অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झाडांच्या बिया गोळा करण्याचा उपक्रम - वृक्ष लागवड करण्यास उपयोगी.

झाडांच्या बिया गोळा करण्याचा उपक्रम - वृक्ष लागवड करण्यास उपयोगी.

झाडं तोडल्यामूळं जंगल संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना संगमनेर व अकोले तालुक्यातील शिसवद, खडकी बु।। , पुरुषवाडी, वरुडी पठार, माळेगाव पठार, जवळे बाळेश्वर, भोजदरी, कोठे खुर्द, खांडगेदरा गावातील ग्रामस्थांनी, स्वंयसाहयता समुहांनी, युवकांनी,जैवविविधता उपक्रमातंर्गत विविध प्रजातींच्या बिया गोळा संकलित करण्याचा उपक्रम केला आहे. हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे. जैवविविधतेचे महत्त्व स्थानिक गावकरी व मुलांच्या मनावर बिंबवले तर त्याचे चांगले परिणाम भविष्यात बघायला मिळतील यात शंका नाही. 
यात शेतातील, परसबागेतील  पारंपारिक बी व जंगलातील बिया गोळा केल्या आहेत. या बियांची पुढे लागवड करून जैवविविधता जोपासण्यास मदत होणार आहे. या संकलित बियांची जाणीव जागृती देखील जैवविविधता उत्सवात केली आहे.

असे केले बियांचे संकलन


स्वंयसाहयता समुहातील महिलांनी आपल्या घरातील व परसबागेतील पारंपारिक पिकांचे व वनस्पतींचे बी गावातील वसुंधरा सेवकाकडे जमा केले. 
गावातील गुराखी, शेतकरी यांनी रानात आढळणारे बी गोळा केले. 
प्रकल्पातील वसुंधरा सेवक, वसुंधरा सेविका यांनी देखील बी गोळा करून त्यावर आवश्यक ती माहितीची नोंद करुन बियाणे सुरक्षित ठेवले.

आपण देखिल हा उपक्रम राबवू शकतो. फक्त कुठनं तरी सुरुवात करायला हवी.

  • बाहेरगावी,नातेवाईकांकडे, निसर्ग भ्रमंतीला ,टूरला गेल्यावर तेथील बिया संकलित करून ठेवणे.
  • घरात विकत आणलेल्या फळांच्या बिया गोळा करून ठेवणे.
  • घरातील, शेजारील शाळेत जाणा-या मुलांना बिया संकलित करायला प्रवृत्त करणे.
  • गुरख्यांचा संपर्क वाढवून संकलन करणे.
  • घरातील आई- वडील, लहान बहिण- भाऊ यांची मदत घेणे.
  • आपल्या वयोगटातील मित्र- मैत्रींणीना बी संकलनास प्रोत्साहित करणे.
  • आपण जर हा छंद जोपसला तर नक्कीच तो सर्वांनसाठी प्रेरणादायी ठरेल.

 

लेखन: बाळू निवृत्ती भांगरे

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate