অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मैकल

मैकल

मैकल

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वतश्रेणी. ‘मेकल’ या नावानेही ही पर्वतश्रेणी ओळखली जाते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २१° ११उ. ते. २२° ४० उ. व ८०° ४६ पू. ते ८१° ४६ पू. यांदरम्यान. साधारण उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली मैकल पर्वतरांग म्हणजे विंध्य व सातपुडा ह्यांना जोडणारा दुवा आहे.

त्रिकोणाकृती सातपुडा पर्वतरांगेचा मैकल हा पूर्वेकडील पाया समजला जातो. सर्वसाधारणपणे हिची उंची ६१० मी. पेक्षा अधिक आढळत नाही. मात्र त्यातील लाफा टेकडीची उंची १,०६७ मी. आहे.

सातपुडा-मैकल हा भारतातील हिमालयाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा जलविभाजक असूनत्यातील अमरकंटक या तीर्थस्थानाजवळ नर्मदा नदी उगम पावते. ती मैकलकन्या नावाने प्रसिद्ध आहे. तिच्याशिवाय सोनपांडूकनहाररिहांडबिजुलगोपाडबनास इ. नद्या या जलविभाजकात उगम पावतात.

या पर्वतश्रेणीमध्येच २,२७९ चौ. किमी. विस्ताराचे व ६०० ते ९०० ममी. उंचीचे वनाच्छादित मैकल पठार आहे. या पठारी भागात जांभा खडकांचे बरेच आच्छादन आहे. पूर्वी मेकल नावाचे एक जनपदही होते.

या जनपदात राहणाऱ्या लोकांना मेकल असे म्हटले जाई. या प्रदेशावर जयबलवत्सराजनागबलभरतबल इ. पांडववंशी राजांनी राज्य केल्याचे काही शिलालेखांवरून दिसते. पाचव्या शतकात मेकलांचे राजे वाकाटकांचे मांडलिक बनले होते. चौथ्या व पाचव्या शतकांत या भागात दाट लोकवस्ती होतीअशा स्थानिक आख्यायिका आहे.

सासालगवत व काटेरी वनस्पती या डोंगराळ प्रदेशात आढळत असूनत्यांदरम्यानच्या सुपीक खोऱ्यात शेती केली जाते. गहूतांदूळहरभराज्वा रीसातूमकातीळ,मोहरीकडधान्ये ही येथील प्रमुख कृषिउत्पादने आहेत. सिमेंटमातीची भांडीविटाकौलेकाचदगडी कोरीव वस्तूलाकडी साहित्यलाखेच्या वस्तूपीठतेल काढणे इ. उद्योगधंदे या प्रदेशात चालतात.

कोळसाचुनखडकबॉक्साइटकुरविंदडोलोमाइटसंगमरवरस्लेटवालुकाश्म इ. खनिजद्रव्ये मैकलच्या परिसरात सापडतात.बालाघाटमंडलानैनपूर व डिंडोरी ही मैकल पर्वतप्रदेशातील प्रमुख नगरे आहेत.

मंडला (गोंड राजांची राजधानी) येथील किल्लारामनगर येथील राजवाडा व कन्हा राष्ट्रीय उद्यान ही या भागातील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. या प्रदेशातील गोंड ह्या मुख्य जमातीशिवाय हल्बा भराईबैगा व कोरकू या जमातींचेही लोक आढळतात.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate