অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय इतिहास

भारतीय इतिहास

 • 1 मे - महाराष्ट्र दिन
 • याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 • अकबर
 • अकबर : (१५ ऑक्टोबर १५४२-२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील ⇨हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत एकवाक्यता दिसून येत नाही.

 • अकबर नामा
 • अकबर नामा : मोगल (मुघल) सम्राट अकबराच्या दरबारातील ⇨अबुल फज्ल याने लिहिलेला ग्रंथ. मोगल कालखंडावरील मौल्यवान अशा ऐतिहासिक साधनग्रंथात याची गणना होते. याचे तीन भाग आहेत. पहिल्यात तैमूरपासून हुमायूनपर्यंतचा इतिहास असून दुसऱ्यात अकबराच्या कारकीर्दीतील अबुल फज्लच्या मृत्यूपर्यतच्या घटनांचे वर्णन आहे.

 • अजातशत्रू
 • पितृहत्या करून अजातशत्रूने राज्यरोहण केले; नंतर काही वर्षांनी गौतम बुद्धाच्या दर्शनास गेला असता, त्या पातकाचा उच्चार करून क्षमायाचना केली, असा वृत्तांत बौद्ध साहित्यास आढळतो. परंतु जैन साहित्यात बिंबिसाराने वृद्धपकाळी स्वतःच राज्यसत्ता अजातशत्रूला दिली, असा निर्देश आहे.

 • अठराशे सत्तावनचा उठाव
 • अठराशे सत्तावनचा उठाव : भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती.

 • अहिल्याबाई होळकर
 • एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला.

 • आझाद हिंद सेना
 • सुप्रसिध्द भारतीय पुढारी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यासाठी सिंगापूर येथे जुलै १९४३ मध्ये उभारण्यात आलेली लष्करी संघटना.

 • आदिलशाही
 • आदिलशाही (१४८९ - १६८६) : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक मुसलमानी राजसत्ता. ðबहमनी सत्ता निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान १४८९ मध्ये स्वतंत्र झाला.

 • इंग्रज-अफगाण युद्धे
 • इंग्रज-अफगाण युद्धे : अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकिताची सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणांबरोबर तीन युद्धे केली.

 • इंग्रज-गुरखा युद्धे
 • इंग्रज-गुरखा युद्धे : (१८१४-१८१६). हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले.

 • इंग्रज-निजाम संबंध
 • इंग्रज-निजाम संबंध: मीर कमरुद्दीन ð निजामुल्मुल्क आसफजाह दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. त्यानंतर जरी तो नावाला मोगल साम्राज्याचा सुभेदार म्हणून वागत असला, तरी वस्तुतः स्वतंत्र सत्ताधीशच बनला होता.

 • इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील
 • इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील : सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली.

 • इंग्रज-मराठे युद्धे
 • इंग्रज-मराठे युद्धे : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली.

 • इंग्रज-म्हैसूरकर युद्धे
 • इंग्रज-म्हैसूरकर युद्धे : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिणेत जुन्या म्हैसूरमध्ये हैदर अली ह्या एका गरीब नायकाच्या मुलाने हळूहळू सैन्यास वश करून तेथील नंदराज ह्या दिवाणाची जागा प्रथम पटकाविली व पुढे राजा चिक्क कृष्णराय ह्यास बाजूस सारून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली.

 • इंग्रज-रोहिला युद्ध
 • इंग्रज-रोहिला युद्ध : (१७७२-१७७४). ब्रिटिशांनी उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्ताराच्या हेतूने रोहिल्यांबरोबर केलेल्या युद्धाला भारतीय इतिहासात महत्वाचे स्थान आहे. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली.

 • इंग्रज-शीख युद्धे
 • इंग्रज-शीख युद्धे : (१८४५-१८५०). भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्‌भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध मित्रत्वाचे होते.

 • इंग्रजी अंमल, भारतातील
 • इंग्रजी अंमल, भारतातील : हिंदुस्थानच्या इतिहासातील १६०० ते १९४७ हा सु. ३५० वर्षांचा काळ म्हणजे इंग्रजांच्या भारतातील आगमनाचा व सत्तासंपादनाचा. याचे प्रामुख्याने तीन कालखंड पडतात : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते क्लाइव्हच्या कारकीर्दीपर्यंतचा पहिला कालखंड (१६००-१७७२), वॉरन हेस्टिंग्जच्या कारकीर्दीपासून (१७७२) ते १८५७ च्या उठावापर्यंतचा दुसरा कालखंड व १८५८ ते १९४७ हा तिसरा कालखंड.

 • इंदूर संस्थान
 • इंदूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ २४,६०५ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस ग्वाल्हेर, पूर्वेस देवास व भोपाळ, दक्षिणेस पूर्वीचा मुंबई इलाखा, पश्चिमेस बडवानी व धार.

 • इंद्र, तिसरा
 • इंद्र, तिसरा : (सु. ८७९—? डिसेंबर ९२७). महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील एक राजा. दुसऱ्या कृष्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याच्या अगोदरच मेल्यामुळे, त्याचा नातू तिसरा इंद्र ९१५ ते ९२७ पर्यंत राष्ट्रकूटांच्या मान्यखेट येथील गादीवर होता.

 • इक्ष्वाकु
 • एका प्राचीन भारतीय राजाचे व राजवंशाचे नाव. भारताच्या ऐतिहासिक परंपरेनुसार इक्ष्वाकु हा वैवस्वत मनूचा पुत्र होय.

 • इतिहासातील महत्त्वाच्या तारखा
 • भारतीय आणि जागतिक इतिहासातील महत्त्वाच्या तारखा

 • इत्सिंग
 • इत्सिंग : (६३४ – ७१३). भारतात सातव्या शतकात आलेल्या एक प्रसिद्ध चिनी प्रवासी. यूआन च्वांग चीनला परत गेला, तेव्हा इत्सिंग दहा वर्षांचा होता. तथापि त्या लहान वयातही इत्सिंगला बौद्ध भिक्षू होऊन भारतात येण्याची तीव्र इच्छा होती. तो चौदा वर्षांचा झाला, तेव्हा त्याला भिक्षुसंघात घेण्यात आले.

 • उदयपूर संस्थान
 • ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी.

 • उदयसिंह
 • मेवाडचा विषयासक्त दुर्बल राजा. राणा संग्रामसिंह व राणी कर्णवती यांचा मुलगा.

 • उदयसिंह
 • मेवाडचा विषयासक्त दुर्बल राजा. राणा संग्रामसिंह व राणी कर्णवती यांचा मुलगा.

 • एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड
 • एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड : (८ सप्‍टेंबर १७९०-२२ डिसेंबर १८७१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४२ ते १८४४ या काळातील गव्हर्नर जनरल. याचे वडील इंग्‍लंडमध्ये मुख्य न्यायाधीश होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलेनबरो सेंट मायकेल परगण्यातर्फे हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद झाला.

 • एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट
 • एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट : (६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला.

 • औरंगजेब
 • औरंगजेब : (२४ ऑक्टोबर १६१८ - २०फेब्रुवारी १७०७). दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशहा. संपूर्ण नाव मुहियुद्दीन मुहंमद औरंगजेब ⇨ शाहजहान व मुमताज यांचा तिसरा मुलगा. गुजरातमधील दोहद येथे जन्मला. शाहजहानच्या बंडामुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्यास जहांगीरकडे ओलीस रहावे लागले.

 • कण्व (काण्व) वंश
 • कण्व (काण्व) वंश : उत्तर हिंदुस्थानातील प्राचीन मगध प्रदेशावर इ. स. पू. ७५ ते इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारा एक प्राचीन ब्राह्मण वंश. त्यास काण्वायन असेही म्हणतात. या राजांनी ४५ वर्षे राज्य केले. त्यांच्या शासनकालाविषयी विद्वानांतमतभेद आहेत.

 • कत्यूरी वंश
 • कत्यूरी वंश : हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाऊँ (उत्तर प्रदेश) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजे नवव्या शतकाच्या अखेरीपासून दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत राज्य करीत होते. या वंशाला हे नाव त्या प्रदेशातील कत्यूर खोऱ्यावरून पडले आहे; पण ते त्यांच्या कोरीव लेखांत आढळत नाही.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate