दारनाथ: उत्तर प्रदेशाच्या मध्य कुमाऊँ भागातील अखिल भारतीय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चारी धामांपैकी एक असून, गढवाल जिल्ह्यात पौडीपासून वायव्येस ७२ किमी., ३,६४३ मी. उंचीवर आहे
कैलास : हिमालयातील पवित्र यात्रास्थान. तिबेटच्या नैॠत्येस, लडाख पर्वतश्रेणीच्या पलीकडे ८१ किमी. वर, सु. ८००पू. ते ८५० पू. यांदरम्यान काश्मीर ते भूतानपर्यंत पसरलेल्या ३२ किमी. रुंदीच्या कैलास पर्वतश्रेणीत ३१० ५' उ. ८१० २०' पू. येथे ल्हाचू व झेंगचू टेकड्यांनी वेढलेला कैलास पर्वत आहे.
गया : बिहार राज्यातील पाचव्या क्रमांकाचे शहर, जिल्हाकेंद्र व हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १,७९,८८४ (१९७१). हे फल्गू नदीकाठी, पाटण्याच्या दक्षिणेस ८८ किमी. व कलकत्त्याच्या वायव्येस ४६७ किमी. आहे. दक्षिण बिहारमधील व्यापार, उद्योग आणि दळणवळण ह्यांचे हे मोठे केंद्र असले, तरी गयेच्या धार्मिक माहात्म्यामुळेच येथे दरसाल २-३ लाख लोक भेट देत असतात.
त्रिजुगीनारायण : उत्तर प्रदेश राज्याच्या टेहरी गढवाल जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र. हे रुद्रप्रयागपासून ७ किमी. वर केदारनाथच्या नैर्ऋत्येस आहे. येथील त्रिजुगीनारायण मंदिरात विष्णू, लक्ष्मी यांच्या धातूच्या मूर्ती व बाहेर अन्य देवतांच्या मूर्ती आहेत.
द्वारका : गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १७,८०१ (१९७१). हे चार धामांपैकी एक असून गोमती नदीकाठी वसले आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ पवित्र ठिकाणांत याची गणना होते. हिंदू लोक यास अत्यंत पवित्र मानतात. हे ओखाच्या दक्षिणेस सु. २५ किमी. आणि जामनगरच्या पश्चिमेस सु. ९६ किमी. आहे.
धनुष्कोडी : धनुष्कोटि, धनुष्तीर्थ. द. भारतातील एक तीर्थक्षेत्र. रामेश्वरच्या आग्नेयीस ३९ किमी.वर, पांबन (रामेश्वर) बेटाच्या दक्षिण टोकास हे वसवे आहे. महोदधी व रत्नाकर म्हणजेच अनुक्रमे हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांचा संगम या ठिकाणी होतो.
ध्यानबदरी : हिमालयातील पंचबदरीपैंकी एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र. उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात, बद्रीनाथाला जाताना जोशीमठाच्या अलीकडे सु. ११ किमी. कुम्हारचट्टी किंवा हेलंगचट्टी आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगामधील दक्षिणेकडील शिखावर स्थित आहे. त्याला गाविलगढ असे संबोधले जाते.
पक्षितीर्थ : तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. चिंगलपुट-महाबलीपुर मार्गावर, चिंगलपुटच्या आग्नेयीस सु. ११ किमी. वर वेदगिरी या सु. १५२ मी. उंचीच्या टेकडीवर हे पवित्र क्षेत्र असून टेकडीच्या पायथ्याशी पक्षितीर्थ गाव आहे.
पालिताणा : जैनांच्या पाच पुण्यक्षेत्रांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यात असून जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याला ‘देवाची नगरी’ म्हणतात. पालिताणा संस्थानची राजधानी येथेच होती.
पुष्कर: राजस्थान राज्याच्या अजमीर जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ७,३४१ (१९७१). अजमीरच्या वायव्येस ११ किमी.वरील ‘तीर्थराज पुष्कर’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे क्षेत्र भारतातील एकमेव ब्रह्मावतार ठिकाण मानतात.
बद्रीनाथ : बद्रीनारायण. हिमालयातील एक प्रसिद्ध व प्राचीन तीर्थक्षेत्र. हे उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात, अलकनंदा नदीकाठी समुद्रसपाटीपासून सु. ३,००० मी. उंचीवर वसलेले आहे.
बसवकल्याण : कल्याणी. कर्नाटक राज्याच्या बीदर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याने प्रमुख ठिकाण व लिंगायत धर्मपंथीयांचे तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २५,५९२ (१९७१). अलीकडे ‘कल्याणी’ व पूर्वी ‘कल्याण’ या नावाने हे शहर ओळखले जाई.
मथुरा : भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण, लोकसंख्या १,४८,९८४ (१९८१). ते गंगा-यमुना नद्यांच्या दुवेदीत आग्र्याच्या वायव्येस सु. ५८ किमी.- वर यमुनाकाठी वसले आहे. दिल्ली-मुंबई मध्यरेल्वेवरील ते प्रमुख प्रस्थानक असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दिल्लीच्या दक्षिणेस सु. १४५ किमी. वरील एक मध्यवर्ती केंद्र आहे.
रणथंभोर : राजस्थान राज्याच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ला. हा किल्ला केव्हा व कोणी बांधला याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. सवाई माधोपूरच्या ईशान्येस सु. १३ किमी.वर सांप्रतच्या सवाई माधोपूर अभयारण्यात हा किल्ला असून वनदुर्ग, रणस्तंभपुर या नावांनीही तो प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्यांच्या निर्मितीतून स्वराज्याचे तोरण बांधले होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व आजही बऱ्यापैकी भक्कम स्थितीत असलेले अनेक गडकिल्ले शिवशाहीची साक्ष देतात.