Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था27/05/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. अर्थात ती निश्चितपणे केव्हा सुरू झाली, यांबाबत मतभेद आहेत. तथापि धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश (चोथिया ?) दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे १५७९—१७१६ च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेई. रामनगरचा राजा चौथाई घेत असे, ती एकूण उत्पन्नाच्या १७, १४ किंवा १२१/२ टक्के एवढी असे. शिवाजींनी दमणवसई हा भाग जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली होती. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता शिवाजी महाराज त्यांच्याकडून उत्पन्नाच्या १/४ किंवा कमी अधिक हिस्सा वसूल करीत. त्यांनी गोवळकोंडा व विजापूर येथील शाहीसत्ता आणि खानदेश व कोकणातील पोर्तुगीज यांच्याकडून चौथाई वसूल केली होती. एवढेच नव्हे, तर गोवळकोंडा व विजापूर यांना मोगलांविरुद्ध मदतही केली. पुढे पुढे शिवाजी चौथाई देणाऱ्या प्रदेशांतून स्वारी करणार नाही, या अटीवर चौथाई वसूल करू लागले. संभाजी व राजाराम हेही या पद्धतीप्रमाणे चौथाई वसूल करीत असत. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीत कैदी असलेल्या शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. मराठ्यांप्रमाणे बुंदेलखंडातील चंपतरायने त्याच्या शेजारील प्रदेशातून चौथाई घेतल्याचे कागदपत्रांतून आढळते. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई-सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. बादशाहने दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर नेमलेला निजामुल्मुल्क हा सुभेदार होता. तो वरकरणी म्हणे, हे सर्व हक्क मी वसूल करून देतो; मात्र माझ्या सुभ्यात मराठ्यांनी ढवळाढवळ करू नये. प्रत्यक्षात मात्र त्याने वसूल देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे मराठ्यांना हे तत्त्व मान्य झाले नाही. साहजिकच मराठे सहा सुभ्यांतून पुढे संचार करु लागले आणि चौथाई व सरदेशमुखी वसूल करू लागले. यांतूनच पुढे निजाम-मराठे संघर्ष निर्माण होऊन अनेक युद्धे झाली आणि मराठी राज्याचा त्याबरोबर विस्तारही झाला. तथापि हे प्रकरण पूर्णतः कधीच निकालात निघाले नाही. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठेशाहीच्या अवनतीच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई-सरदेशमुखीचे सर्व हक्क १८०२ मध्ये काढून घेतले.
संदर्भ : Sen, S. N. The Military System of the Marathas, New Delhi, 1958.
गोखले, कमल
स्त्रोत: मराठी विश्वकोश
सातारा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यातील एक संस्थान. त्यात तासगाव सोडून १८८५ मध्ये अस्तित्वात असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रदेशाचा अंतर्भाव होता. शिवाय सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील उपविभाग आणि विजापूर शहरासह त्या जिल्ह्याचा काही भाग त्यात अंतर्भूत होता.
भोसले घराणे : सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला.
भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते.
दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा.
चौथाई - सरदेशमुखी : मराठी राज्याच्या सतराव्या-अठराव्या शतकांतील उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी. या दोन्ही मुख्यतः मराठी राज्याबाहेर – छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर – पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करीत.
खर्ड्याची लढाई : मराठे आणि निजामुल्मुल्क यांच्यात ११ मार्च १७९५ रोजी झालेली महत्त्वपूर्ण लढाई. मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणीसाच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे खर्ड्याची लढाई होय. १७२४ मध्ये निजामुल्मुल्काने स्थापलेली हैदराबादची आसफशाही व मराठेशाही ह्या दोन्हीही सत्ता दक्षिणेत आपले आसन स्थिर करीत होत्या.
Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था27/05/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
48