অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मातीखालील जैवविविधताही उत्पादनासाठी महत्त्वाची

मातीखालील जैवविविधताही उत्पादनासाठी महत्त्वाची

माती आणि त्याखाली सूक्ष्मजीवांपासून बिळ करून राहणाऱ्या उंदरांसारख्या सजीवांची विविधता प्रचंड मोठी आहे. सध्या वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांना हे जीव कशा प्रकारे प्रतिसाद देतात, यांचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. त्याची आवश्‍यकता आणि संशोधन निष्कर्ष नुकतेच "नेचर' या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
पर्यावरणाचा विचार करताना अनेक वेळा वातावरणाचाच विचार होतो. मात्र पर्यावरणामध्ये माती आणि मातीखालील किडी आणि सूक्ष्मजीवांची वैविध्यता अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. यातील अनेक घटक मातीच्या सुपीकतेशी जोडले गेले आहेत, तर अनेक पिकांवर किडी व रोग म्हणून कार्यरत असतात. म्हणजेच मातीखालील पर्यावरण हे पिकांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. हे सूक्ष्मजीव किंवा किडींची कार्यपद्धती आणि ते सध्याच्या बदलत्या हवामानाला कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात, याचा अभ्यास मॅंचेस्टर विद्यापीठ आणि "नेदरलॅंड इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी' येथील संशोधकांनी केला आहे. या संशोधनामुळे मातीखालील जैवविविधतेचा पट उलगडण्यास मदत झाली आहे. तसेच वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाला ते प्रतिसाद कसे देतात, याचाही भविष्यात पर्यावरणातील अनेक घटकांवर परिणाम होणार आहेत. मातीतील हे सूक्ष्मजीव आणि घटकांचा मातीच्या सुपीकतेबरोबरच पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठीही फायदा होणार आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

- प्रा. ब्रॅडगेट म्हणाले, की पृथ्वीवरील सर्वांत विविधता असलेल्या घटकांमध्ये मातीचा समावेश करावा लागेल. मातीतील समुदाय हे अत्यंत गुंतागुंतीचे असून, त्यांच्या अक्षरशः लक्षावधी प्रजाती आहेत. एखाद्या लहानशा गवताळ प्रदेश किंवा जंगलामध्ये त्यांची संख्या ही अब्जावधीमध्ये जाते. त्यामध्ये सूक्ष्मदर्शकाशिवाय न दिसणाऱ्या जिवांपासून गांडुळे, मुंग्या आणि उंदरांच्या विविध प्रजातींचा समावेश आहे. एवढे वैविध्य असूनही मातीच्या संशोधनाकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. गेल्या दशकामध्ये माती आणि मातीखालील जैवविविधतेचा काही प्रमाणात विचार होत आहे. त्यावरून या सूक्ष्मजीवांचा वनस्पतींच्या जैवविविधतेवरील व पर्यावणावरील परिणामही समोर येत आहेत. मातीचे शाश्वत व्यवस्थापन, देखभाल आणि सुपीकतेसाठी या संशोधनांचा उपयोग होत आहे. अन्न, पशुखाद्य आणि बायोमासच्या निर्मितीसाठी आपण शेवटी मातीवर अवलंबून आहोत. कारण योग्य पर्यावरणाशिवाय कृत्रिम माध्यमांमध्ये पिकांची वाढ करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- प्रा. व्हॅन डेर पुट्टेन यांनी सांगितले, की पिकांवरील किडींच्या अनेक किंवा एखादी तरी अवस्था ही मातीखाली असते. त्यामुळे पीक संरक्षणासाठी आरोग्यपूर्ण मातीची आवश्‍यकता असते.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate