स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले.
१९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. कमला नेहरू यांच्याशी त्यांनी १९१६ साली विवाह केला. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिलं. ते खादीचा वापर करू लागले.
१९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय्य निश्चित केले गेले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 7/17/2020
बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात म...
भारतीय आणि जागतिक इतिहासातील महत्त्वाच्या तारखा
भारताचा राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आडव्या आकारा...
पोर्टलच्या ह्या विभागामध्ये आपण आपल्या देशाची एक र...