অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पल्लव वंश

पल्लव वंश

पल्लव वंश

दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. त्याच्या मूलस्थानाविषयी तसेच वंशाच्या उत्पत्तीसंबंधी विद्वानांत मतैक्य नाही. काही विद्वानांच्या मते, पल्लव हे पार्थियन वंशाचे होते; कारण क्षत्रप रुद्रदामनच्या गिरनार येथील लेखात पार्थियन अधिकाऱ्‍याला पहलव म्हटले आहे; पण या मताला सबळ आधार नाही. पल्लव कांचीजवळच्या तोंडमंलमवर राज्य करीत होते. तोंडै याचा अर्थ अंकुर असल्याने त्या वंशाला पल्लव असे नाव असावे, ही दुसरी उपपत्ती जास्त ग्राह्य वाटते.

ल्लव राजा सिंहवर्मा (तिसरे शतक) याचा सर्वांत प्राचीन लेख गुंतूर जिल्ह्याच्या पालनाड तालुक्यात सापडला आहे. त्यांनंतर शिवस्कंदवर्म्याचे दोन ताम्रपट गुंतूर व बेल्लारी जिल्ह्यांत मिळाले आहेत. हे सर्व लेख प्राकृतात आहेत. हे राजे सातवाहनांच्या अस्तानंतर तिसऱ्‍या शतकाच्या उत्तरार्धात पुढे आले असावेत.

ल्लवांचे गोत्र भारद्वाज होते. शिवस्कंदमर्म्याने अग्निष्टोम, वाजपेय आणि अश्वमेध हे श्रौत याग करून धर्ममहाधिराज ही पदवी धारण केली होती. यानंतर पल्लव राजांचे संस्कृत भाषेतील अनेक ताम्रपट सापडले आहेत; पण त्यांचा कालानुक्रम निश्चितपणे लावता येत नाही. ते सु. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंतया मुलूख काबीज केला. त्याचा पुत्र महेंद्रवर्मा याने मामल्लपुरम् ( महाबलीपुर) येथे मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देवळे (रथ) खोदून काढविली आणि मत्तविलास- प्रहसन नावाचे कापालिकांच्या जीवनावर प्रहसन लिहिले. तो स्वतः संगीतात निष्णात होता. बादामीच्या दुसऱ्‍या पुलकेशीने त्याचा पराभव करून त्याच्या राज्याचा उत्तरेचा भाग जिंकून घेतला. या काळापासून पल्लवांचे बादामीच्या चालुक्यांशी जे हाडवैर उत्पन्न झाले, ते पुढे कित्येक पिढ्या टिकले व नंतरच्या राष्ट्रकूटांशीही चालू राहिले. महेंद्रवर्म्यांचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा (सु. ६३०–६६८) याने चालुक्यांची दुसरी स्वारी परतविली, एवढेच नव्हे, सर स्वतः ६४२ मध्ये वातापी (बादामी) वर आक्रमण करून ती घेतली. तेथील युद्धात पुलकेशी मारला गेला. नंतर नरसिंहवर्म्याने वातापिकोंड (वातापी घेणारा) अशी पदवी धारण केली. यापुढे सु. बारा वर्षे चालुक्यांच्या राज्यात अराजक माजले नरसिंहवर्म्याने श्रीलंकेचा राजा मालवर्मा याला आश्रम देऊन त्याच्या साहाय्यार्थ स्वारी केली.

यानंतर दुसऱ्‍या पुलकेशीचा पुत्र पहिला विक्रमादित्य याने नरसिंहवर्मा आणि त्याचा पुत्र दुसरा महेंद्रवर्मा (६६८– ६७०) आणि नातू पहिला परमेश्वरवर्मा (६७० – ७००) यांचा अनेक युद्धांत पराजय केला, पण परमेश्वरवर्म्याने पुऱ्‍हा बादामीवर स्वारी करून विक्रमादित्याचा पराभव केला. पल्लवांच्या व चालुक्यांच्या परस्परांच्या प्रदेशांवर अशा अनेक स्वाऱ्‍या झाल्या व त्यांत दोघांनाही विजयश्री चंचल असल्याचा प्रत्यय आला.

रमेश्वरवर्म्याचा पुत्र दुसरा नरसिंहवर्मा (७००७२८) याचे नाव इतिहासात अनेक कारणांनी संस्मरणीय झाले आहे. त्याच्या काळात चालुक्य वास्तूकला पद्धती प्रचारात आली. त्याने कांची येथे कैलासनाथ अथवा राजसिंहेश्वरनामक शिवालय बांधले. संस्कृत कवी दंडी याला आश्रम दिला आणि चीनला आपला राजदूत पाठविला.

दुसऱ्‍या परमेश्वरवर्म्याला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर प्रमुख लोकांनी पल्लवांच्या दुसऱ्‍या शाखेतील दुसरा नंदिवर्मानामक कुमाराला पल्लव गादी दिली. तो पल्लवमल्ल या बिरुदाने प्रसिद्ध आहे. याच्याही काळे पांड्य व चालुक्य घराण्यांशी पल्लवांची युद्धे चालू राहिली. ७५० च्या सुमारास चालुक्यांचा उच्छेद करून राष्ट्रकूट दंतिदुर्गाने सत्ता बळकाविली आणि त्यांचा पल्लवांशी असलेला हाडवैराचा वारसा घेतला. दंतिदुर्गाने कांचीवर स्वारी करून पल्लवांचा पराभव केला. दंतिवर्मानामक पल्लव नृपतीचा राष्ट्रकूट व पांड्य यांनी पराभव केला. त्याचा उत्तराधिकारी तिसरा नंदिवर्मा याने मलाया द्वीपकल्यावर आक्रमण करून तेथे आपल्या नावे विष्णूचे देवालय बांधले आणि तलाव खोदाविला. तो पांड्यांशी झालेल्या युद्धात मारला गेला. शेवटचा पल्लव राजा अपराजित याने आपला मांडलिक चोल राजा आदित्य याच्या साहाय्याने पांड्यांचा पुरा मोड केला, पण पुढे त्या आदित्याने त्याच्या विरुद्ध सु. ८९३ मध्ये बंड करून त्याला ठार मारले आणि तो स्वतः तोंडमंडलमचा अधिपती झाला.

साहित्य, कला इ. : इतर भारतीय राजवंशांप्रमाणे पल्लवांनीही विद्या व कला यांना उदार आश्रय दिला. दंडीच्या अवंतिसुंदरी -कथेतआणि तिच्या सारात त्यांच्या राजसभेचे वर्णन आले आहे. मत्त-विलास- प्रहसनाचा उल्लेख मागे आला आहेच. हे प्रहसन सध्या उपलब्ध असलेल्या प्रहसनांत पहिले आहे. पल्लवाचे नाव त्यांच्या विशिष्ट स्थापत्यशौलीमुळे सुविख्यात झाले आहे. महेंद्रवर्मा आणि नरसिंहवर्मा यांच्या काळात मामल्लपुरम्मधील खडकांतून रथ व मंडप कोरण्यात आले. जवळच एका विशाल खडकावरील सु.२८ मी. लांब आणि ६.९ मी. उंच अशा भागावर गंगावतरणाचा देखावा सुंदर रीतीने कोरला आहे. त्याचे अर्जुनाची तपश्वर्या असे चुकीचे नाव प्रचलित झाले आहे. जवळच भगवान शंकर व तपश्वर्येने अस्थिपंजर झालेला भगीरथ यांच्या मूर्ती असलेले ते दृश्य आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate