Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म

उघडा

Contributor  : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था02/08/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

गोरिंग हेरमान व्हिल्हेल्म

(१२ जानेवारी १८९३ — १६ ऑक्टोबर १९४६). जर्मन मुत्सद्दी व वायुसेनाप्रमुख. ह्याचा जन्म बव्हेरियातील रोझेनहाइम ह्या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९१२ मध्ये त्याने कैसरच्या भूसेनादलात प्रवेश मिळविला. १९१४ मध्ये त्याची बदली जर्मन हवाई दलात करण्यात आली. हवाई दलातील शौर्याबद्दल व नैपुण्याबद्दल त्याला पोवर ली मेरिटहे पद बहाल करण्यात आले. पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर १९१८ साली तो स्वीडनमध्ये गेला. ह्या युद्धातील पराभवाबद्दल लष्कराऐवजी अंतर्गत राजकारणास व मुलकीव्यवस्थेस तो दोष देई.

स्वीडनमधील एका हवाई कंपनीने त्यास नोकरी दिली. ह्या सुमारास केरिन नावाच्या विधवेशी त्याने लग्न केले. १९२२ मध्ये तो जर्मनीत परत आला त्या वेळी त्याच्यावर हिटलरची छाप पडली. १९२३ च्या म्यूनिकच्या उठावात तो जखमी झाला व पुन्हा तो स्वीडनला पळून गेला. १९२७ मध्ये तो जर्मनीस परतला पुन्हा त्याने आपले हिटलरबरोबरचे संबंध प्रस्थापित केले व त्याच्या साहाय्याने तो १९२८ मध्ये संसदेवर निवडून आला. गोरिंगने व्यापारी व जमीनदार यांच्याशी संबंध वाढवून हिटलरच्या बाजूने मतपरिवर्तन केले.

१९३१ मध्ये तो हिंडेनबुर्गला भेटला व १९३२ च्या संसदेच्या निवडणुकीत संसदेचा अध्यक्ष झाला. हिटलर सत्तारूढ झाल्यावर त्याने गोरिंगची बिनखात्याचा मंत्री, प्रशियाचा पंतप्रधान, हवाई दलाचा आयुक्त इ. पदांवर नेमणूक केली. त्याने हवाई दलात आमूलाग्र सुधारणा केल्या. त्यास १९३५ मध्ये हवाई दलाचे प्रमुखपद व अंतर्गत व्यवस्थेचे मंत्रिपद देण्यात आले. ह्यानंतर जर्मनीची सर्व अर्थविषयक सूत्रे गोरिंगच्या हातात देण्यात आली.

चतुर्वार्षिक योजना अंमलात आणून आर्थिक बाबतींत त्याने स्थैर्य आणले. दुसरे महायुद्ध सुरू होताच त्यास हवाई दलाचा मार्शल हा किताब दिला आणि नंतर संभाव्य उत्तराधिकारी म्हणून हिटलरने त्याचे नाव जाहीर केले. १९४३ नंतर गोरिंगचे हिटलरवरील वर्चस्व कमी झाले व दोघांत मतभेद निर्माण झाले. गोरिंग पळून जात असता त्यास दोस्त राष्ट्रांनी अटक केली आणि न्यूरेंबर्गच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यास दोषी ठरवून देहान्ताची सजा फर्माविली.

रोमेलच्या मते गोरिंग सुखासीन व उच्चभ्रू होता. त्याने जर्मनीचे विमानदल पूर्णपणे विकसित केले. दुसऱ्या महायुद्धात त्याने प्रशंसनीय कामगिरी केली. फाशीच्या पूर्वी काही तास अगोदर त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

संदर्भ : 1. Butler, Ewan; Young, G. G. Marshal without Glory,London, 1951.

2 Frischauer, Willi, Rise and Fall of Hermann Goering, Boston, 1951.

देशपांडे अरविंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

Related Articles
शिक्षण
व्हिल्हेल्म फ्रीड्रिफ फीलिप प्फेफर

जर्मन वनस्पती शरीरक्रियावैज्ञानिक. वनस्पतींतील विविध शरीरक्रियावैज्ञानिक प्रक्रिया आणि तर्षण दाब तर्षण यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.

शिक्षण
व्हिल्हेल्म लूदव्हीग योहानसन (योहान्सेन)

डॅनिश वनस्पतिवैज्ञानिक आणि आनुवंशिकीविज्ञ

शिक्षण
फ्रीड्रिख व्हिल्हेल्म गेओर्ख कोलरॉउश

जर्मन भौतिकीविज्ञ. चुंबकत्व व विद्युत् शास्त्रात विशेष कार्य. त्यांचा जन्म रिन्टेल्न येथे झाला आणि शिक्षण एर्लांगेन व गॉटिंगेन येथील विद्यापीठांत झाले.

शिक्षण
(फ्रीड्रिख) व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट

जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लॅटव्हियातील रीगा येथे झाला.

शिक्षण
कार्ल टेओडोर व्हिल्हेल्म व्हायरश्ट्रास

जर्मन गणितज्ञ. त्यांनी फलन सिद्धांत , श्रेढींची अभिसारिता , अभिसारी अनंत गुणाकार या विषयांत संशोधन केले.

शिक्षण
उंदीरमामा आणि मनीमावशी -

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी !

गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था02/08/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
शिक्षण
व्हिल्हेल्म फ्रीड्रिफ फीलिप प्फेफर

जर्मन वनस्पती शरीरक्रियावैज्ञानिक. वनस्पतींतील विविध शरीरक्रियावैज्ञानिक प्रक्रिया आणि तर्षण दाब तर्षण यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.

शिक्षण
व्हिल्हेल्म लूदव्हीग योहानसन (योहान्सेन)

डॅनिश वनस्पतिवैज्ञानिक आणि आनुवंशिकीविज्ञ

शिक्षण
फ्रीड्रिख व्हिल्हेल्म गेओर्ख कोलरॉउश

जर्मन भौतिकीविज्ञ. चुंबकत्व व विद्युत् शास्त्रात विशेष कार्य. त्यांचा जन्म रिन्टेल्न येथे झाला आणि शिक्षण एर्लांगेन व गॉटिंगेन येथील विद्यापीठांत झाले.

शिक्षण
(फ्रीड्रिख) व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट

जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लॅटव्हियातील रीगा येथे झाला.

शिक्षण
कार्ल टेओडोर व्हिल्हेल्म व्हायरश्ट्रास

जर्मन गणितज्ञ. त्यांनी फलन सिद्धांत , श्रेढींची अभिसारिता , अभिसारी अनंत गुणाकार या विषयांत संशोधन केले.

शिक्षण
उंदीरमामा आणि मनीमावशी -

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी !

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi