षांनी गंगा, सरस्वती इ. नऊ गंगांचे पाणी येते अशी समजूत आहे. म्हणूनच येथे प्रयागप्रमाणे कुंभमेळा भरतो. दक्षिण भारतात कुंभमेळा फक्त येथेच असल्याने दहा लाखांहून जास्त लोक येथे येतात. सो
न्या-चांदीचे दागिने, तांब्या-पितळेची व शिशाची कारागिरी, जरीकाम, संगीतवाद्ये, सुती आणि रेशमी कपडा, मातीची भांडी, तांदूळ सडणे, नीळ व साखरेचा व्यापार अशा विविध स्वरूपाचे उद्योगधंदे येथे असून, आसमंतात केळी, तुतीच्या बागा व पानमळे आहेत. कुंभकोणमची पाने दक्षिण भारतात प्रसिद्ध आहेत. कुंभकोणम् हे शिक्षणाचेही केंद्र आहे.
ओक, शा. नि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
प. जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्यातील एक शहर व पूर्...
सध्या ‘टेल-एल्-मुकेयीर’ ह्या नावाने इराकमध्ये प्रस...
सोव्हिएट, संघराज्याच्या किरगीझीया राज्याची राजधानी...
ल्येझ : बेल्जियममधील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकाच...