acc toolbox
रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
mr
1
2
mr
उघडा

पूर्वा फाल्गुनी-उत्तरा फाल्गुनी नक्षत्र

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

प्रत्यक्षात जरी ही दोन वेगवेगळी नक्षत्रे असली तरी या दोन नक्षत्रांची नावे एकत्रच घेतली जातात.

मघा नक्षत्रच्या थोडेसे पुढे पाहिल्यास आपणास पुनर्वसू नक्षत्रातील तार्‍यासारखीच आणखी एक तार्‍यांची जोडी पाहाव्यास मिळेल व ह्या जोडीच्या थोडे पुढे एक प्रखर चांदणी आपणास आढळेल. या पुढील दोन तार्‍याच्या जोडीस पूर्वा फाल्गुनी तर शेवटच्या एका तार्‍यास उत्तरा फाल्गुनी असे म्हणतात. त्याच्या पुढील दोन आणि उत्तराचा मागील एक तारा धरून आकाशात या दोन नक्षत्रांची झालेला काटकोन त्रिकोण स्पष्ट जाणवतो.

या दोन नक्षत्रांचा समावेश देखिल सिंह राशीमध्येच होतो. ग्रीक दंतकथा सांगतात की हा सिंह चंद्रलोक मधून आला. हर्क्युलिस या पुराणप्रसिद्ध ग्रीक योद्ध्याने निमिया या जंगलात या सिंहास ठार मारले. नंतर ज्युपिटर या ग्रीक देवतेने या सिंहाला आकाशात स्थान दिले.

उत्तरा फाल्गुनीच्या तार्‍यास इंग्रजीमध्ये 'डेनेबोला' असे नाव आहे. असे पाहिल्यास उत्तरा फाल्गुनी या नक्षत्राचा सिंह राशीमधील प्रवेश हा अंशतः मानला जातो.

मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या तीन नक्षत्रामुळे सिंह रास पूर्ण होते. मघा नक्षत्रास सिंहाची मान व आयाळ तर पूर्वा फाल्गुनीस सिंहाचे मधले शरीर व उत्तरा फाल्गुनीस या सिंहाची पुच्छ (शेपटी) समजले जाते.

 

माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम

शेवटचे सुधारित : 28/07/2023
तुमचे रेटिंग
उघडा

पूर्वा फाल्गुनी-उत्तरा फाल्गुनी नक्षत्र


विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.


Copyright © C-DAC
vikasAi