অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक इतिहास

जागतिक इतिहास

 • रशियन राज्यक्रांति
 • रशियन राज्यक्रांति : रशियातील झारची राजेशाही उलथून टाकणारी साम्यवादी क्रांती. रशियाप्रमाणेच जगाच्या राजकीय, आर्थिक व वैचारिक क्षेत्रांत फार मोठा प्रभाव पाडणारी ही क्रांती ७ नोव्हेंबर १९१७ रोजी घडून आली.

 • रॅमसीझ, दुसरा
 • रॅमसीझ, दुसरा : (इ. स. पू. सु. १३१५−१२२५). प्राचीन ईजिप्तमध्ये एकोणीस आणि वीस ह्या राजवंशांत जे अकरा रॅमसीझ राजे झाले, त्यांपैकी सर्वांत कर्तबगार, शूर व देखणा राजा. त्याने आपल्या भावांकडून गादी बळकावून इ. स. पू. १२९२ ते १२२५ दरम्यान राज्य केले.

 • अक्रॉपलिस
 • अक्रॉपलिस : मुळात ‘उंचावरील शहर’ या अर्थाचा ग्रीक शब्द. शहरातील उंच जागी बांधलेल्या तटबंदीच्या किल्लेवजा वास्तूसाठी नंतर तो रूढ झाला. देवदेवतांची मंदिरे, भांडागारे अशा वास्तूही अक्रॉपलिसमध्ये अंतर्भूत असतात. ग्रीसमध्ये अथेन्स, ऑलिंपिया, डेल्फॉय, एपिडॉरस, कॉरिंथ, डिलॉस वगैरे ठिकाणी असे किल्ले असले, तरी ’अक्रॉपलिस’ या विशेषनामाने प्रसिद्ध असलेला किल्ला अथेन्सचाच आहे.

 • अफूची युद्धे
 • अफूची युद्धे : एकोणिसाव्या शतकात इंग्‍लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची युद्धे म्हणतात; पण मूलत: चीनची हुकमी बाजारपेठ काबीज करण्यासाठी साम्राज्यवादी ब्रिटिशांनी केलेले प्रयत्‍न व त्यांना थोपविण्यासाठी चीनने योजलेले उपाय यांतून ही युद्धे उद्भवली.

 • अबू बकर
 • अबू बकर : (५७३?– ६३४). मुहमंद पैगंबराचा निष्ठावान शिष्य, स्‍नेही व सासरा आणि पहिला अरब खलीफा. कुरैश जमातीच्या तायम टोळीतील अबू कुहाफा याचा हा मुलगा. पुढे त्यास ‘अल् सिद्दिक’ म्हणजे‘सत्यवादी’ म्हणण्यात येऊ लागले.

 • अब्बासी खिलाफत
 • मुहंमद पैगंबराचा चुलता अब्बास याच्या वंशजांनी बगदाद येथे ७५० मध्ये स्थापन केलेले खलीफांचे राज्य. 'अब्बास' नावावरून या वंशाला 'अब्बासी' म्हणतात. उमय्या खलीफाच्या कारकीर्दीत इस्लामचा खूपच प्रसार होऊन अरब-स्तानाबाहेरच्या जातीजमातींचा इस्लाममध्ये समावेश झाला. पण तत्त्वतः सर्व मुसलमान समान दर्जाचे असले, तरी प्रत्यक्षात अरब लोक स्वतःला श्रेष्ठ समजत.

 • इजीअन संस्कृति
 • इजीअन संस्कृति : प्रागैतिहासिक ब्राँझ युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. सु. ३००० ते ११०० च्या दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या संस्कृतीस सामान्यत: ही संज्ञा देण्यात येते. यूरोपमधील ही पहिली प्रगत संस्कृती मानतात.

 • इज्तिहाद
 • इज्तिहादचा शब्दश: अर्थ परिश्रमांची पराकाष्ठा. इस्लामी धर्मशास्त्रात या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला.

 • इटली-अ‍ॅबिसिनिया युद्ध
 • इटली-अ‍ॅबिसिनिया युद्ध : (१९३५-३६). इटली-अ‍ॅबिसिनिया (इथिओपिया) ह्यांमध्ये झालेले युद्ध. १८९६ मध्ये अ‍ॅबिसिनियाच्या सैन्याने आडूवा येथे इटलीच्या सैन्याचा पराभव केला होता. त्यावेळी आपले साम्राज्य आफ्रिकेत वाढविण्याचा इटलीचा प्रयत्न फसला होता.

 • इतिहास साधने
 • इतिहास साधने : कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो.

 • इतिहासलेखनपद्धति
 • इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात.

 • इब्‍न खल्दून
 • इब्‍न खल्दून : (२७ मे १३३२–१७ मार्च १४०६). प्रसिद्ध अरब इतिहासकार आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाचा प्रणेता. त्याचे पूर्ण नाव अबू झैंद अल् अब्द रहमान इब्‍न मुहम्मद इब्‍न खल्दून. ट्यूनिशियात ट्यूनिस ह्या गावी जन्मला. १३७४ पर्यंत तो नोकरीच्या निमित्ताने अनेक स्थळी भटकला आणि अखेर इतिहासाच्या अभ्यासाकडे त्याने लक्ष वळवले.

 • इब्‍न बतूता
 • सिद्ध अरब प्रवासी. काझीच्या कुळात मोरोक्कोमधील तँजिअर शहरी याचा जन्म झाला.

 • इब्‍न सौद
 • इब्‍न सौद : (? १८८० ? - ९ नोव्हेंबर १९५३). सौदी अरेबियाचा संस्थापक व पहिला राजा. पूर्ण नाव अब्दुल अझीझ इब्‍न अब्द रहमान इब्‍न फैसल अस् सौद. तो रियाद येथे जन्मला. त्यावेळी हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता.

 • इराणी संस्कृति
 • इराणी संस्कृति : पश्चिम आशियात इ. स. पू. १५०० ते इ. स. ७०० च्या दरम्यान अस्तित्वात असलेली एक समृद्ध संस्कृती. ह्या संस्कृतीच्या प्रादेशिक सीमांत वेळोवेळी महत्वाचे बदल होत गेले. ‘फरस’ किंवा ‘परसुमश’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका छोट्याशा भूभागावरून संबंध प्रदेशाला फार्स (पर्शियर) हे नाव प्राप्त झाले.

 • ईपायरस
 • एक प्राचीन राज्य. हे वायव्य ग्रीसमध्ये वसलेले असून याच्या पश्चिमेस आयोनियन समुद्र.

 • ईलम
 • नैर्ऋत्य इराणमधील लुरिस्तान व खुझिस्तान ह्या प्रदेशांतील इ. स. पू. ४५०० – ६४० च्या दरम्यानची एक प्राचीन संस्कृती.

 • एलिझाबेथ, दुसरी
 • एलिझाबेथ, दुसरी : (२१ एप्रिल १९२६ -). इंग्‍लंड व उत्तर आयर्लंड याची सध्याची राणी. हिचा जन्म लंडन येथे झाला. सहाव्या जॉर्जची ही ज्येष्ठ मुलगी. १९३६ मध्ये आठव्या एडवर्डने (ड्यूक ऑफ विंझर) राजत्याग केल्यामुळे सहावा जॉर्ज यास गादी मिळाली.

 • एलिझाबेथ, पहिली
 • एलिझाबेथ, पहिली : (७ सप्टेंबर १५३३-२४ मार्च १६०३). एलिझाबेथ ही १५५८-१६०३ या काळातील ट्यूडर घराण्यातील इंग्‍लंडची राणी. ही आठव्या हेन्रीच्या अ‍ॅन बुलीन ह्या दुसऱ्या राणी पासून झालेली मुलगी. हिचा जन्म ग्रिनिच येथे झाला.

 • ऑलिव्हर क्रॉमवेल
 • पहिल्या चार्ल्‍सच्या वेळच्या इंग्लंडच्या यादवी युद्धातील पार्लमेंट पक्षाचा एक सेनाप्रमुख.

 • ऑस्ट्रियन वारसा युद्ध
 • ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध. हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला.

 • काव्हूर, कामील्लोबेन्सोदी
 • काव्हूर, कामील्लोबेन्सोदी : (१ ऑगस्ट १९१०- ६ जून १८६१). इटालियन राष्ट्रभक्त व मुत्सद्‌दी. पीडमॉटच्या एकासरदार घराण्यात तूरिन येथे जन्मला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने सार्डिनियाच्या लष्करात नोकरी धरली. परंतु लवकरच त्याने लष्करी नोकरीचा राजीनामा दिला. इंग्रजी राज्यपद्धती आणि समाजव्यवस्था यांविषयी त्याला अतिशय आदर होता.

 • कुरेलू
 • न्यू गिनीच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या हिमपर्वतातल्या बालिएम नदीच्या खोऱ्यातली एक जमात. अनेक पठारी पॉलिनीशियन जमातींपैकी ती एक आहे.

 • कूब्‍लाईखान
 • कूब्‍लाईखान : (? १२१५ ? — ? १२९४). मंगोल सम्राट. चीनमधील युआन वंशाचा संस्थापक व एक जगप्रसिद्ध राजा. चंगीझखानाचा नातू आणि चीनमधील तोलुई किंवा तुले ह्या चंगीझखानच्या सर्वात धाकट्या मुलाचा चौथा मुलगा. आपल्या मंगू ह्या थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर १२५९ मध्ये तो गादीवर आला.

 • कॅसाइट
 • कॅसाइट : मेसोपोटेमियातील प्राचीन एलामाइट जमातीपैकी एक प्रसिद्ध सत्ताधारी जमात. इ.स.पू.सु. १८००ते १२०० हया दरम्यान हया लोकांनी प्राचीन बॅबिलोनिया, त्याचे सपाट मैदान, उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश इ. मुलूख व्यापून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केली.

 • कोरियन युद्ध
 • कोरियन युद्ध : उत्तर व दक्षिण कोरिया ह्यांमध्ये १९५०–५३ च्या दरम्यान झालेला संघर्ष. हा संघर्ष मुख्यत्वे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टविरोधी विचारसरणीतून उद्‍भवला. ह्या युद्धाची अनेक कारणे आहेत. तथापि दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर३८° अक्षवृत्तापलीकडे रशियाने उत्तर कोरिया व्यापला आणि अमेरिकेने दक्षिण कोरिया व्यापला.

 • खाल्डिया
 • खाल्डिया : युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यातील दक्षिणेकडील एक प्राचीन संस्कृती. हीमध्ये बॅबिलोनियाचा काही भाग पूर्वी समाविष्ट होता. इ. स. पू. १००० च्या थोड्या आधी सेमिटिक जमातीने तिची उभारणी केली. तीस अ‍ॅसिरियन कल्डू म्हणत; तर बॅबिलोनियन कस्डू आणि हिब्रू कस्डीम म्हणत.

 • ख्मेर संस्कृति
 • ख्मेर संस्कृति : आग्नेय आशियातील प्राचीन कंबुज – कंबोज किंवा ख्मेर साम्राज्य म्हणजेच आधुनिक कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक) व लाओसचा प्रदेश होय. या प्रदेशात ५५० ते १४५० च्या दरम्यान मेकाँग नदीच्या खोऱ्यात एक प्रगत संस्कृति नांदत होती. तेथील ख्मेर लोकांमुळे या संस्कृतीस ख्मेर संस्कृती, हे नाव रूढ झाले.

 • गिबन, एडवर्ड
 • गिबन, एडवर्ड : (२७ एप्रिल १७३७ — १६ जानेवारी १७९४ ). प्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार. जन्म पट्‌नी (सरे) येथे एका सुखवस्तू कुटुंबात. त्याची प्रकृती प्रथमपासूनच अत्यंत नाजुक होती. त्यात त्याची आई १७४५ मध्ये मरण पावली. यामुळे शालेय शिक्षणात त्याचे मन विशेष रमेना; पण वयाच्या सोळाव्या वर्षी त्याच्या प्रकृतीत आमूलाग्र सुधारणा झाली.

 • गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम
 • गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम : (४ ऑक्टोबर १७८७ — १२ ऑक्टोबर १८७४). सुप्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार आणि मुत्सुद्दी. त्याचा जन्म नीम (दक्षिण फ्रान्स) येथील मध्यमवर्गीय प्रॉटेस्टंट कुटुंबात झाला. त्याचे वडील वकिली व्यवसाय करीत होते. त्याने जिनीव्हा व पॅरिस येथे शिक्षण घेतले. विधिशिक्षण घेऊनही त्याने वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate