অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक - प्रसिध्द व्यक्ती

जागतिक - प्रसिध्द व्यक्ती

  • आल्फ्रेट हेर्मान फ्रिट
  • जर्मन शांततावादी चळवळीचा एक संस्थापक , शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी व ऑस्ट्रियन विचारवंत .

  • ऊ थांट
  • संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव व ब्रह्मदेशाचे एक थोर राजकीय विचारवंत.

  • एर्न्स्ट हाइन्रिख वेबर
  • जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक व मानसभौतिकी शास्त्रातील एक आद्य संशोधक. यांचा जन्म जर्मनीतील व्हिटन्बेर्क येथे.

  • कोलिन मॅक्लॉरिन
  • स्कॉटिश गणितज्ञ, सर आयझॅक न्यूटन यांच्या कलन, भूमिती व गुरुत्वाकर्षण या विषयांतील कार्याचा विकास व विस्तार मॅक्लॉरिन यांनी केला.

  • ट्रिग्वे हाव्हेल्मो
  • नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म नॉर्वेमधील स्केड्स्मॉ शहरात झाला.

  • रने झ्यूल द्यूबॉस
  • अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. द्यूबॉस यांचे सुरुवातीचे शिक्षण कृषि विज्ञानातील .

  • रॉबर्ट ओएन
  • इंग्रज समाजवादी, समाजसुधारक व सहकाराचा प्रवर्तक. वेल्समधील माँगमरी परगण्यातील न्यूटाउन येथे त्याचा जन्म झाला.

  • (फ्रीड्रिख) व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट
  • जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लॅटव्हियातील रीगा येथे झाला.

  • अंद्र्येई अंद्र्येयेव्ह्यिच मार्कोव्ह
  • रशियन गणितज्ञ. त्यांनी यहच्छ प्रक्रियांचा सिद्धांत विकसित करण्यात महत्त्वाचे कार्य केले.

  • अब्दुस समद ख्वाजा
  • अकबराच्या दरबारी असलेला सुलेखनकार व चित्रकार. मूळचा इराणमधील शीराझचा.

  • अयुबखान, महंमद
  • पाकिस्तानचे १९५८–६९ पर्यंतचे अध्यक्ष. रावळपिंडीजवळील रेहाना गावी जन्म.

  • अर्नेस्ट चे गेव्हारा
  • क्यूबातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. अर्जेंटिनातील रोझार्यो येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.

  • अर्व्हिंग फिशर
  • सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. जन्म सॉगर्टींझ (न्यूयॉर्क राज्य) येथे.

  • अल् इद्रीसी
  • प्रसिद्ध अरबी भूगोलज्ञ, प्रवासी आणि कवी. जन्म मोरोक्कोच्या उत्तर किनाऱ्यावरील स्पेनच्या ताब्यातील स्यूता या शहरी झाला.

  • अल्लाउद्दिनखाँ
  • सुप्रसिद्ध सरोदिये. जन्म शिवपूर (पूर्व बंगाल) येथे. हे सेनिया घराण्यातील असून सरोदाव्यतिरिक्त सुरसिंगार, रबाब, सतार, चंद्रसारंग, सुरबहार, व्हायोलिन, सनई, बासरी, पखवाज, तबला इ. वाद्येही तयारीने वाजवीत असत.

  • अल्वा मीर्दाल
  • स्वीडनमधील प्रसिद्ध समाजसेविका व जागतिक निःशस्त्रीकरणाची खंबीर पुरस्कर्ती.

  • अहमद सेकू तूरे
  • गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकेचा एक जहालमतवादी नेता. फाराना (गिनी) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.

  • अ‍ॅडम स्मिथ
  • प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ.

  • अ‍ॅडिसन, टॉमस
  • ब्रिटिश वैद्य. त्यांचा लाँग बेंटन येथे जन्म झाला.

  • अ‍ॅपोलोनियस, पेर्गाचे
  • प्राचीन ग्रीक भूमितिज्ञ. शंकुच्छेद

  • अ‍ॅलांबेर, झांलराँद
  • फ्रेंच गणितज्ञ व तत्त्ववेत्ता.

  • अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन
  • सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून सुप्रसिद्ध. १९२१ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.

  • अ‍ॅल्‌व्हिन हार्वे हॅन्सेन
  • सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, साकलिक अर्थशास्त्राचाभाष्यकार आणि जॉन मेनार्ड केन्स याच्या सिद्धांतांचा प्रभावी समर्थक.

  • आंद्रे मारी अँपिअर
  • फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात महत्त्वाचे संशोधन. त्यांचा जन्म लीआँजवळील पॉलिमिया येथे झाला.

  • आंरी द सँ-सीमाँ
  • फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या प्रमुख प्रणेत्यांपैकी एक.

  • आउगुस्ट आडोल्फ कुंट
  • जर्मन भौतिकीविज्ञ. ध्वनिकी व प्रकाशकी या विषयांत महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म श्व्हेरीन येथे झाला.

  • आगामुहम्मद याह्याखान
  • पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष (१९६९–७१) आणि एक कुशल सेनानी. त्याचा जन्म नादिरशाहच्या वंशजांपैकी लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात पेशावर येथे झाला.

  • आद्रीअँ मारी लझांद्र
  • फ्रेंच गणितज्ञ, विवृत्तीय समाकल , संख्यासिद्धांत, गोलाभ पदार्थांतील परस्पर आकर्षण व लघुतम वर्ग पद्धती यांसंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

  • आन रोबेअर झाक त्यूर्गो
  • सुविख्यात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि विचारवंत.

  • आबेन-ईझ्रा
  • बायबलवरील एक प्रसिद्ध ज्यू मीमांसक. टोलिडो (स्पेन) येथे जन्मला. आबेन-ईझ्रा ह्या नावानेही तो प्रसिद्ध आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate