विद्यार्थ्यासाठ...
विज्ञानाची पुस्...
सूक्ष्मजीवशास्त...
विज्ञान
जैवविविधता
अर्थशास्त्र
अवकाश विज्ञान
भरणी नक्षत्र
समुद्राची भरती ...
मघा नक्षत्र
तारकासमुहांची य...
चंद्र
ताऱ्यांचे विश्व...
तारकासमूह
रेवती नक्षत्र
विशाखा नक्षत्र
धनिष्ठा नक्षत्र...
सूर्यानंतरच्या ...
ऊर्टचा मेघ
पूर्वाषाढा-उत्त...
उल्का वर्षावाचे...
प्रकाशवर्ष
पृथ्वी ग्रह
पूर्वाभाद्रपदा-...
नेप्च्यून
अवकाश नकाशा
युरेनस
खगोलीय शब्द सुच...
विश्वाची निर्मि...
राशी
मेसियर वस्तू
अवकाश निरीक्षणा...
खगोलसंस्थांची य...
अधिक्रमण
ग्रहांचे आकारमा...
दीर्घिका आणि वि...
पुष्य नक्षत्र
महत्त्वाच्या जो...
बुध
अनुराधा नक्षत्र...
मृगशीर्ष नक्षत्...
पूर्वा फाल्गुनी...
खगोलशास्त्रावरी...
उत्तरायण आणि दक...
खगोलशास्त्रावरी...
महत्त्वाच्या रु...
शनी
सापेक्षता सिद्ध...
कृष्णविवर - आका...
आश्लेषा नक्षत्र...
अवकाशस्थ वस्तूब...
१२ राशी
सूर्य
नक्षत्र ओळख
आकाश आणि अवकाश
ग्रहण
पंचांग
नक्षत्रांची याद...
हस्त नक्षत्र
ग्रह युती
ध्रुवतारा
रोहिणी नक्षत्र
चित्रा नक्षत्र
अरोरा - प्रकाशा...
सूर्यावरील काळे...
वक्रगती
पुनर्वसू नक्षत्...
अवकाश निरीक्षण
ज्येष्ठा नक्षत्...
ध्रुवता-याचा श...
विश्वाची व्याप्...
अवकाशातील तारे
स्वाती नक्षत्र
धूमकेतूची ओळख
श्रवण नक्षत्र
लघुग्रहांचा पट्...
उल्का
अश्विनी नक्षत्र...
क्युपर बेल्ट
मूळ नक्षत्र
धूमकेतू
शुक्र
मंगळ ग्रह
रात्रीच्या वेळी...
शततारका नक्षत्र...
कृत्तिका नक्षत्...
आपली आकाशगंगा
तारकासमुहांचे आ...
ब्लु मून - निळा...
कथा, कविता व गा...
पक्षी
भारतीय इतिहास
शिष्यवृत्त्या आ...
शालेय अभ्यासक्र...
वनस्पतीशास्त्र
एकदिशकारक
आयोनियन बेटे
मांडू
ईडिपस गंड
कॅरोटिनॉइडे
नागरिक शास्त्र
मेंदू विकार आणि...
जागतिक इतिहास
फ्रांस्वा मांसा...
भूगोल
भाषा
समाजशास्त्र
सण आणि उत्सव
परस्पर-संवाद सा...
गणित व सांख्यिक...
कला
कुरव
इंग्रजी भाषा
संस्कृत - व्या...
कॅलोमेल
राज्यशास्त्र
प्राणीशास्त्र
ईजिप्शियन भाषा
पुरातत्वशास्त्र
प्रसिध्द व्यक्त...
खेळांचे विविध प...
सामान्य ज्ञान व...
3030 एकलव्य STE...
महाविद्यालये, ...
शिक्षण संबंधीत ...
ई-मेधा
शिक्षणाचा अधिका...
धोरणे आणि योजना
करिअर मार्गदर्श...
साहित्याविषयी स...
पीएम ई-विद्या
संसाधन लिंक
राज्य वैद्यकीय ...
ई - पुस्तके
नॅशनल इन्स्टिट्...
नॅशनल कौन्सिल फ...
आंतरविद्याशाखीय...
शिक्षकांसाठी दा...
इतर माहिती
ऑटोमेटेड परमनंट...
शिक्षणातील यशोग...
आपले जग
किलबिल विभाग
व्यवसाय मार्गदर...
माहिती तंत्रज्ञ...
चालू घडामोडी
आपला महाराष्ट्र
अतुल्य भारत ले...
आपला भारत
SpaDeX मिशन
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
आकाशातील ग्रह, तारे, दूरवर दिसणारे क्वेसार हे आपल्याला ठिपक्याच्या स्वरुपात दिसतात. दुर्बिणीतून पाहिल्यास गोलाकार दिसतात. आकाशगंगा लंबवर्तुळाकार दिसतात पण तरीही आकाशगंगा म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या तार्यांचा समूह आहे. धूमकेतूचा आकार मात्र अगदी वेगळाच आहे. धूमकेतूला गोलाकार एक तेजस्वी शीर असते व त्यालाच जोडून लांबच्यालांब सतेज दिसणारी शेपटी असते. शीर व शेपटी ( head and tail) हे दोन भाग प्रत्येक धूमकेतूला असतातच. या वैशिष्ट्यावरून इतर तार्यांहून धूमकेतू वेगळा ओळखता येतो. धूमकेतूचे शीर एखाद्या तार्याप्रमाणे दिसत असले तरी ज्या तेजस्वी गोलाला शेपटी नाही तो धूमकेतू नाही हे ठामपणे समजावे. धूमकेतूला शेंडे नक्षत्र असेही म्हटले जाते. त्याच्या शरीरातून बाहेर पडणारा भाग शेंडी सारखा दिसतो म्हणून हे नाव पडले असावे.
प्राचीन कल्पना : ख्रिस्ताब्द कालगणना सुरू होण्यापूर्वी ३५० वर्ष म्हणजे इ. स. पू. ३५० या सुमारास ग्रीक तत्ववेत्ता ऍरिस्टॉटल याच्या मिटिऑरॉलॉजीआ ( meteorologia) नावाच्या प्रसिद्ध ग्रंथात धूमकेतूचा प्रथम उल्लेख सापडतो. 'पृथ्वीच्या वातावरणात दूरवर घडणारे निसर्गाचे निःश्वास' असे त्याने धूमकेतूचे वर्णन केले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात तत्कालीन एक पंडित क्लॉडियस टोलेमी (Claudius Ptolemy) यानेही त्याच्या अल्माजेस्ट ( Almagest) या ग्रंथात असेच मत प्रतिपादन करून ऍरिस्टॉटलला दुजोरा दिला. नंतर मात्र हे तत्व कोणाला पटले नाही. रोमन तत्ववेत्ता ल्युसिअस सिनेका याने प्रथम धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे विधान स्वतःच्या एका लेखात केले. मात्र शास्त्रीय निरीक्षणाचा आधार तो देऊ शकला नाही. नंतर १६ व्या शतकातील एक खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (Tycho Brahe) याने स्वतः बनवलेल्या उपकरणाच्या साहाय्याने धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखविले. १५७७ साली पृथ्वीच्या जवळ आलेल्या एका धूमकेतूचे त्याने निरीक्षण केले व आपले मत मांडले की, धूमकेतू हे पृथ्वीच्या जवळपास असतीलतर इतर तार्यांच्या संदर्भात पॅरॅलॅक्स पद्धतीनेत्याच्या अंतराचे मोजमाप करता आले पाहिजे. पण तसे शक्य होत नाही याचा अर्थ पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतरापेक्षा कितीतरी पटीने दूर हे धूमकेतू असले पाहिजेत.
धूमकेतूच्या शीराचा गाभा (nucleus) वायू आणि धूळ (silica dust) यांनी बनलेला असतो. प्रदक्षिणा मार्गावरून प्रवास करीत असताना सूर्याच्या दिशेने धूमकेतू जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे सूर्याचे किरण त्यावर पडून वायू आणि धुलिकण तप्त होतात व जोमाने प्रसारानं पावतात. अशा तऱ्हेने एक प्रकारचा वायू आणि धुलिकणांचा ढग तयार होत. यालाच धूमकेतूचा कोमा म्हणतात. गाभा व गाभ्याभोवती तयार झालेला हा कोमा (coma) मिळून धूमकेतूचे शीर तयार होते.
शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० किलोमीटर असून त्याचे वस्तुमान १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.
शीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो? आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. मंगळ, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.
धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.