অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन

आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन

आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन : एका वर्षामध्ये देशातून निर्यात होणाऱ्या मालाचे मूल्य व देशात आयात होणाऱ्या मालाचे मूल्य यांमधील तोलाच्या परिस्थितीस ‘आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन’ म्हणतात. आयातीहून निर्यात अधिक असेल, तर त्या अधिक निर्यातीच्या मोबदल्यात दुसऱ्या राष्ट्राकडून आपल्या राष्ट्राला सुवर्ण मिळते, या दृष्टीकोनातून सतराव्या व अठराव्या शतकांतील व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञ अधिक निर्यातीच्या परिस्थितीस ‘अनुकुल व्यापार-संतुलन’ व अधिक आयातीच्या परिस्थितीस ‘प्रतिकूल व्यापार-संतुलन’ असे संबोधीत.

त्याच संज्ञा अद्यापिही काही प्रमाणात प्रचलित असल्या, तरी आज अशा संतुलनाचा विचार केवळ मालाच्या आयातनिर्यातीच्या संदर्भात न होता माल व इतर सेवा ह्यांच्या एकूण आयातनिर्यातीच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदाच्या संदर्भात होत असतो. सेवांच्या (वाहतूक, बँक-व्यवसाय, विमा-व्यवसाय, परदेशांत गुंतविलेल्या भांडवलावरील नफा) निर्यातीतून होणारी मिळकत भरपूर असेल, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे संतुलन प्रतिकूल असूनही, आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद समतोल किंवा अनुकूल राहू शकतो. इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन हे याचे एक ठळक उदाहरण आहे.

लेखक - वि.रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate