অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ

वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ

केळझर

विदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले वरद विनायकाचे मंदिर येथे आपणाला पाहावयास मिळते. या मंदिरात आर्य कालीन गणरायाची मूर्ती आहे. तिला एक चक्रा गणेश म्हणतात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. येथे पांडवकालीन गणेश कुंडही आहे.

विश्वआशांती स्तूंप

 

सन 1935 मध्येा जपानच्या फुजी गुरुजींनी वर्ध्या मध्येक महात्मात गांधीजींची भेट घेतली. बौध्दध समुदायासाठी भारतात प्रार्थनेकरीता स्तूयप उभारावेत, अशी अपेक्षा त्यांयनी भेटी दरम्या न व्यफक्तत केली. त्यांाची ही इच्छां गांधीजींनी मान्यक केली. त्यांमुळे वर्ध्या्मध्ये विश्वप शांती स्तुतपाची उभारणी जपानच्या सहकार्याने करण्यात आली. त्या्मुळे भारतातील आठ शांती स्तू पांपैकी एक शांती स्तूप वर्ध्याणतही उभारण्या्त आला.

गीताई मंदिर

गीताई मंदिराला छत नाही की भिंती नाहीत. गायीच्या आकारासारखे हे मंदिर आहे. विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले. त्यांच्या भाषांतरीत गीताई पुस्त कातील अध्याय या मंदिरात उभ्या दगडांवर कोरले आहेत. मंदिराच्या बाजूलाच शांती कुटी आहे. त्याभमध्येद महात्माल गांधी, जमनालाल बजाज यांच्या आठवणी प्रदर्शनीच्या स्वारुपात जपण्याेत आल्या आहेत.

गांधी ज्ञान मंदिर

 

बजाजवाडीतील हे सार्वजनिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयाचे वैशिष्टळये म्हगणजे महात्मा गांधींनी लिहिलेले पुस्ताके आपणाला येथे वाचावयास मिळतात. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी पुस्तथकेही या ग्रंथालयात उपलब्धा आहेत. तसेच साहित्यव, अर्थशास्त्र , राज्यथशास्त्र , सामाजिक शास्त्रक आणि इतरही विषयांचे संदर्भ साहित्यल याठिकाणी पाहावयास मिळतात.सन 1950 साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यारहस्तेन या ग्रंथालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. तर 1954 साली पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या ग्रंथालयाचे उद्घाटन केलेले आहे. त्या्वेळी नेहरूजींनी उघडलेले कुलूप आजही सुस्थितीत असून जपण्यात आले आहे.

सेवाग्राम

स्वधर्गीय जमनलाल बजाज यांच्या् विनंतीवरुन सन 1936 साली महात्मां गांधी वर्ध्याला आले. त्यांनी आश्रम तत्कानलीन सेगावात करण्याचे निश्चित केले. सेवाग्राम आश्रमातूनच देशाची स्वा्तंत्र संग्राम चळवळ पूर्णअर्थाने सुरु होती. आजही गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे.

या सर्वांची देखरेख आश्रम ट्रस्टि करत असते. सेवाग्राम आश्रमाच्या बाजूलाच गांधीजींच्याय जीवनावर आधारीत चित्रप्रदर्शनी आहे. तसेच भारत सरकारच्या पर्यटन आणि विकास खात्यांतर्गत पर्यटकांसाठी आश्रमाच्यार परिसरातच यात्रेकरूंसाठी निवासाची सोयही आहे. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन 1944 साली कस्तुवरबा रुग्णायलयाची स्थाकपनाही सेवाग्राम येथे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन 1969 साली महात्माग गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरु केलेले आहे.

परमधाम आश्रम, पवनार

र्ध्याचपासून पाच मैलाच्या अंतरावर धाम नदी काठावर पवनार हे गाव आहे. याठिकाणी आचार्य विनोबा भावेंनी 1934 साली परमधाम आश्रमाची स्थावपना केली. स्वोशांती, ब्रम्हामच्याच शोधात निघालेल्या विनोबाजींवर महात्माऊ गांधीजींच्यार विचारांचा प्रभाव पडला. त्यायमुळे त्यां नी अंतर्मनाचा ठाव लक्षात घेऊन पदयात्रा, भूदान चळवळ राबविली. तसेच येथूनच भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व् केले. आणखीन एक वैशिष्टतय म्हचणजे महात्माद गांधीजींच्या अस्थीचे या धाम नदीतच विसर्जन करण्याणत आले होते.

बोर धरण

सेलू तालुक्यारतील बोरी गावाजवळील बोर नदीवर बोर धरण बांधण्यात आलेले आहे. वर्धा शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. धरणाजवळ सुंदर असा बगीचा आहे. वनक्षेत्रही राखीव असल्याने हे धरण पर्यटकांचे आकर्षण ठरते. शिवाय जवळच बोर अभयारण्य आहे.

हयू एन सँग धम्मत शिबिर केंद्र व स्तूरप

सेलू तहसील क्षेत्रांतर्गत येणा-या डोंगराळ भागात तैवान आणि इंग्लं डच्या आर्थिक सहकार्याने धम्मा केंद्राची स्था पना बोर धरण परिसरात करण्या त आलेली आहे. भगवान गौतम बुध्दां च्या विविध भावमुद्रा याठिकाणी आपणास पाहावयाला मिळतात. सुंदर असे येथे स्तूयप आहे. निसर्गरम्यत असा हा परिसर पाहण्यालसाठी असंख्यन पर्यटक देशविदेशातून याठिकाणी येत असतात. दरवर्षी याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्या्त येत असते.

गारपीट

कारंजा तहसील कार्यक्षेत्रांतर्गत गारपीट परिसर येतो. वर्ध्यालपासून 64 कि.मी अंतरावर गारपीट हे गाव आहे. परिसरात घनदाट जंगल असून टेकडीवर विश्रामगृहाची व्यवस्थात आहे. त्याटमुळे जंगलातील विविध प्राणी याठिकाणाहून पाहायला मिळतात.

गिरड

वर्ध्या पासून 59 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलमध्ये गिरड हे गाव आहे. याठिकाणी शेखफरीद बाबाचा दर्गा आहे. दर्ग्याजवळ तलाव आहे. गावात भोसलेकालीन राम मंदिरही आहे. रामनवमीला याठिकाणी यात्रा भरते. तसेच दहा दिवसीय मोहरम उत्संवही येथे भरतो. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हयणून या गावाकडे पाहिले जाते.

ढगा

सातपुडा पर्वत रांगातील धामनदीच्यात उपनदीजवळ ढगा हे जंगलक्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रापासून तीन किलोमीटर अंतरावर शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला मोठया उत्साहात याठिकाणी भाविक येत असतात. तसेच येथे यात्रेचेही आयोजन करण्यातत येत असते.

मगन संग्रहालय

ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पलनेवर आधारीत असलेले हे ऐतिहासिक असे संग्रहालय आहे. महात्मास गांधींनी 30 डिसेंबर 1938 रोजी मगन संग्रहालयाचे उद्घाटन केले. वर्धा शहराच्याआ मधोमध असलेल्या या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आहे. या संग्रहालयात गांधीजींशी संबंधित वस्तूह सं‍ग्रहित करून ठेवण्यातत आलेल्याह आहेत. डॉ. कुमारप्पाय आणि आर्यनयकम यांच्यां अथक परिश्रमातून जनतेसमोर हा ऐतिहासिक ठेवा जपण्याकत आलेला आहे.

राष्ट्रमभाषा प्रचार समिती

हिंदी राष्ट्रीभाषेचा प्रसार आणि प्रचार व्हालवा. या उद्देशाने राष्ट्रकभाषा प्रचार समितीची स्थारपना करण्या‍त आली. समितीद्वारे देशभरात हिंदी परीक्षांचे आयोजन करण्यारत येत असते. नागपूर येथील हिंदी साहित्ये संमेलनात घेतलेल्या् ठरावानुसार डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यात काळात 1936 साली राष्ट्र भाषा प्रचार समितीची सुरुवात वर्ध्याडत करण्याजत आली.

लक्ष्मीस नारायण मंदिर

भगवान विष्णू. आणि महालक्ष्मी चे हे मंदिर आतील बाजूने पूर्ण संगमरवरी असे आहे. हरिजनांसाठी स्वकर्गीय जमनालाल बजाज यांनी मंदिर खुले केले. 19 जुलै 1928 साली या खुल्या् केलेल्याल मंदिराच्याि शेजारीच गोरगरीबांसाठी औषधीचे दुकानही त्यांनी उघडले. या मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली होती.

बजाजवाडी

स्वहर्गीय जमनालाल बजाज यांचे बजाजवाडी येथे निवासस्थान आहे. महात्माज गांधीजींच्याव भेटीसाठी डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लहभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफार खान, डॉ. सुभाषचंद्र बोस, स्वाितंत्र्य संग्रामातील नेते वर्ध्याजत आल्यानंतर ते बजाजवाडीतील विश्रामगृहातच मुकामी राहत असत. विशेषत्वाने पंडित जवाहरलाल नेहरु बजाजवाडीतील बंगल्यांतच राहत.

आष्टी

राष्ट्रीसंत तुकडोजी महाराजांच्याम आरती मंडळाचे आष्टी हे केंद्रबिंदू आहे. त्या्च्यायच प्रेरणेने आष्टीातील तरुणांनी 16 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. त्याटतच त्यांजनी देशासाठी हौतात्म्‍य पत्कलरले. भारतीय इतिहासात आष्टी या गावाला खूप मोलाचे असे स्थासन आहे. स्वातंत्र्य संग्रामातील आष्टीतील शहीदवीरांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्या साठी येथे हुतात्मा दिन आयोजित करण्यात येतो. नागपंचमीच्याळ दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यानत येत असते.

सोनेगाव (आबाजी)

नागपूर-मुंबई रेल्वे- लोहमार्गावरील दहेगाव रेल्वेय स्थानक आहे. या स्थानकापासून 7 कि. मी. अंतरावरील देवळी तहसीलांतर्गत सोनेगाव (आबाजी) हे गाव येते. आषाढी, कार्तिकी यात्रेतील आबाजी महाराजांच्या आठवणी जागृत ठेवण्याबसाठी आबाजी महाराजांच्या. स्मातरकाची निर्मिती याठिकाणी करण्याणत आलेली आहे. जुन्या पद्धतीतील घरे, भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी-नारायणाचे मंदिरही या ठिकाणी भाविकांना आकर्षित करत असतात.

कापशी

सन 1890 मध्ये संत नानाजी महाराजांनी सुंदर असे लक्ष्मी –नारायणाचे मंदिर कापशी या ठिकाणीबांधले. यातील मूर्तीचे शिल्प काळया दगडावर 91 सेमी उंचीचे कोरण्यात आलेले आहे. वर्ध्यापासून केवळ 34 किलो‍मीटर अंतरावर कापशी हे गाव येते. हिंगणघाट तहसीलांतर्गत असलेले हे गाव वर्धा नदीकाठावर वसलेले आहे.

कोटेश्ववर

देवळी तहसील अंतर्गत असलेले हे तीर्थक्षेत्र वर्ध्यापपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा नदीच्या् उत्तर दिशेला किना-यावर हेमाडपंथी असे भगवान शंकराचे मंदिर याठिकाणी आहे. वशिष्ठर ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याशची आख्याठयिका आहे. मंदिराशेजारील नदीची वाळूही यज्ञातील भस्मातशी साधर्म्य‍ साधते. तसेच या ठिकाणी वर्धा उत्तारवाहिनी वाहत असल्या ने या तीर्थाला काशीसारखे महत्व प्राप्त आहे, असेही सांगण्यात येते.

पोथरा धरण

वर्धा शहरापासून 65 कि. मी. अंतरावर पोथरा हे धरण असून ते हिंगणघाट तहसील अंतर्गत येते. सुंदर असा निसर्गाने नटलेला पोथरा धरणाचा परिसर आहे. विविध पक्षांनाही हा परिसर हवाहवासा वाटतो. त्यामुळेच या ठिकाणी आपणाला विविध रंगी पक्षी पाहावयास मिळतात. धरणाच्यात जलाशयाची पातळी सर्वत्र सारख्या प्रमाणातच याठिकाणी दिसते.

पारडी

हिंगणघाट तालुक्यातील वेणा नदीच्याय काठावर पारडी हे गाव आहे. वर्ध्यापासून 28 कि. मी. अंतरावर ते आहे. भगवंत मुरलीधराचे येथे प्राचीन मंदिर आहे. संत नागाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोकुळाष्टमी उत्सरवही मोठया उत्साहात येथे भरल्या जातो.

पोहणा

प्रवेरसेन (पहिला) यांचा नातू तथा रुद्रसेन यांचा पूत्र पृथ्वीसेन याने पोहणा गावाची निर्मिती केली. पित्यावच्या आठवणीसाठी रुद्रसेन मंदिराची स्थाीपना पृथ्वी सेनाने याठिकाणी केली. प्राचीन काळातील हे मंदिर वर्धा नदीच्याच काठावर आहे. हिंगणघाट तालुक्यातील पोहणा हे गाव वर्ध्या्च्याच उत्तवरेकडून 50 किलोमीटर अंतरावर आहे. शिवपिंडीवर सव्वा खंडी धान्य मावते. येथे रूद्रसेनाच्या किल्याचेही अवशेष आहेत. शिव मंदिर परिसरात ब्रम्ह्देवाची मूर्तीही मिळाली आहे.

मांडगाव

वर्ध्याच्या इशान्य दिशेला 31 किलोमीटर अंतरावर मांडगाव आहे. समुद्रपूर तहसीलांतर्गत असलेल्या मांडगावात नद्यांचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळतो. वेणा, वर्धा आणि यशोदा नद्यांचा याठिकाणी संगम होतो. संत मांडो या ठिकाणी बरेच काळ वास्तरव्यास असल्या्ने मांडगाव असे गावाचे नाव पडले, असे सांगितल्या जाते. येथे प्राचीन राम मंदिर आहे. शिवाय येथे पंचमुखी शिवलिंग आणि संत ब-हाणपुरे महाराजांची समाधी आहे.

महाकाली

आर्वी तहसील अंतर्गत येणारे महाकाली धरण वर्ध्यांपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. खरांगना-कोंढाली रस्त्यावरील ग्रामसूर टेकडीतून उगम पावलेली धाम नदी आणि त्यावरील महाकाली धरण, महाकाली देवीचे मंदिर आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. धाम नदीवर महाकाली धरण बांधण्या्त आलेले आहे. धरणाच्या. पायथ्याशीच गर्द झाडीत, निसर्गरम्य असे महाकाली देवीचे मंदिर आहे. हा निसर्गरम्या असा हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. शासनही या पर्यटस्थळाला विकसित करण्याकचा प्रयत्नर करत आहे. विश्रामगृह, बगीचा, बोटिंग आदी सुविधा येथे पर्यटकांसाठी आहेत. महाकाली देवीचे मूळ मंदिर पाण्या्खाली गेले आहे. या मंदिरात महाकाली, महासरस्वदती आणि महालक्ष्मीयच्याख बाण स्वरूपात मूर्ती मंदिर उघडे पडल्यानवर दिसतात.

हिंगणघाट

दिल्ली - चेन्नई रेल्वे लोहमार्गावर हिंगणघाट हा तालुका आहे. वर्या पासून 55 किलोमीटर अंतरावर हे तालुक्याचचे ठिकाण आहे.हिंगणघाट शहराजवळूनच वेणा नदी वाहते. भोसले घराण्याितील सरदार दादोबा बोरकर यांनी त्यांच्या आईच्या स्म्रणार्थ सन 1792 ते 1805 या कालावधीत मल्हारी-मार्तंड या मंदिराची उभारणी याच ठिकाणी केली आहे. मंदिरासाठी त्यां नी वरोरा, भंडक, भटाला आदी ठिकाणाकडून शीळा आणल्यां. राजस्थातनातील शिल्पाकारांनी या मंदिराची कलाकूसर केली. मंदिराच्या नक्षीकामातून रामायण, महाभारतातील घटना मांडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलेला आहे.बन्‍सीलाल कोचर यांनीही सन 1955 साली याठिकाणी अतिशय सुरेख काचेच्‍या साहित्‍यापासून जैन मंदिराची उभारणी ही हिंगणघाट येथेच केली आहे. येथूनच कापसाची इंग्लंडमध्‍ये निर्यात होत होती. शिवाय येथील कापड उद्योग नावलौकिकास आला होता.

स्त्रोत - जिल्ह्याधिकारी कार्यालय वर्धा© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate