निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरीता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात. ही गरज पूर्णपणे भागविण्यासाठी पूरक अन्न त्यांना शोधावे लागते. कीटकांच्या शरीरांतून त्यांना हे पदार्थ किंवा लवणे मिळू शकतात. त्यांच्या पानांचे किंवा त्यांच्या भागांचे ह्याकरीता विविध स्वरूपांत रूपांतर झालेले असते. अशा प्रकारच्या कीटकभक्षक वनस्पतींचे १५ वंश व सु. ४५० जाती असून त्यांची कुले आणि भौगोलिक विस्तार कोष्टकात दर्शविला आहे.
कीटकभक्षक वनस्पतींची कुले व त्यांचा भौगोलिक विस्तार |
|||
कुल आणि वंश |
जातींची संख्या |
|
भौगोलिक विस्तार |
१. सारासेनिएसी : |
ब्रिटिश गुयाना, व्हेनेझुएला उ. अमेरिकेचा पूर्वभाग, लॅब्राडॉर ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा आग्नेय भाग |
||
हेलिअँफोरा |
५ |
||
सारासेनिया |
९ |
{ |
|
डार्लिंग्टोनिया |
१ |
उ. कॅलिफोर्निया आणि द. ऑरेगन |
|
२. नेपेंथेसी : |
|
||
नेपेंथिस |
६५ |
{ |
पूर्व उष्ण कटिबंध ते श्रीलंका व मॅलॅगॅसी (मादागास्कर) |
३. ड्रॉसेरेसी : |
|
||
डायोनिया |
१ |
{ |
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उ. कॅरोलिना व द. कॅरोलिनाचा उत्तर भाग |
अॅल्ड्रोव्हँडा |
१ |
{ |
यूरोप, भारत, जपान, आफ्रिका, क्वीन्सलॅंड, (ऑस्ट्रेलिया) |
ड्रॉसोफायलम |
१ |
{ |
द. पोर्तुगाल, नैर्ऋत्य स्पेन व मोरोक्को |
ड्रॉसेरा |
९० |
सर्व जगभर |
|
४. बिब्लिडेसी : बिब्लिस |
२ |
वायव्य ते नैर्ऋत्य ऑस्ट्रेलिया |
|
५. सेफॅलोटेसी : सेफॅलोटस |
१ |
अतिनैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाचा भाग |
|
६. लेंटिब्युलॅरिएसी : पिंग्विक्युला |
३० |
उत्तर गोलार्ध |
|
युट्रिक्युलॅरिया |
२७५ |
सर्व जगभर |
|
बायोव्ह्युलॅरिया |
२ |
क्यूबा, द. अमेरिकेचा पूर्व भाग |
|
पॉलिपोंफोलिक्स |
२ |
दक्षिण आणि नैर्ऋत्य ऑस्ट्रेलिया |
|
जेनलिसिया |
१० |
प. आफ्रिका, द. अमेरिकेच्या पूर्व भागातील उष्ण प्रदेश |
यांशिवाय कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींच्या) वीस किंवा अधिक जाती प्राणिभक्षी असून त्या सर्वत्र आढळतात. वरील कोष्टकावरून असे दिसून येईल की, फुलझाडांच्या भिन्न भिन्न कुलांतील निरनिराळ्या वनस्पती कीटकभक्षक आहेत. लेंटिब्युलॅरिएसी हे कुल सिंपेटॅली वर्गातील असून बाकीची कीटकभक्षक वनस्पतींची कुले कोरीपेटॅली वर्गात समाविष्ट आहेत. यावरून असे दिसून येईल की, कीटकभक्षक वनस्पतींचा उगम त्यांची उत्क्रांती होत असताना दोन किंवा आधिक स्थानांतून झाला असावा.
बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दमट, दलदलीच्या जागी किंवा वालुकामय भागात आढळतात. कीटकाला पकडता यावे व नंतर तो निसटू नये आणि शेवटी त्याचे पचन व्हावे यांकरिता ह्या वनस्पतींत निरनिराळ्या आश्चर्यकारक योजना आढळतात. त्यांच्या पानांची आवश्यक तशीं रूपांतरे होऊन त्यांचे कीटक पकडण्याच्या सापळ्यांत रूपांतर झालेले दिसते. आपले भक्ष्य पकडण्याच्या पद्धतीत.कोरीपेटॅली आणि सिंपेटॅली ह्या दोन वर्गांतील कुलांत काही अंशी साम्य आहे. ड्रॉसेरा, अल्ड्रोव्हँडा हे कोरीपेटॅलीतील वंश आणि सिंपेटॅलीतील युट्रिक्युलॅरिया वंश यांच्यात भक्ष्य पकडण्याच्या बाबतीत विशेषीकरणाची परमावधी गाठल्याचे दिसून येते. पानाचे झालेले रूपांतर पोलादी सापळ्याप्रमाणे डायोनियात दिसते, तर युटिक्युलॅरियात उंदराच्या सापळ्याप्रमाणे योजना असते. हे दोन्ही प्रकाराचे सापळे क्रियाशील असतात. पण जेनलिसियातील सापळा निष्किय स्वरूपाचा असतो. हेलिअँफोरा, सारासेनिया, डार्लिंग्टोनिया, सेफॅलोटस आणि नेपेंथिसया वंशांत पानाचे रूपांतर कलशात झालेले असते. अशा प्रकारचा सापळा निष्क्रिय मानतात. सारासेनियाचा सुगंध, नेपेंथिसच्या प्रपिंडातून (ग्रंथीतून) स्त्रवणारा मधुरस, ड्रॉसोफायलममधील मध, डार्लिंग्टोनिया, सेफॅलोटस आणि सारासेनिया यांतील आकर्षक रंग आणि चमकणारे गवाक्ष, ड्रॉसेरातील श्लेष्मल (बुळबुळीत) स्त्राव इ. गोष्टींनी कीटकांना आकर्षित करण्यासाठी केलेली योजना कौशल्यपूर्ण असते. भक्ष्याच्या पचनाकरिता वितंचकांचे (सजीवांतील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्या प्रथिनयुक्त संयुगांचे, एंझाइमांचे) आणि अम्लाचे स्त्रवण कित्येकांत होते. शरीरक्रियाविज्ञानदृष्ट्या असे दिसते की, प्रथिनयुक्त पदार्थ बहुधा जीवनसत्त्वांच्या स्वरूपात आणि कदाचित पोटॅशियम व फॉस्फरस यांची लवणे मिळविणे हा मुख्य उद्देश त्यांच्यात झालेल्या रूपांतराच्या विशेषीकरणाच्या मागे असावा.स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
पाथरी ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्प...
हे इंग्रजी नाव काही फुलझाडांना उद्देशून वापरले जात...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...