অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आयर्लंड

आयर्लंड

आयर्लंड: अटलांटिक महासागरात इंग्लंडच्या पश्चिमेस असलेले बेट. क्षेत्रफळ ८३,७६७ चौ. किमी. हा देश ५१०३०' उ. ते ५५०३०' उ. व ५०३०' प. ते १००३०' प. यांदरम्यान आहे. याच्या ईशान्येस नॉर्थ चॅनल, पूर्वेस व आग्नेयीस सेंट जॉर्जेस चॅनल व आयरिश समुद्र आणि उत्तरेस, दक्षिणेस व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. आयर किंवा आयर्लंड प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड हे या देशाचे दोन स्वतंत्र राजकीय विभाग असून, त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ७०,२८३ व १३,४८४ चौ. किमी. व  लोकसंख्या अनुक्रमे २९,७१,२३० (१९७१) व १५,२५,२०० (१९७१) आहे. या देशाची एरिन, इनिसफेल, हायबर्निया, आयबर्निया, आयरन, इव्हर्निया इ. नावेही पूर्वी प्रचलित होती. आयरिश प्रजासत्ताकाची राजधानी डब्लिन व उत्तर आयर्लंडची बेलफास्ट असून उत्तर आयर्लंडचा अंतर्भाव ग्रेट ब्रिटनमध्ये होतो.

भूवर्णन : आयर्लंडची भूमी विविध प्रकारच्या खडकांची झालेली असून त्यांत चुनखडीचे खडक, सुभाज किंवा शिस्ट, वालुकाश्म, ग्रॅनाइट इत्यादींचा अंतर्भाव होतो. देशाच्या ईशान्य भागात त्रायासिककालीन मार्ल, तृतीय कल्पातील बेसाल्ट व द्वितीय महाकल्पातील चुनखडीचे खडक सापडतात. आयर्लंडातील पर्वतही विविध प्रकारच्या खडकांचे झालेले आहेत. चतुर्थ युगातील हिमनद्यांच्या उगमांशी हिमगव्हेरेही देशातील निरनिराळ्या भागांत दृष्टोत्पत्तीस येतात. हिमामुळे आलेल्या गाळाच्या कमीजास्त उंचीची व विभिन्न आकाराची टेकाडेही सर्वत्र दिसतात. आयर्लंडचा किनारा उंच असून सर्व देश म्हणजे चुनखडीचे पठारच होय. देशाचा मध्यभाग मैदानी असून त्यात सरोवरे, दलदली व पाणथळी सर्वत्र आहेत. सामान्यत: सर्व भूप्रदेश हिरव्यागार वनस्पतींनी झाकलेला असल्याने नयनरम्य वाटतो. त्यामुळेच पाचूचे बेट असे आयर्लंडचे वर्णन यथार्थ आहे. ईशान्य भागातील मोर्न पर्वत, पूर्वेकडील विक्लो पर्वत व आग्नेयीकडील मागिलिकडी हे आयर्लंडचे मुख्य पर्वत फारसे उंच नाहीत. किलार्नीजवळील कॅरान्टुवाहिल (१०३५·५ मी.) व डब्लिनच्या दक्षिणेस ६४ किमी. लग्नाकल्या (९२४ मी.) ही या देशातील प्रमुख शिखरे होत.

 

आयर्लंडचे हवामान सागरी असून ते समशीतोष्ण आहे. ईशान्येकडील थंड ध्रुवीय वाऱ्यांवरील व पश्चिमेकडून वाहणाऱ्या समशीतोष्ण कटिबंधीय दमट, उबदार वाऱ्यांवरील गल्फ प्रवाहाच्या प्रभावामुळे आयर्लंडातील तपमान सरासरी १०० सें. च्या वर सहसा जात नाही. उन्हाळ्यात ते सरासरी १५०·५ - १६० से. व हिवाळ्यांत   ५० - ५०·५ से. असते; म्हणजे याच अक्षांशांतील अन्य यूरोपीय देशांपेक्षा येथील उन्हाळा व हिवाळा कमी कडक व म्हणून सुसह्य असतो. पश्चिमी वाऱ्यांमुळे आयर्लंडमध्ये वर्षाकाठी सु. २०० – २२५ दिवस थोडा थोडा पाउस पडतो; देशाच्या पूर्व व उत्तर भागात वर्षाकाठी सु. ७० – ७५ सेंमी. व नैऋत्य भागात १२० – १२५ सेंमी. पाऊस पडतो.शेवटच्या हिमयुगात सबंध आयर्लंड बर्फाच्छादित असल्याने आज देशात वावरणारे प्राणी व वाढणाऱ्या वनस्पती यांची आवक इंग्लंड किंवा उत्तर यूरोपातून झाली हे उघड आहे. मात्र इंग्लंडमध्ये सापडणारे मोल, पाणथळ उंदीर, टोड, व्हायपर सर्प आयर्लंडात सापडत नाही. तसेच इंग्लंडमधील कित्येक वनस्पतीही येथे दिसत नाहीत. प्राचीन काळी मध्य आयर्लंडमधील मैदानात दाट वन होते. ते आता नाहीसे झाले असले तरी ओक, पाईन, बर्च, बीच हे वृक्ष आजही सापडतात. समशीतोष्ण दमट हवामानामुळे विविध प्रकारची गवते तसेच क्लीक, प्रनड व नेचे येथे वाढतात.

 

लेखक - द. ह. ओक

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate