Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
mr
1
2
mr
उघडा

बोथाटी

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

मराठेशाहीतील एक मर्दानी खेळ. भारतात मुसलमानी अंमल असतानाच बोथाटीचा खेळ उगम पावला आणि मराठेशाहीत त्याची जोपासना झाली. त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर होई आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे चालवता यावा, म्हणून बोथाटीचा खेळ निघाला. भाल्याचे वार करण्याचा व तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे अणकुचीदार लोखंडी टोक काढून टाकून त्याऐवजी बासास चिंध्याचे कापडी चेंडू किंवा लाकडी गोळे बांधून ती फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत. अशा भाल्याची अणी बोथट असल्याने त्या खेळास ‘बोथाटी’ हे नाव पडले. नित्याच्या अशा सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले. अल्पावधीतच हा खेळ एक द्वंद्वात्मक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे हात करण्याचा उत्तम सराव होऊन त्याचा त्याला लढाईत उपयोग होई. या खेळाचे ‘सलाम’, ‘बंद’, ‘बेल’ व ‘दुहेरी बेल’ हे प्रमुख हात होत.

बोथाटी ही सामान्यतः २.८९ मी. (साडे नऊ फुट) लांब असते. बोथाटीचे हात भाल्याप्रमाणे कमरेच्या वर करायचे असतात. तिच्या मागच्या टोकापासून १.०६ मी. (साडे तीन फुट) अंतरावर बोथाटी-चेंडू असतो. त्याला रंग लावल्यास सामनेवाल्याच्या अंगावर खूण राहते. चेंडूच्या खाली शोभा म्हणून दोन लोंबत्या पट्ट्याही सोडलेल्या असतात. भाल्याचा सराव व करमणूक अशा दोन्ही गोष्टी बोथाटीपासून साधतात. यात ‘सलामी’ (बोथाटीची टोके वार करण्यापूर्वी एकमेकांस भिडवणे), ‘दांड मारणे’ (बोथाटी काखेत धरून उलट बाजूने वार करणे), ‘सळक मारणे’ (जरुरीप्रमाणे बोथाटी पुढे सरकवून मागे घेणे) वगैरे डाव आहेत. मराठेशाहीच्या अस्तानंतर हा खेळही लुप्त झाला.

लेखक: बाळ ज. पंडीत

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

Last Modified : 07/10/2020
Your Rating

Related Articles

रांगोळी

भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपारिक कलाप्रकार, पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय.

यालू

चीन व उत्तर कोरिया यांच्या सरहद्दीवरून ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने वाहणारी नदी. लांबी ८०० किमी. जलवाहन क्षेत्र सु. ६२,८०५ चौ. किमी. चीनमध्ये यालू व कोरियात आमनोक कांग या नावांनी ओळखली जाणारी ही नदी

पनामा कालवा

पनामा कालवा : अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा व मध्य अमेरिकेतील पनामा संयोगभूमीवर पाणशिडीच्या तत्त्वावर बांधलेला हा कालवा १५ ऑगस्ट १९१४ रोजी जहाज वाहतुकीस खुला करण्यात आला.

पदक

पदक विषयी माहिती

एडन शहर

अरबस्तानातील दक्षिण येमेन राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,५०,००० (१९७० अंदाज).

अधिकारी तंत्र

कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.

उघडा

बोथाटी

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles

रांगोळी

भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपारिक कलाप्रकार, पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय.

यालू

चीन व उत्तर कोरिया यांच्या सरहद्दीवरून ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने वाहणारी नदी. लांबी ८०० किमी. जलवाहन क्षेत्र सु. ६२,८०५ चौ. किमी. चीनमध्ये यालू व कोरियात आमनोक कांग या नावांनी ओळखली जाणारी ही नदी

पनामा कालवा

पनामा कालवा : अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा व मध्य अमेरिकेतील पनामा संयोगभूमीवर पाणशिडीच्या तत्त्वावर बांधलेला हा कालवा १५ ऑगस्ट १९१४ रोजी जहाज वाहतुकीस खुला करण्यात आला.

पदक

पदक विषयी माहिती

एडन शहर

अरबस्तानातील दक्षिण येमेन राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,५०,००० (१९७० अंदाज).

अधिकारी तंत्र

कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi