অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एलिहू रूट

एलिहू रूट

एलिहू रूट : (१५ फेब्रुवारी १८४५−७ फेब्रुवारी १९३७). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध कायदेपंडित व शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी (१९१२).

त्याचा जन्म सधन घराण्यात क्लिंटन (न्यूयॉर्क राज्य) येथे झाला. त्याने हॅमिल्टन महाविद्यालयातून (न्यूयॉर्क विद्यापीठ) कायद्याची पदवी घेतली (१८६७) आणि वकिलीस प्रारंभ केला. या सुमारास त्याचा क्लारा फ्रान्सिस वॉलेस या मुलीशी विवाह झाला (१८७८). त्यांना दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली. थीओडोर रूझवेल्ट न्यूयॉर्कचा महापौर झाल्यावर रूट त्याचा प्रमुख सल्लागार झाला. याशिवाय त्याने पोलीस आयुक्त आणि न्यूयॉर्कचा गव्हर्नर ही पदेही भूषविली. रुझवेव्टमुळे तो सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला.

विल्यम मॅकिन्ली (कार. १८९९−१९०३) याच्या मंत्रिमंडळात त्याची युद्ध सचिवपदी नियुक्ती झाली. स्पॅनिश युद्धानंतरच्या प्रशासकीय व्यवस्थेत त्याचे विशेष सहकार्य लाभले. नंतर त्याने लष्करी महाविद्यालय, सैन्य-संघटन आदी गोष्टी केल्या. त्याने केलेल्या शिफारसींमुळे पुढे फॉरेकर विधीची (१९००) कार्यवाही झाली आणि प्वेर्त रीको या स्पॅनिश वसाहतीत नागरी शासन प्रस्थापित झाले. फिलिपीन्स येथे अमेरिकेचे स्थिर शासनही आले. रूटने १९०३ मध्ये सचिवपदाचा राजीनामा दिला. पुढे थीओडर रूझवेल्ट (कार. १९०५−०९) राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्याने रूटला परराष्ट्रमंत्री केले. त्याने लॅटिन अमेरिकेतील देशांशी मित्रत्वाचे संबंध दृढ करून त्या देशांना द हेग येथील दुसऱ्या. शांतता परिषदेत भाग घेण्याविषयी विनंती केली (१९०६). तसेच अमेरिकेचे जपानबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्नी केला. या त्याच्या सामंजस्याच्या धोरणामुळे लॅटिन अमेरिकन देश व अमेरिका आणि यूरोपीय राष्ट्रे यांत सहार्याची भावना निर्माण झाली. यानंतर तो रिपब्लिकन पक्षातर्फे सिनेटवर निवडून आला (१९०५−१५). त्याची द हेग येथील लवादमंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली (१९१०).

अमेरिकेचे हित लक्षात घेऊन त्याने तत्कालीन युद्धांत तडजोडी केल्या आणि अमेरिकेचे कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्याशी बिघडलेले संबंध वाटाघाटीद्वारे सुधारण्याचा प्रयत्न केला; तसेच विल्यम बकनने जो समझोता पुढे केला; तसेच विल्यम बकनने जो समझोता पुढे केला, त्याचा पाया रूटने घातला. लॅटिन अमेरिका आणि यूरोपातील तेवीस देशांशी स्वतंत्ररीत्या तह करून त्याने सामंजस्य, शांतता व सहकार्याचा पुरस्कार तह करून त्याने सामंजस्य, शांतता व सहकार्याचा पुरस्कार केला तसेच त्याने सामंजस्य, शांतता व सहकार्याचा पुरस्कार केला तसेच जपान्यांना वांशिक भेदभावाची अमेरिकेत जी वागणूक दिली जात होती, त्याविषयी समझोता केला आणि हा जटिल प्रश्न सोडविला कार्नेगी एन्डाउमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या प्रतिष्ठानचा तो अध्यक्ष (१९१०−२५) होता. याच सुमारास आंतरष्ट्रीय लवाद न्यायालयात स्थायी सभासद पदावर त्याची नियुक्ती झाली. त्याने ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांतील उत्तर अटलांटिक किनाऱ्यावरील मच्छीमारीचा संघर्ष मिटविला. त्याच्या शांतताकार्याचा गौरव शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला.

राष्ट्रसंघाच्या घडणीत त्याचा मोठा वाटा आहे. शस्त्रकपातीच्या १९२१ च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्राध्यक्षांचा खास प्रतिनिधी म्हणून तो हजर होता.

उर्वरित जीवन त्याने कार्नेगीप्रतिष्ठानच्या सेवाकार्यात व्यतीत केले. त्याचे स्फुटलेखन विपुल असून ते रॉबर्ट बेकन व जेम्स स्कॉट यांनी कलेक्टेड स्पीचिस अँड पेपर्स ऑफ एलिहू रूट या शीर्षकाने आठ खंडात प्रसिद्ध केले आहे. (१९२६-२७). तो न्यूयॉर्क येथे मरण पावला

 

संदर्भ : 1. Jessup, P.C. Elihu Root, 2 Vols, New York. 1938.

2. Leopold, R. W. Elihu and the Conservative Tradition, Toronto, 1954.

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate