Accessibility options
Accessibility options
Government of India
Loading content...
Contributor : 07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
जिच्यातील पाणी केवळ स्वतःच्या दाबाने आपोआप भूपृष्ठावर येते अशी विहीर. अप्रवेश्य (पाणी अडवू शकणाऱ्या) खडकांच्या दोन थरांमध्ये प्रवेश्य खडकांचा थर असला, प्रवेश्य थराचे पृष्ठ पुरेसा पाऊस पडत असलेल्या उंचवट्याच्या क्षेत्रात उघडे पडले असले व थरांची रचना अनुकूल असली म्हणजे आर्टेशियन विहीर निर्माण होणे शक्य असते. उदा., खालील आकृतीत पन्हळासारख्या वाकविल्या गेलेल्या तीन थरांचा छेद दाखविला आहे. त्यातील मधला प्रवेश्य व उरलेले अप्रवेश्य आहेत. प्रवेश्य थराच्या उंचवट्याच्या जागी उघड्या पडलेल्या भागावर पडणाऱ्या पावसाचे पाणी प्रवेश्य थरात मुरत राहून त्याच्या खोल भागात साचते. त्या भागाच्या वरील जमिनीत प्रवेश्य थरापर्यंत विहीर खणली तर प्रवेश्य थरातील पाणी वर चढून भूपृष्ठावर येऊ शकेल व दाब पुरेसा असला, तर ते कारंज्याच्या पाण्यासारखे उसळून बाहेर येईल. आकृतीत प्रवेश्य थरातील पाण्याची पातळी तुटक रेषेने दाखविलेली आहे.
आर्टेशियन विहिरीचा छेद : (१)झरा, (२)विहीर, (३) प्रवेश्य थर, (४) अप्रवेश्य थर.आर्टेशियन विहिरीचा छेद : (१)झरा, (२)विहीर, (३) प्रवेश्य थर, (४) अप्रवेश्य थर.
आर्टेशियन विहिरीस अनुकूल अशी परिस्थिती भारतातील थोड्याच व जलोढाने (गाळाने) व्यापलेल्या प्रदेशांत, गुजरात, पाँडेचरी, दक्षिण
अर्कॉट व सिंधु-गंगा मैदानात आढळते.
लेखक : अ. ना.ठाकूर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
पर्यटनातून रोजगार निर्मिती असा नवा समाज जीवनाचा अर्थात विकासाचा पॅटर्न देशाच्या अनेक राज्यामध्ये विकसित होत आहे. स्थानिक नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर करुन अनेक राज्यात नवनवी पर्यटनस्थळे विकसित करुन स्थानिक तरुण-तरुणींचा पर्यटन विकासात सहभाग घेतला जात आहे.
कधी कधी आपल्याच माणसांशी संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष क्लेशदायक असला तरी तो लढण्याची गरज निर्माण झालेली असते;कारण याच संघर्षात भविष्याची नांदी दडलेली असते. असाच संघर्ष नाशिकच्या अनेक गावांमध्ये घडला.
बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान व पाठशाळा असणारी शैल वास्तुरचना.
मरूद्यान : ( ओअँसिस ). वाळवंटातील हिरवळीचा सुपीक प्रदेश. सामान्यपणे याचा विस्तार मऱ्यादित असतो, ⇨आर्टेशियन विहिरी किंवा साध्या विहिरी यांच्याद्वारे येथे वर्षभर गोडे पाणी मिळू शकते ; त्यामुळे येथे वनस्पती वाढू शकतात व पिके घेता येतात. म्हणून येथे शेती करून वसाहत करणे शक्य होते.
एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.
पाचव्या शतकात आर्मेनियन लिपी निश्चित झाली.