অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ईबादान

ईबादान

नायजेरियाच्या पश्चिम प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,५८,३३२ (१९७१ अंदाज). हे लागोसपासून १४२ किमी. ईशान्येस असून, सु. २२५ मी. उंचीच्या सात टेकड्यांवर वसलेले आहे. योरूबा टोळीवाल्यांची ही पूर्वीची राजधानी. कोकोसमृद्ध परिसर व दळणवळणाचे प्रमुख केंद्र म्हणून याची झपाट्याने वाढ झाली. येथे सिगारेट, फर्निचर, कापड, तेल, प्लॅस्टिक-वस्तू, खेळणी, डबाबंद फळे इत्यादींचे उद्योग असून, पूर्वी लंडन विद्यापीठाशी संबद्ध असलेले विद्यापीठ १९६२ पासून स्वतंत्रपणे पदव्या देते. वैद्यकीय शिक्षणाची सोय असलेल्या येथील रुग्णालयात पाचशे खाटांची व्यवस्था आहे.

लेखक : र.रू.शाह
स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate