उत्तरा फाल्गुनीच्या थोडे दक्षिणेस हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र देखिल ओळखण्यास अतिशय सोपे आहे कारण या नक्षत्रातील पाच चांदण्या आपल्या डाव्या हाताच्या पंज्याप्रमाणे आकाशात मांडलेल्या आढळतात.

हस्त पावसाचे नक्षत्र नाही. मोसमी पावसाचा जुगार म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय शेतीत मुख्य पीक खरिपाचे. या खरिपाचाच जिथे शंभर टक्के विश्वास नाही तेथे रब्बी हंगाम मनासारखा होणे केवळ नशिबाचाच खेळ. हस्त नक्षत्र ऑक्टोबर महिन्याच्या आसपास लागते. या नक्षत्रास पाऊस पडलाच तर तो शेतकर्यांना हस्ताने दिलेला आशीर्वाद वाटतो. या पावसामुळे शेतकर्यांच्या अपेक्षा उंचावतात. तशी एक म्हण देखिल प्रसिद्ध आहे. 'पडला हस्त तर शेतकरी मगरमस्त'.

माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम