Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था24/07/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
या युद्धाचे कारण विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यामधील परस्पर मत्सर हे सामान्यतः मानले जाते.
विश्वामित्र हा सुदासचा आरंभीचा पुरोहित होता. त्याने सुदासला विपाशा (बिआस) आणि शुतुद्रि (सतलज) या नद्यांच्या काठी आपल्या मंत्रसामर्थ्याने विजय मिळवून दिला होतो; पण पुढे त्याचे त्या राजाशी बिनसले. नंतर सुदासने वसिष्ठांना आपला पुरोहित नेमले. म्हणून विश्वामित्राने दहा राजांना चिथावून त्यांच्याकडून सुदासच्या प्रदेशावर स्वारी करविली, असे मानण्यात येते ; पण त्याला ऋग्वेदातील वरील सूक्तांत आधार नाही. त्या युद्धात द्रुह्यूचा पुरोहित वृद्ध कवष होता. त्याचा उल्लेख ऋ. ७·१८·१२ आहे. पण विश्वामित्राचा उल्लेख त्या किंवा इतरही दोन सूक्तांत नाही; तेव्हा या युद्धाचे कारण दुसरेच काही तरी असले पाहिजे.
ऋ. ७·१८·५ मध्ये दाशराज्ञ युद्धाच्या वर्णनापूर्वी इंद्राने सुदासकडून परुष्णी (रावी) नदी पार करवून पश्चिमेच्या शिम्यू नामक उद्धट शत्रूला शासन करविल्याचा उल्लेख आहे. यातूनच दाशराज्ञ युद्ध उद्भवले असावे. शिम्यूने दहा राजांना परुष्णी पार करून सुदासच्या राज्यावर आक्रमण करण्यास चिथावले असावे. सुदासचे राज्य परुष्णीच्या पूर्वेस सरस्वती, दृषद्वती आणि आपया या नद्यांच्या खोऱ्यात पसरले होते. पुढे दाखविल्याप्रमाणे त्याचे बहुतेक शत्रू परुष्णीच्या पश्चिमेकडील होते. त्यावरूनही हे अनुमान संयुक्तिक दिसेल.
सुदासचे शत्रू दहा होते असे ऋ. ७·८३·७ मध्ये म्हटले आहे. काहींच्या मते ‘दहा’ ही संख्या अनेकत्वद्योतक असावी. हे शत्रू दहाच असल्यास ऋ. ७·१८ या सूक्तांत उल्लेखिलेले असावे : असिक्नी किंवा चिनाब आणि परुण्णी किंवा रावी यांच्यामधील प्रदेशातील तुर्वश, द्रह्यू, अनू; मथुरेच्या पश्चिमेचे मत्स्य व सरस्वतीच्या तीरावरचे पुरु हे पाच राजे आर्यवंशीय होते. यात काहींच्या मते मत्स्यांच्या ऐवजी यदूंची गणना होते. याशिवाय खालील टोळ्यांच्या प्रमुखांनीही या युद्धात भाग घेतला होता. काफिरीस्तानाच्या पूर्व भागातील अलिन, पख्तुनिस्तानातील पख्त, बोलन खिंडीजवळचे भलानस, सिंधुतीरावरील शिव आणि विषाणिन. याशिवाय पृश्निगु व दोन विकर्णवंश यांचाही या युद्धात पराभव झाल्याचा उल्लेख आहे.
या युद्धाचे सुस्पष्ट वर्णन वरील सूक्तात येते. प्रथम सुदासच्या शत्रूची सरशी होऊ लागली, तेव्हा वसिष्ठ पुढे झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने जयाचे पारडे फिरविले; तेव्हा एखादा पुरोहित आसनाकरिता दर्भ कापतो त्याप्रमाणे सुदासने शत्रूंना कापून काढले. त्या रणयज्ञात तुर्वश पुरोडाश झाला (ठार मारला गेला). मत्स्य, भृगू आणि द्रुह्यू यांचीही तीच गती झाली. शत्रूंनी पळ काढला तेव्हा त्यांनी स्वरक्षणार्थ एकमेंकाना मदत केली. परुष्णी नदी दुथडीने भरून वाहत असल्यामुळे ती पार करताना कित्येक वाहून गेले. इतर काहींनी मूर्खपणाने तिचा प्रवाह वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात शत्रू तसाच त्याचा शहाणा पुरोहित हे दोघेही कामास आले. इंद्राने आपल्या वज्राने परुष्णीच्या प्रवाहात द्रुह्यू आणि त्याचा पुरोहित कवष या दोघांनाही जलसमाधी दिली. त्याने शत्रूंचे सातही दुर्ग आणि इतर दुर्भेद्य आश्रयस्थळे यांचा नाश करून अनूच्या वंशजांची संपत्ती सुदासपक्षीय तृत्सूंना दिली. लुटीकरता आलेल्या अनू आणि द्रुह्यू यांचे प्रत्येकी सहा हजार योद्धे रणभूमीवर शयन करते झाले. इंद्राने त्यांच्या सहासष्ट सेनानायकांना ठार केले. ते सुदासपक्षीय तृत्सू पाण्याच्या भयंकर प्रवाहाप्रमाणे शत्रूवर तुटून पडले, तेव्हा कंजूष शत्रूंनी आपली सर्व संपत्ती रणांगणांवर टाकून पळ काढला. सुदासची सेना थोडी होती, तरी एखाद्या बकऱ्याने सिंहीणीला ठार करावे, त्याप्रमाणे इंद्राने तिला तो अपूर्व विजय मिळवून दिला.
सुदासने दहा राजांवर विजय मिळविला खरा, पण त्याला त्यांचा पाठलाग करता आला नाही असे दिसते. कारण त्याच वेळी पूर्वेकडील भेदनामक शत्रूच्या आधिपत्याखाली अज, शिग्रू आणि यक्षू या आर्येतर टोळ्यांशी यमुनेच्या परिसरात त्याला सामना द्यावा लागला. याही युद्धात त्याला जय मिळाला, तेव्हा शत्रूंनी त्याला उत्कृष्ट अश्वांचे नजराणे दिले.
ऋ. ७·१८ या सूक्तांच्या अखेरच्या ऋचांत सुदासने या युद्धात मिळालेल्या विजयाने आनंदित होऊन वसिष्ठांना दिलेल्या देणग्यांचे वर्णन आहे. त्याने त्याला दोनशे गाई, घोड्या जुंपलेले दोन रथ आणि सुवर्णालंकारांनी सजविलेले चार घोडे दिले. शेवटी सातही नद्या सुदासची कीर्ती गात आहेत; त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि त्याचे राज्य चिरकाल चालो; अशी मरुतांची प्रार्थना वसिष्ठांनी केली आहे.
या युद्धाचा काळ बऱ्याचशा निश्चितपणे ठरविता येतो. पुराणात म्हटले आहे की, सृंजय हा भारतीय युद्धापूर्वी ३० पिढ्या होऊन गेला. प्रत्येक पिढी १५ वर्षांची मानल्यास त्याचा काळ ख्रि.पू. १८५० हा येतो. कारण भारतीय युद्ध ख्रि.पू. १४०० च्या सुमारास झाले होते असे दिसते. सुदासनंतर चार पिढ्यांनी सृंजय होऊन गेला. म्हणून सुदासचा काळ सु. ख्रि. पू. १९०० असा येतो. हे काळ अर्थातच अनुमानाने ठरविले आहेत. त्यात थोडीबहुत चूक असण्याचा संभव आहे.
संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Vedic Age, London, 1957.
मिराशी, वा. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
बाल्कन युद्धे : एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यूरोपीय राजकारणात ‘पूर्वेकडील प्रश्न’ ही एक गुंतागुंतीची समस्या होती. बाल्कन द्वीपकल्पातील तुर्की साम्राज्याच्या उतरत्या प्रभावामुळे बाल्कन राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्याच्या आवरणाखाली त्या प्रदेशात शिरकाव करण्याचा रशियाचा प्रयत्न होता व त्याला इंग्लंड, फ्रान्ससारख्या राष्ट्रांचा विरोध असल्याने त्यातून पूर्वेकडील प्रश्न निर्माण झाला.
दसरा : हिंदूचा एक प्रमुख सण व शुभ दिवस. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे ⇨नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले.
ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध. हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला.
इंग्रज-मराठे युद्धे : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली.
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील : सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली.
अफूची युद्धे : एकोणिसाव्या शतकात इंग्लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची युद्धे म्हणतात; पण मूलत: चीनची हुकमी बाजारपेठ काबीज करण्यासाठी साम्राज्यवादी ब्रिटिशांनी केलेले प्रयत्न व त्यांना थोपविण्यासाठी चीनने योजलेले उपाय यांतून ही युद्धे उद्भवली.
Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था24/07/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
56