भंडारदरा वनपरिक्षेत्रात पेंडशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी व कोलटेंभे या सात गांवामध्ये ग्रामपरिस्थितीकी विकास समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांद्वारे लोकसहभागाने वने आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील एक पक्षी अभयारण्य.
महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा. 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे.
औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य.
गडचिरोली जिल्ह्यातील एक अभयारण्य.
जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती.
टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे.
स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले.
ताम्हिणी अभयारण्य विषयक माहिती.
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान
नरनाळा वन्यजीव अभयारण्य माहिती.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे.
मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा...ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा... एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकडे पाहून प्रत्येक वेळी नव्याने नतमस्तक व्हावेसे वाटते.
संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असा आहे. फार पूर्वी या जंगलात असलेल्या हत्तींच्या जास्त वास्तव्यामुळे या अभयारण्याला नागझिरा हे नाव पडले असावे असे म्हटले जाते.
पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेलं तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पहायला मिळतात.
निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे.
या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे.
निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास हा प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे.
बोरगड संवर्धन राखीव हे 350 हेक्टरचं विस्तृत राखीव वन.
चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभयारण्य.
काळवीटांसाठी विकसित करण्यात आलेले ममदापूर संवर्धन राखीव.
मयुरेश्वर अभयारण्य माहिती.
नुकताच जागतिक व्याघ्र दिन साजरा झाला. महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची माहिती देश-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचावी, लोकांमध्ये जनजागृती होऊन व्याघ्र संवर्धनास चालना मिळावी आणि महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे या उद्देशाने मंत्रालयात एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य.
विदर्भात प्रचंड डरकाळी फोडणारे देखणे रुबाबदार वाघ, मराठवाड्यात लांब ढांगा टाकत उड्या मारणारे चिंकारा, काळवीट, धिप्पाड माळढोक पक्षी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे सरीसृप, औषधी वनस्पती, अनोखे सागरी जीव सापडतात.
महाराष्ट्र देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असून हा प्रदेश 17 टक्के वनांनी नटलेला आहे. आपल्या राज्यात तब्बल 57 अभयारण्ये आणि ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.