Accessibility options
Accessibility options
भारत सरकार
सामग्री लोड करत आहे...
योगदानकर्ते : 30/01/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
प्रजेच्या सुखासाठी जयसिंगाने धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या; बादशाहाकडून जिझिया कर रद्द करविला; जाटांचा बंदोबस्त केला आणि नवीन कायदे तयार केले. १७२८ मध्ये जयपूर ही राजधानी वसवून त्या शहराची त्याने नवीन रचना केली.
जयसिंग संस्कृत, गणित, ज्योतिष, इतिहास वगैरे विषयांचा ज्ञाता होता. काशीच्या रत्नाकरभट्ट महाशब्दे याने लिहिलेला जयसिंहकल्पद्रुम, जगन्नाथ पंडिताचे सिद्धांत सम्राट व रेखागणित हे दोन ग्रंथ आणि जयपूर येथे वसविलेली स्वतंत्र ब्रह्मपुरी जयसिंगाने विद्वानांना दिलेल्या आश्रयाचे व प्रोत्साहनाचे फळ होय. जयसिंगाने जयपूर, दिल्ली, बनारस व उज्जयिनी या ठिकाणी वेधशाळा बांधून ग्रहांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी जयप्रकाश, सम्राटयंत्र, भित्तियंत्र, वृत्तषष्ठांश ही उपकरणे तयार केली. त्यांवर ७–८ वर्षे विद्वान ज्योतिष्यांकडून वेध घेऊन सिद्धांत सम्राट हा संस्कृत व झिज-इ-मुहम्मद हा फार्सी असे दोन ग्रंथ लिहविले (१७२८).ग्रहांची सूची व त्यांच्या गतीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी त्याने बनविलेली गोलाकार व अर्धगोल ताशीव संगमरवराची उपकरणे अद्यापही प्रेक्षणीय आहेत. महाराष्ट्रीय ब्राह्मणांविषयी त्यास विशेष आस्था होती; मात्र उदेपूरच्या राजघराण्यातील मुलीशी स्वतःचे लग्न जुळविण्यासाठी त्याने त्या घराण्यातील मुलीला मुलगा झाल्यास त्यास जयपूरची गादी मिळेल, असा ठराव केला. तसा मुलगा झाल्यावर त्यास ठार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे तो ठराव त्याच्या मुलांत कडाक्याचे भांडण लावण्यास कारणीभूत झाला.
खरे, ग. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
प्रसिद्ध भारतीय विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ.
सोळंकी घराणे : गुजरात, कच्छ, सौराष्ट्र इ. प्रदेशांवर राज्य करणारा एक मध्ययुगीन राजवंश. याचा चौलुक्य वा चालुक्य राजवंश असाही उल्लेख करतात. राजपुतांच्या चार अग्निकुलांत याचा अंतर्भाव होतो. वरील प्रदेशांवर सोळंकी घराण्याचा दहावे ते तेरावे शतकांदरम्यान अंमल होता.
मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्यानारायणराव या मुलाचा गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तरजन्माला आलेला मुलगा.
पुरंदर : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक प्रसिद्ध व बळकट डोंगरी किल्ला. तो पुण्याच्या दक्षिणेस सु. ४० किमी. वर व सासवडच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी. वर एका उंच टेकडीवर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,३९८ मी. असून त्याच्या पूर्वेस भैरवखिंडीच्या पलीकडे वज्रगड किंवा रुद्रमाला हा छोटा पण मोक्याचा किल्ला आहे.
हवाई सुंदरी करिअर विषयी माहिती.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
योगदानकर्ते : 30/01/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
प्रसिद्ध भारतीय विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ.
सोळंकी घराणे : गुजरात, कच्छ, सौराष्ट्र इ. प्रदेशांवर राज्य करणारा एक मध्ययुगीन राजवंश. याचा चौलुक्य वा चालुक्य राजवंश असाही उल्लेख करतात. राजपुतांच्या चार अग्निकुलांत याचा अंतर्भाव होतो. वरील प्रदेशांवर सोळंकी घराण्याचा दहावे ते तेरावे शतकांदरम्यान अंमल होता.
मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्यानारायणराव या मुलाचा गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तरजन्माला आलेला मुलगा.
पुरंदर : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक प्रसिद्ध व बळकट डोंगरी किल्ला. तो पुण्याच्या दक्षिणेस सु. ४० किमी. वर व सासवडच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी. वर एका उंच टेकडीवर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,३९८ मी. असून त्याच्या पूर्वेस भैरवखिंडीच्या पलीकडे वज्रगड किंवा रुद्रमाला हा छोटा पण मोक्याचा किल्ला आहे.
हवाई सुंदरी करिअर विषयी माहिती.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
+91-7382053730
vikaspedia[at]cdac[dot]in