अरबी समुद्र : हिंदी महासागराचा वायव्येकडील फाटा. पूर्वेकडे भारत, उत्तरेकडे पाकिस्तान व इराण, पश्चिमेकडे अरबस्तान व आफ्रिकेचा सोमाली प्रदेश अशा भूसीमांनी वेढलेला हा समुद्र अक्षवृत्त ८° ते २५° व रेखावृत्त ५०° ते ७५° पू. यांमध्ये विस्तारलेला आढळतो.
इंद्रावती : मध्यभारतांतर्गत नदी. लांबी सु. ५२६ किमी. ओरिसाच्या कालाहंडी जिल्ह्यात भवानी-पटना शहरापासून सु. ४० किमी. नैर्ऋत्येस पूर्व घाटात ही उगम पावते. तेथून ती पश्चिमेकडे वाहत ओरिसाच्या कोरापुट जिल्ह्यातून मध्य प्रदेशाच्या बस्तर जिल्ह्यात जगदलपूरजवळ प्रवेश करते.
आग्नेय ओरिसामधील नदी. लांबी सु. १५० किमी. बौध-खोंडमाल्स जिल्ह्यातील पूर्व घाटांपैकी एका डोंगरा-मध्ये सोरंद शहराच्या ४० किमी.
कांडला: गुजरात राज्यातील कच्छ आखातावरील भारताचे नवीन बंदर. लोकसंख्या १७,५०२ (१९७१). हे अंजारच्या आग्नेयीस १९ किमी. आहे. लोहमार्गाने व सडकेने दीसा स्थानकाला कांडला जोडल्यामुळे उत्तर भारतातच्या सात ते आठ लाख चौ.किमी. क्षेत्रातील आयात निर्यातीची सोय झाली आहे. कराची बंदर पाकिस्तानकडे गेल्यानंतर मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी या बंदराची वाढ करण्यात आली.
काकिनाडा : आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे बंदर आणि पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६४,२०० (१९७१). हे विशाखापटनमच्या दक्षिणेस ११७ किमी. आणि मद्रासच्या उत्तरेस ४४३ किमी. आहे.
कालिकत : केरळ राज्याच्या कोझिकोडे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,३३,९७९ (१९७१). हे कोचीनच्या उत्तरेस १९२ किमी. व मंगलोरच्या दक्षिणेस २१९ किमी. आहे. कालिकतचे मूळ नाव कोझिकोडे.
कासरगोड : केरळ राज्याच्या उत्तरेकडील कननोर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व बंदर, लोकसंख्या ३४,९८४ (१९७१). हे मंगलोरच्या दक्षिणेस ४३ किमी., चंद्रगिरी नदीच्या मुखाशी वसले आहे. नदीमुखाजवळील मोठे खडक व वाळूचा दांडा यांमुळे हे बंदर फारसे सोयीचे नाही.
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे.
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम झाला आहे.
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम झाला आहे.
कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात.
कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात.
कोसी नदी : बिहार राज्याची ‘अश्रूंची नदी’. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात.
कोसी नदी: बिहार राज्याची अश्रूंची नदी’. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात.
क्विलॉन : कोल्लम्. केरळ राज्याचे महत्त्वाचे निर्यातीचे बंदर व जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १,२४,२०८ (१९७१). हे त्रिवेंद्रमच्या वायव्येस ६४ किमी. वर पुरातन नगर असून ‘कोल्लम्’ म्हणून १०१९ मध्ये स्थापित झाले. त्याच्या स्थापनेपासून मल्याळी शक सुरू होतो.
खंबायत आखात : अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत याची हद्द समजण्यात येते.
घटप्रभा : मुख्यतः कर्नाटक राज्यातून वाहणारी कृष्णेची उपनदी. लांबी सु. ३२० किमी. ही सह्याद्रीत, महाराष्ट्र राज्यात सावंतवाडीच्या ईशान्येस २४ किमी. वर उगम पावते. सु. ६० किमी. ईशाव्येकडे गेल्यावर कर्नाटक राज्यात शिरताना ती पूर्ववाहिनी होते.
चिल्का सरोवर : ओरिसा राज्यातील उथळ, सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध सरोवर, हे कलकत्ता-मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून सु. ८९ किमी. वर आहे. हे पुरी आणि गंजाम जिल्हांत पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात सु. १,१६५ चौ. किमी. व उन्हाळ्यात सु. ८९१ चौ. किमी. असतो.
चिल्का सरोवर : ओरिसा राज्यातील उथळ, सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध सरोवर, हे कलकत्ता-मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून सु. ८९ किमी. वर आहे. हे पुरी आणि गंजाम जिल्हांत पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात सु. १,१६५ चौ. किमी. व उन्हाळ्यात सु. ८९१ चौ. किमी. असतो. हे सु. ७० किमी. लांब व सु. १६ ते ३२ किमी. रूंद आहे. याची खोली फक्त एक ते दीड मी. असते.
झेलम : सिंधूला पाणी पुरविणाऱ्या पंजाबातील पाच नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडील नदी. लांबी सु. ७२५ किमी. प्राचीन संस्कृत ग्रंथातील वितस्ता, अलेक्झांडरच्या इतिहासकारने हायडास्पीझ व टॉलेमीने बायडास्पीझ म्हणून उल्लेखिलेली, मुस्लिमांनी बिहत, विहत किंवा बिहतब नाव दिलेली व आधुनिक काश्मीरी वेथ नदी म्हणजेच झेलम होय.
तांबडा समुद्र : प्राचीन–सायनस अरेबिकस, एरीथ्रीअन समुद्र, रूब्रम समुद्र; अरबी–अल् बहर अल् अहमर (बहर अल् हेजॅझ). सुएझपासून बाब–एल्–मांदेब सामुद्रधुनीपर्यंत २,१०० किमी. लांबीचा हिंदी महासागराचा एक महत्त्वाचा फाटा. याच्या पूर्वेस अरबस्तानचे द्वीपकल्प आणि पश्चिमेस ईशान्य आफ्रिका असून एडनच्या आखाताने तो अरबी समुद्रास जोडलेला आहे.
ताम्रपर्णी नदी : तमिळनाडू राज्याच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातून वाहणारी एक नदी. लांबी सु. १२८ किमी. जलवाहनक्षेत्र सु. ४,५२१ चौ. किमी. ही दक्षिण सह्याद्री (पश्चिम घाट) तील १,८६९ मी. उंचीच्या अगस्त्यमलई शिखराजवळ उगम झाला आहे.
तुंगभद्रा : द. भारतातील एक प्रमुख नदी आणि कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून वाहणारी कृष्णेची मुख्य उपनदी. लांबी सु. ६४० किमी. कर्नाटक राज्याच्या चिकमगळूर जिल्ह्यात शृंगेरीच्या नैऋत्येस सु. २५ किमी. सह्याद्रीतील पुराणसिद्ध वराह पर्वतावरील १,४०० मी. उंचीवरील गंगामूळ येथून तुंग आणि भद्रा या दोन नद्या उगम पावतात. त्या तेथून ईशान्येस सु. १५० किमी. कूडली येथे एकत्र होऊन त्यांची तुंगभद्रा नदी बनते. तुंगेच्या काठी शृंगेरी, तीर्थहळ्ळी, शिमोगा ही ठिकाणे असून भद्रा नदी बाबा बुढण डोंगराच्या पायथ्याजवळून जाते.
तुतिकोरिन : (तमिळ–तुत्तुक्कुडि). भारताच्या दहा प्रमुख बंदरापैकी एक व तमिळनाडू राज्यातील मद्रासच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या १,५५,३१० (१९७१). हे तिरुनेलवेली जिल्ह्यात, तिरुनेलवेली शहराच्या पूर्वेस, मदुराईपासून १२० किमी., मानारच्या आखातावर असून पूर्वी मोती व शंख यांसाठी प्रसिद्ध होते.
तेल्लीचरी : केरळ राज्यातील कननोर जिल्ह्यातील सुरक्षित बंदर. लोकसंख्या ६८,७५९ (१९७१). हे कोझिकोडे (कालिकत) पासून ५६ किमी., कोझिकोडे–मंगलोर रेल्वे फाट्यावरील स्थानक आहे.
त्रांकेबार :तमिलनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील नागापट्टणम्च्या उत्तरेला सु. २९ किमी. वर असलेले बंदर. लोखसंख्या १७,३१८ (१९७१). यूरोपियन लोकांचा ठसा अजूनही कायम असणाऱ्या भारतीय शहरांपैकी हे एक शहर.
त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात; तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही.
दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवरकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे.
दामोदर नदी : बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते.
धनसिरी नदी : (धनश्री). आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रेची डावीकडील प्रमुख उपनदी. लांबी सु ३०० किमी. ही बरैल टेकड्यांत उगम पावून उत्तर ईशान्य दिशेला वाहते.