acc toolbox
रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
mr
1
2
mr
उघडा

सामग्री लोड करत आहे...

श्रवण नक्षत्र

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

हे नक्षत्र देखिल ओळखणे तसे कठिण नाही. धनुराशीच्या पुढे जरा पूर्वे-उत्तरेस म्हणजे ईशान्य दिशेस पाहिले तर आपणास तीन सरळ रेषेतील तीन तारका आढळतात. यांच्यात बाजूच्या दोन्ही तारका थोड्या फिकट तर मधली तारका चांगलीच तेजस्वी दिसते. हा समूह म्हणजेच श्रवण नक्षत्र.

आपल्या येथे या समूहास स्वतंत्र नक्षत्राचे स्थान जरी असले तरी पाश्चात्य लोक यांचा समावेश गरूड तारकासमुहात करतात. या गरूड तारकासमुहात गरूडाचे डोके म्हणजे श्रवण नक्षत्र.

श्रवणाचा अर्थ ऐकण्याचे इंद्रिय म्हणजे कान.

वेदामध्ये श्रवण नक्षत्राला फार मोठे महत्त्वाचे स्थान दिले आहे. वैदिक कल्पनेनुसार श्रवणाचे तीन तारे यांना श्रोणा (उन्नतीच्या आणि मुक्तीच्या तीन पायर्‍या) मानले आहे. श्रोणा शब्दावरून बहुदा श्रवण नाव पडले असावे.

आपल्या येथे श्रवण नक्षत्राचा संबंध रामायणातील श्रावणाशी जोडला जातो. मधला प्रखर तारा म्हणजे श्रावणबाळ बाजूचे दोन तारे म्हणजे त्याचे आई वडील. या नक्षत्राचा जरी या कथेशी संबंध जोडला असला तरी मृग नक्षत्रातील मृगाच्या शरीरात घुसलेला बाण हा त्याच्या शेजारील व्याध तार्‍याने मारला आहे. त्याच प्रमाणे या श्रवणबाळाने आपल्या आई-वडिलांना आकाशगंगेच्या काठाशेजारी आणले आहे असे मानल्यास आसपास दशरथ राजासाठीचा तारा आढळत नाही. जरी शेजारच्या धनुर्धारी (धनुरास) तारकासमुहास दशरथ राजा मानले तरी त्याचा बाण रोखलेला दिसतो तो वृश्चिक राशीकडे.

तर दुसर्‍या एका कथेनुसार आपणास माहीत असेल की वामन अवतारामध्ये विष्णूने बळीराजाकडून दान घेताना तीन पावलांमध्ये स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ व्यापले. त्या तीन पावलांची खूण म्हणजे श्रवण नक्षत्र.

 

माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम

शेवटचे सुधारित : 30/01/2020
तुमचे रेटिंग

संबंधित लेख


कान

श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे. याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.


उघडा

श्रवण नक्षत्र


विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.


संबंधित लेख


कान

श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे. याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.


Copyright © C-DAC
vikasAi